कोल्हापूरात आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार, Raj Thackeray in kolhapur

राज ठाकरेंची कोल्हापुरात आज तोफ धडाडणार

राज ठाकरेंची कोल्हापुरात आज  तोफ धडाडणार
www.24taas.com, कोल्हापूर

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ आज कोल्हापुरात धडाडणार आहे... महाराष्ट्राच्या राज्यव्यापी दौऱ्याची पहिली जाहीर सभा कोल्हापुरात राज ठाकरे घेणार आहेत. त्यामुळं त्यांच्या पहिल्या सभेकडे सत्ताधारी पक्षाबरोबर अनेकांचं लक्ष लागलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे हे कुठल्याही मुद्यावर उघडपणे बोलले नव्हते.

त्यामुळं कोल्हापूरच्या सभेत ते सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्यात राज ठाकरे काय तोफ डागतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोल्हापुरात आज राज ठाकरेंची सभा असल्याने मनसैनिकांमध्ये चांगलाच उत्साह संचारला आहे. राज ठाकरेंची तोफ आज धडाडणार असल्याने कोल्हापूरच्या सभेत राज काय बोलणार? शिवसेनेला टाळी देणार की टोला ? याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

First Published: Tuesday, February 12, 2013, 09:30


comments powered by Disqus