राज-उद्धव एकत्र येऊ की नये घरगुती विषय- राणे, Narayan Rane on Raj & Uddhav issue

राज-उद्धव एकत्र येऊ की नये घरगुती विषय- राणे

राज-उद्धव एकत्र येऊ की नये घरगुती विषय- राणे
www.24taas.com, आंगणेवाडी

उद्धव आणि राज एकत्र यावेत की न यावेत, याबाबत आपल्याला काही वाटत नसल्याचं उद्योगमंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. हा घरगुती विषय आहे, त्याला राजकीय मुद्दा बनवू नये, असंही त्यांचं म्हणणं आहे. राज ठाकरेंच्या सिंधुदुर्ग दौऱ्याबाबत प्रतिक्रिया देताना कोणीही आलं तरी आपल्याला फरक पडत नसल्याचं राणे म्हणाले.

गेल्या अनेक दिवसापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याबाबत चर्चा झडत आहेत. मात्र राज ठाकरे यांनी कोल्हापूर सभेत आपण एकत्र येणार नसल्याचे सांगितले... मात्र अजूनही महायुतीच्या नेत्यांना राज ठाकरे परत येतील अशी आशा आहे.

राज ठाकरे यांनी शिवसेनेला टाळी न देता टोला लगावल्याने तुर्तास तरी युतीबाबत काहीही हालचाल दिसत नाही. मात्र युती होण्याच्या शक्यता नाकारता येणार नाही असेही महायुतीच्या नेत्यांना वाटते.

First Published: Thursday, February 14, 2013, 13:24


comments powered by Disqus