खोट्या प्रतिष्ठेनेच घेतला मुलींचा बळी

Last Updated: Monday, April 9, 2012, 22:50

जळगावातील खोट्या प्रतिष्ठेचा बळी ठरलेल्या मनिषा धनगर हत्येप्रकरणी, तिच्या वडील आणि काकांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर मनिषाच्या आजीला ४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

बापानेच केली मुलीची हत्या

Last Updated: Monday, April 9, 2012, 13:52

पुरोगामी समजल्या जाणा-या महाराष्ट्रात खोट्या प्रतिष्ठेपायी रक्ताच्या नात्यातील व्यक्तीची हत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झालीय. साता-यापाठोपाठ जळगावमध्येही जातीच्या प्रतिष्ठेपायी आपल्या मुलीचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

पुन्हा एकदा भीषण अपघात, ८ ठार

Last Updated: Sunday, April 8, 2012, 15:16

कालचा शनिवार अपघातवार ठरला. मात्र आजही अपघाताची मालिका सुरूच आहे. आजही अपघातात ८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. जळगावमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात ८ जण ठार तर १२ जण जखमी झाले आहेत.

शरद पवार मंत्र्यांना घालतायेत पाठिशी?

Last Updated: Sunday, April 8, 2012, 13:01

कॅगच्या अहवालात राज्य़ातल्या हेवीवेट मंत्री आणि नेत्यांवर ताशेर ओढण्यात आले आहेत. पण केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मात्र या मंत्र्यांची पाठराखण केली आहे. ,

सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाला भाविकांची गर्दी

Last Updated: Saturday, April 7, 2012, 08:15

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या आदिशक्ती सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी लाखोंचा जनसागर लोटलाय. सप्तशृंगीच्या गडावर चैत्रोत्सव सुरु आहे. या उत्सवात आजच्या पौर्णिमेचं विशेष महत्त्व असतं.

नाशिकमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Last Updated: Friday, April 6, 2012, 15:21

नाशिकमध्ये मुलींची चक्क विक्री होत असल्याचं समोर आलंय. श्रीमंत घरात लग्नाचं आमिष दाखवून मुलींची दोन दोन लाखांना विक्री होते. या टोळीनं अल्पवयीन मुलींची विक्री केल्याचंही समोर आलंय.

स्वाईन फ्लू आलाय परत, घेतला 'दुसरा बळी'

Last Updated: Thursday, April 5, 2012, 11:29

नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा प्रादूर्भाव वाढत चालला असून स्वाईन फ्लूमुळे दुसरा बळी गेला आहे. १ एप्रिलला जिल्हा रूग्णालयात दाखल झालेल्या भारत ठाकूरचा बुधवारी मृत्यू झाला होता.

बिबट्याने घेतला बालकाचा बळी

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 17:23

नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात बिबट्यानं एका वर्षाच्या मुलाला भक्ष्य बनवलं. निफाड तालुक्यातल्या जुने शिवरे शिवारात ही घटना घडली आहे. दुर्गेश गोसावी असं मरण पावलेल्या बालकाचं नाव आहे.

शिर्डी संस्थानाला हायकोर्टाचा पुन्हा दणका

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 13:56

शिर्डी संस्थानाला हायकोर्टानं पुन्हा दणका दिलाय. तत्कालीन विश्वस्त मंडळ आणि आजी माजी नगराध्यक्षांना घोटाळ्यासंदर्भात स्पष्टीकऱण देण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. स्पष्टीकरण देण्यासाठी हायकोर्टानं तीन आठवड्यांची मुदत दिली आहे.

पाणी योजनेत भ्रष्टाचार, गावाचा पैसा पाण्यात

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 09:46

मोठा गाजावाजा करत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी केंद्राकडून अनेक योजना राबवल्या जातात. मात्र त्यातही भ्रष्टाचार बोकाळल्याचं पहायला मिळतं. जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातील घोडगावमध्ये जलस्वराज्य पाणी योजनेत ५१ लाखांचा घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे.