जोकोविची 'दिवाळी', १६ लाख बोनस!

Last Updated: Thursday, November 10, 2011, 18:31

वर्ल्ड रँकिंगमध्ये टॉपवर असणारा सर्बियन प्लेअर नोवाक जोकोविचने पॅरिस मास्टर्सची तिसरी फेरी गाठून तब्बल १६ लाख डॉलर्सचा बोनस खिशात टाकला. दुखापतींमुळे टेनिस कोर्टपासून लांब राहणाऱ्या जोकोविचने जोरदार पुनरागमन केलं असून, एँडी मरे, रॉजर फेडरर आणि डेव्हिड फेररने आपापल्या लीग मॅचेस जिंकत तिसऱ्या फेरीत धडाक्यात प्रवेश केला.

ऍथलीटने गमावला पाय, क्रीडा संघटनेला कदर नाय

Last Updated: Tuesday, November 8, 2011, 15:30

क्रीडा संघटनांच्या हलगर्जीपणाचा आणखी एका संतापजनक प्रकार समोर आला. एका खेळाडुला या हलगर्जीपणाचा फटका बसला. निरज सिंग हा ऍथलीट ट्रेनमधून पडल्यानं त्याच्यावर पाय गमावण्याची वेळ आली.

सिरीयाच्या बॉडी बिल्डरचा मुंबईत अकस्मात मृत्यू

Last Updated: Saturday, November 5, 2011, 05:54

मुंबईत होणाऱ्या मिस्टर युनिवर्स या स्पर्धेला सुरवातीलाच गालबोट लागलं आहे. कारण की सिरीयाहून आलेला बॉडी बिल्डर मेहबूब अल हदिदी ह्या विदेशी खेळाडूचा गूढरित्या मृत्यू झाला आहे. मिस्टर युनिवर्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मुंबईत आलेल्या बॉडी बिल्डरचा अचानक मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे.

ग्राँपीमध्ये सेबेस्टियन व्हेटेलने बाजी मारली

Last Updated: Tuesday, November 1, 2011, 12:59

इंडियन ग्राँपी २०११ मध्ये सेबेस्टियन व्हेटेलने बाजी मारली. नोएडाच्या बुद्ध सर्किटवर रेडबुलचा दबादबा दिसून आला. मॅकलरेनचा जेन्सन बटन दुसऱ्या क्रमांकावर राहिला. सहारा फोर्स इंडियाचा सुटिल नवव्या स्थानावर राहिला. सचिन तेंडुलकरने दाखवला चेकर्ड फ्लॅग दाखवला.

इंडियन ग्राँप्री प्रॅक्टिस सेशनमध्ये फेलिपे मासा अव्वल

Last Updated: Saturday, October 29, 2011, 10:04

पहिल्या-वहिल्या इंडियन ग्राँप्रीतील प्रॅक्टिस सेशनमध्ये फेरारीचे वर्चस्व दिसून आले. फेरारीच्या फेलिपे मासानं 1 मिनिट 25.706 सेकंदांची वेळ नोंदवत प्रॅक्टिस सेशनमध्ये बाजी मारली.

F1ची भरारी, भारताच्या 'ट्रॅक'वरी !!!

Last Updated: Friday, October 28, 2011, 08:50

फॉर्म्युला वन म्हणजे वेगाचा उत्सव, घड्याळ्याच्या काट्याशी स्पर्धा करण्याची सवय ज्यांना आहे अशा व्यक्तींमध्ये हा प्रकार चांगलाच लोकप्रिय आहे. या स्पर्धेत सहभागी होणा-या ड्रायव्हर्सना अनेकदा गंभीर दुखापतीही झाल्यात. मात्र तरीही या खेळाबद्दलची त्यांची क्रेझ जराही कमी झालेली नाही. आता भारतीय फॅन्सनाही हा वेगाचा थरार प्रत्यक्ष अनुभता येणार आहे.

रूनीची मानहानी, बेटिंग केले बापानी

Last Updated: Sunday, October 9, 2011, 07:26

मॅनचेस्टर युनायटेडचा स्टार फुटबॉलपटू वेन रूनीचे वडील आणि काका यांना बेटिंग प्रकरणी अटक करण्यात आलय. स्कॉटीश स्ट्रायकर प्रीमिअर लीग दरम्यान बेटींग करताना रूनीचे ४८ वर्षीय वडील ज्यांच नावंही वेन असू त्याचे ५४ वर्षीय काका रीची रूनी यांना अटक करण्यात आली आहे.

अखिलकुमार, सुरंजॉयची दुसर्‍या फेरीत धडक

Last Updated: Sunday, October 9, 2011, 14:26

अखिलकुमार आणि सुरंजॉय सिंग या हिंदुस्थानच्या स्टार बॉक्सर्सनी अझरबैझान येथील बाकू येथे सुरू असलेल्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या दुसर्‍या फेरीत पाऊल टाकले.

हॉकीपटू 'युवराज वाल्मिकीने' घेतली बाळासाहेबांची भेट

Last Updated: Sunday, October 9, 2011, 14:17

भारताला एशियन हॉकी चॅम्पियनशीप जेतेपद मिळून देण्यात मोलाची भूमिका बजावणा-या मुबंईकर युवराज वाल्मिकीचं आज मुबंई एअरपोर्टवर जल्लोषात स्वागत करण्यात आलं.... नेहमीच उपेक्षित राहिलेल्या हॉकीला पुन्हा वैभव मिळवून देणा-या हॉकीपटूंच्या पदरी नेहमीच उपेक्षा आली होती..

हिंद केसरी हरीश्चंद्र बिराजदार यांचं निधन

Last Updated: Sunday, October 2, 2011, 12:58

हिंद केसरी हरीश्चंद्र बिराजदार यांचं पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर ४ महिने त्यांच्यावर पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.