Last Updated: Wednesday, February 13, 2013, 20:24
www.24taas.com, पुणेमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दुष्काळ माहीत आहे का, असा सवाल करत ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, यांनी राज यांच्यावर जोरदार टीका केली. ठाकरे यांनी दुष्काळाबाबत राज्य सरकारवर टीका करण्यापूर्वी गुरांची छावणी म्हणजे काय, पाण्याचा पुरवठा कुठून करतात, यासारख्या बाबींचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन अभ्यास करावा आणि त्यानंतरच आमच्यावर टीका करावी, असा सल्लाही पाटील यांनी राज यांना दिला.
दरवेळीप्रमाणेच या भाषणातही राज ठाकरेंनी वेगवेगळ्या नेत्यांची नक्कल करत धमाल उडवून दिली. जयंत पाटील यांच्या चेहऱ्यावर सतत असणाऱ्या आश्चर्याच्या भावांबद्दल त्यांची खिल्ली उडवली होती.
तर अजित पवारांचीही नक्कल करत आपल्याला जमिनीतलं काय कळतं यावर राज ठाकरे बोलले. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांचीही राज ठाकरेंनी टर उडवली होती.
First Published: Wednesday, February 13, 2013, 19:56