राज ठाकरे यांचा आजपासून राज्यव्यापी दौरा , raj thackeray, mns

राज ठाकरे यांचा आजपासून राज्यव्यापी दौरा

राज ठाकरे यांचा आजपासून राज्यव्यापी दौरा
www.24taas.com, पुणे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राज्यव्यापी दौरा आजपासून सुरु होत आहे. या दौऱ्यात राज कोणाला टार्गेट करणार आणि काय बोलणार याची उत्सुकता आहे.

राज ठाकरे यांनी दौऱ्याला सुरूवात करण्यापूर्वी पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचं काल दर्शन घेतलं. यावेळी कसबा राज आणि मनसे कार्यकर्त्यांनी सुरु होणाऱ्या दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी गणपतीला साकडं घातलं.


राज ठाकरे पुण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पुणे शहरातल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी राज ठाकरेंची भेट घेतली आणि दौऱ्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

राज हे साताऱ्यापासून दौऱ्याला सुरूवात करीत आहेत.


राज ठाकरे यांचा दौरा कार्यक्रम


१२.२.२०१३ - कोल्हापूर येथे संध्या. ६.३० वा. जाहीर सभा

१५.२.२०१३ - खेड येथे संध्या. ६.३० वा. जाहीर सभा

२२.२.२०१३ - सोलापूर येथे संध्या. ६.३० वा. जाहीर सभा

२६.२.२०१३ - परभणी येथे संध्या. ६.३० वा. जाहीर सभा

०२.३.२०१३ - जालना येथे संध्या. ६.३० वा. जाहीर सभा

१५.३.२०१३ - नागपूर येथे संध्या. ६.३० वा. जाहीर सभा

२४.३.२०१३ - अमरावती येथे संध्या. ६.३० वा. जाहीर सभा

०७.४.२०१३ - जळगाव येथे संध्या. ६.३० वा. जाहीर सभा

First Published: Sunday, February 10, 2013, 08:33


comments powered by Disqus