प्राध्यापकानेच केला विद्यार्थींनीवर अनेकदा बलात्कार

Last Updated: Saturday, March 23, 2013, 23:24

शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना कल्याणमध्ये घटलीय. एका महाविद्यालयात शिकणा-या तरूणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर सतत बलात्कार करणा-या नराधम प्राध्यापकाला पोलिसांनी अटक केली.

एटीएस उपायुक्त बॅनर्जीची डोक्यात गोळी मारून आत्महत्या

Last Updated: Saturday, March 23, 2013, 20:52

एटीएसचे उपायुक्त संजय बॅनर्जी यांनी ठाण्यात आत्महत्या केलीये. घोडबंदर रोडच्या गोवा पोर्तुगिजा हॉटेलमध्ये त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली.

पाचवीतल्या मुलीची आत्महत्या, अधीक्षकाला अटक

Last Updated: Thursday, March 21, 2013, 20:43

उल्हासनगरमधल्या राजर्षी छत्रपति शाहू महाराज या मागासवर्गीय वस्ती शाळेच्या अधीक्षकाला अटक केली आहे. शाळेतल्या पाचवीच्या विद्यार्थीनीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी अधिक्षकाला अटक केली.

वाद टाळायला हवेत- उद्धव ठाकरे

Last Updated: Wednesday, March 20, 2013, 23:13

लोकप्रतिनिधी आणि पोलिसांमधील वाद चुकीचा असून, असे वाद टाळायला हवेत, असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलंय. भिवंडीतल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी भाषण केलं.

पाण्याविना बिबट्यानं अन् हरणानं गमावले प्राण!

Last Updated: Wednesday, March 20, 2013, 17:39

कडक उन्हाळा आणि दुष्काळाची वाढती भीषण दाहकता यामुळे पाण्याकरता वणवण भटकणाऱ्या गावकऱ्यांचं दृश्य काही नवीन नाही. मात्र, अशीच काहीशी परिस्थिती आता वन्य प्राण्यांचीही होताना दिसते य. पाण्याच्या शोधात एका बिबट्यानं तसंच एका हरणानं आपले प्राण गमावलेत.

खेड अपघातानंतर सरकारला जाग, तरीही त्रुटी

Last Updated: Wednesday, March 20, 2013, 13:53

मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी करण्याच्या प्रस्तावाकडे राज्य तसेच केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. खेड येथे जगबुडी नदीत खासगी बस कोसळून ३७ ठार तर १५ जण जखमी झालेत. या अपघातानंतर सरकारला जाग आलेय. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामाचा पाठपुराव करण्याचे आश्वासन सरकारला द्यावे लागले तर ट्रॉमा केअर सेंटरचा तातडीने विचार करण्याचे स्पष्ट करण्यात आलेय.

रत्नागिरी बस अपघातातील जखमींची नावे

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 17:56

जखमींना डेरवण रूग्णालय, खेड नगरपालिका रूग्णालय आणि कळबनी ग्रामीण रूग्णालय या तीन रूग्णालयात दाखल केले आहे. यातील १४ जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

रत्नागिरी बस अपघातातील मृतांची नावे

Last Updated: Wednesday, March 20, 2013, 12:02

प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस जगबुडी नदीत कोसळून भीषण दुर्घटना घडलीय. या अपघातात ३७ जण ठार झाले आहेत.

अपघात : मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा संसदेत

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 13:57

मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथे पहाटे खासगी बसला अपघात झाला. या अपघातात ३७ जण ठार तर १५ जण जखमी झालेत. या महामार्गावरील अरूंद रस्त्यांमुळे अपघातांत वाढ होत आहे. हाच मुद्दा धरून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरी करणाचा मुद्दा शिवसेनेचे खासदार अनंत गिते यांची उचलून धरला.

बस नदीत कोसळली; ३७ जण ठार, १५ जखमी

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 11:36

प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस नदीत कोसळून भीषण दूर्घटना घडलीय. या अपघातात ३७ जण ठार झालेत तर १५ जण गंभीर जखमी आहेत.