Last Updated: Thursday, February 14, 2013, 18:17
www.24taas.com, नाशिकराज ठाकरेंच्या एकला चलो रे च्या भूमिकेवर शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे मोठ्या भावासारखे वागले, राज ठाकरे मात्र लहान भावासारखे वागले नाहीत अशी टीका मनोहर जोशींनी केली आहे. `झी २४ तास`शी खास बातचीत करताना मनोहर जोशी यांनी राज ठाकरेंवर टीका केली.
राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे असंही मनोहर जोशींनी म्हटलं आहे. मनसेची भविष्यात अशीच भूमिका राहिल्यास शिवसेना मनसेशी विरोधकांसारखीच वागेल असं मनोहर जोशींनी सांगितलं.
उद्धव ठाकरें हात पुढे केला होता. मात्र राज ठाकरे यांनी त्यांची खिल्ली उडवली, राज याचं हे वागणं चुकीचं असल्याचेही मनोहर जोशी यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी लग्नाबाबत केलेली टीका तर अत्यंत चुकीची असल्याचेही मनोहर जोशी म्हणाले. त्यामुळे आता मनोहर जोशींच्या या टीकेला राज ठाकरे काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
First Published: Thursday, February 14, 2013, 15:09