मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; १५ ठार

Last Updated: Wednesday, May 29, 2013, 10:20

पालघर तालुक्यातील मेंढवण गावाजवळ बसला भीषण अपघात झालाय. लक्झरी बस पुलावरुन कोसळून १५ जण ठार झालेत.

एकाच कुटुंबातील पाच जणांवर मृत्यूचा घाला

Last Updated: Monday, May 27, 2013, 12:02

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर रविवारी सायंकाळी कार्ल्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुबातील चार जण जागीच ठार झालेत. तर एकाचा रूग्णालायात मृत्यू झाला. वासकर कुटुंब देवदर्शनासाठी गेले होते.

मंथनची विंडो सीटची विनंती शेवट ठरली...

Last Updated: Sunday, May 26, 2013, 08:22

मुंबई-गोवा महामार्गावर आगवे येथे लक्झरी बस उलटून दहा वर्षीय मंथनसह तिघेजण ठार झालेत. तर २२ जण जखमी झाले. मुंबईत एक अन्य प्रवाशी बसला होता. मात्र, बोलक्या मंथनने त्यांना विनंती करून विंडो सीट मिळवली होती. या विंडो सीटने मंथनचा घात केला.

नवी मुंबईत बिल्डर बिजलानीवर गोळीबार

Last Updated: Saturday, May 25, 2013, 09:21

बिल्डर सुनीलकुमार लाहोरिया हत्या प्रकरणातील आरोपी बिल्डर सुरेश बिजलानी याची खारघरमध्ये कार अडवून मोटारसायकलवरून आलेल्या दोन मारेकर्यांचनी त्यांच्यावर गोळीबार केला. खारघर येथील सेंट्रल पार्कजवळील ग्रामविकास भवनसमोर शुक्रवारी भर दुपारी ही घटना घडली.

रिक्षाचालकाने केला प्रवाशाचा खून!

Last Updated: Thursday, May 23, 2013, 20:05

रिक्षाचालकांच्या मुजोरीचं एक भयावह उदाहरण अंबरनाथमध्ये घडलं. ‘रिक्षाचं भाडं इतकं जास्त कसं झालं’, अशा प्रश्न विचारणाऱ्या प्रवाशाचा रिक्षाचालकानं खून केलाय.

ठाण्यातील व्यापाऱ्यांचा संप मागे

Last Updated: Monday, May 20, 2013, 09:28

ठाण्यातील व्यापारी आजपासून संप मागे घेणार आहेत. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि व्यापारी यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान हा निर्णय घेण्यात आलाय.

शरद पवारांनी केला लोकलने प्रवास!

Last Updated: Sunday, May 19, 2013, 21:59

भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. मात्र या कार्यक्रमा दरम्यान शिवसेना, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांना काळे झेंडे दाखवून कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

कळवा हॉस्पिटलची आरोग्य यंत्रणा आजारी!

Last Updated: Sunday, May 19, 2013, 21:10

ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज कळवा हॉस्पिटलची आरोग्य यंत्रणा आजारी पडली आहे... विशेष म्हणजे ४ दिवसांपूर्वी उदघाटन होऊनही या हॉस्पिटलमधली आयसीयू आणि अत्याधुनिक सेवा ठप्प पडली.

क्रांती म्हणते "श्रीशांतसोबत `ती` मी नव्हेच!"

Last Updated: Sunday, May 19, 2013, 19:43

श्रीशांत आणि मॅच फिक्सिंग प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं अभिनेत्री क्रांती रेडकर हिनं स्पष्ट केलय. श्रीशांतला कधीही भेटले नसल्याचं तिनं म्हटलंय. सध्या कोकणात कुडाळमध्ये चित्रिकरणात असल्याचंही क्रांतीनं सांगितलं.

आता दुकानंच फोडून टाकू - मनसे

Last Updated: Saturday, May 18, 2013, 20:35

अक्षय्य तृतीयेचा `लाभ` पदरात पाडून घेतल्यानंतर ठाण्यातल्या घाऊक व्यापाऱ्यांनी आजपासून पुन्हा `एलबीटी` विरोधात आंदोलन सुरु केलंय.