Last Updated: Sunday, February 17, 2013, 12:29
www.24taas.com,मुंबईसांगली जिल्ह्यात गृहमंत्री आर.आर.पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते मनसे कार्यकर्त्यांना शाखा काढताना धमकावतात असा आरोप कोल्हापुरच्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. आता गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय.
मनसे कार्यकर्त्यांना कधीही शाखा काढताना धमकावण्यात आलेलं नाही. याउलट अशा शाखा काढताना जर पदाधिका-यांना कुणी धमकावत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन गृहमंत्र्यांनी दिलंय.
गृहमंत्री आर आर पाटील यांना कोल्हापूर सभेत राज ठाकरे यानी जाहीर आव्हान दिले होते. माझ्या लोकांना धमक्या द्याल तर याद राखा, आर आर.पाटील. माझ्या लोकांना धमक्या द्याल तर तुमच्या घरातील माणसांना धमक्या जातील, हे लक्षात ठेवावे, असे राज यांनी धमकावले होते.
राज एवढ्यावर न थांबता कार्यकर्त्यांना पुढे सांगितले, मनसेच्या शाखा, कार्यालये सुरू करताना जे धमक्या देतील त्यांना गाडून टाका आणि आपले काम सुरूच ठेवा.
First Published: Sunday, February 17, 2013, 12:13