रिक्षाचालकांचा 21 ऑगस्टपासून राज्यव्यापी संप

Last Updated: Monday, August 12, 2013, 19:18

राज्यातल्या रिक्षाचालकांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलंय. राज्यभरातले सर्व रिक्षाचालक येत्या २१ ऑगस्टपासून तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. मुंबईत रिक्षाचालक आणि मालक संघटना कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. शरद राव यांच्या नेतृत्वाखाली हा राज्यव्यापी बंद पुकारण्यात आलाय.

अपंग रिक्षाचालकाला गावगुंडाची जबर मारहाण

Last Updated: Wednesday, May 8, 2013, 22:46

वेल्हा तालुक्यातील एका अपंग रिक्षाचालकाला गावगुंडानी जबर मारहाण केली. त्याचे दोन्ही हात गुंडांनी पाईपने ठेचून जायबंदी केलं. एवढं होऊनही आरोपी मोकाटच आहेत.

‘व्हेलेंटाईन डे’ला रिक्षा बंद म्हणजे बोंबाबोंब!

Last Updated: Wednesday, February 6, 2013, 12:23

१४ फेब्रुवारी म्हणजेच ‘व्हेलेंटाईन डे’ला आपल्या पार्टनरसोबत कुठे फिरायला जायचा प्लान करत असाल आणि तेही रिक्षातून प्रवास करत असाल तर सावधान!

भाडं नाकारलं... तर खबरदार!

Last Updated: Saturday, July 14, 2012, 11:22

एकीकडे सार्वजनिक वाहतुकीला त्रासलेले पुणेकर रिक्षावाल्याकडूनही हैराण आहेत. भाडं नाकारून प्रवाशांची सर्रास अडवणूक केली जातेय. अशा भाडं नाकारणाऱ्या रिक्षांवर यापुढे कडक कारवाई होणार आहे.

रिक्षाचालकांनाच नकोय भाडेवाढ...

Last Updated: Friday, April 27, 2012, 19:01

प्रादेशिक परिवहन विभागानं रिक्षांची भाडेवाढ केल्यानंतरही रिक्षाचालक मात्र भाडेवाढ मान्य करायला तयार नसल्याचा अजब नमुना नाशिकमध्ये पाहायला मिळतो आहे. ग्राहक शेअर रिक्षासाठीची ठरवून दिलेली भाडेवाढ मान्य करायला तयार नाहीत.

रिक्षाचालकांचा संप, नागरिकांना कंप

Last Updated: Monday, April 16, 2012, 16:21

रिक्षा भाडेवाढीसाठी ऑटो रिक्षा मेन्स युनियननं पुकारलेल्या बंदमुळे नवी मुंबईतल्या प्रवाशांचे हाल होत आहेत. रिक्षाचालकांच्या बेमुदत संपावरुन शरद रावांनी माघार घेत आज लाक्षणिक संप पुकारला आहे.

रिक्षाचालकांचा आज लाक्षणिक संप

Last Updated: Monday, April 16, 2012, 16:03

रिक्षाचालकांच्या बेमुदत संपावरुन शरद रावांनी माघार घेत आज लाक्षणिक संप पुकारला आहे. सीएनजीपाठोपाठ पेट्रोल रिक्षाच्या दरातही वाढ करण्यात यावी, अशी मागणी ऑटोरिक्षा मालक-चालक संघटना कृती समितीनं केली आहे.

रिक्षाचालकांचा संप.... होणारच....

Last Updated: Sunday, April 15, 2012, 13:26

आज मध्यरात्रीपासून मुंबईकरांना एका त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. राज्य सरकारनं मुंबईतल्या रिक्षाच्या किमान भाड्यात केलेली एक रुपयाची वाढ समाधानकारक न वाटल्यामुळे ऑटोरिक्षा मालक चालक संघटना कृती समितीनं नाराजी व्यक्त केली आहे.

रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर अनिवार्य

Last Updated: Friday, April 13, 2012, 19:44

रिक्षांना इलेक्ट्रनिक मीटर बसवावेच लागतील, या निर्णयावर आज सुप्रीम कोर्टानंही शिक्कामोर्तब केलय. याबाबत रिक्षाचालक संघटनांनी केलेली याचिका युप्रीम कोर्टानं फेटाळून लावलीय. तसंच मुंबई हायकोर्टानं दिलेल्या निर्णयावरही कोर्टानं शिक्कामोर्तब केलंय.

रिक्षाचालकांचा पुन्हा संपाचा इशारा

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 18:05

इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीविरोधात १६ एप्रिलपासून राज्यभरातील रिक्षाचालक संपावर जातील,असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. भाडेवाढ करण्याची रिक्षा संघटनांची मागणी आहे.

रिक्षाचालकांची मुजोरी तर वाढतेच आहे...

Last Updated: Thursday, March 22, 2012, 12:00

नवी मुंबईत भाडेकपातीच्या विरोधात रिक्षाचालकांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. आज दुपारी १२ वाजता याबाबत रिक्षा संघटनांची राज्याच्या सचिवांसोबत बैठक होणार आहे.

नवी मुंबईत रिक्षा संपाने विद्यार्थ्यांची कोंडी

Last Updated: Wednesday, March 21, 2012, 09:42

नवी मुंबईत भाडेकपातीच्या विरोधात रिक्षाचालकांनी संप पुकारल्याने रिक्षा चालकांची मुजोरी कायम असल्याचे दिसून आले. परीक्षाच्या काळात संप पुकारून विद्यार्थ्यांना वेठीस धरले. त्यामुळे पालकवर्गाची तारांबळ उडाली.

रिक्षाचालकांचा संप अटळ- शरद राव

Last Updated: Monday, March 12, 2012, 22:40

राज्यभरातील रिक्षा चालकांनी १५ एप्रिलनंतर बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. रिक्षा संघटनांच्या कृती समितीची आज पुण्यात बैठक झाली. त्यात राज्य सरकारकडं १८ मागण्या मांडण्यात आल्या.

मुजोर रिक्षाचालकांचा संप कायम

Last Updated: Saturday, March 3, 2012, 18:17

मीरारोडमध्ये मुजोर रिक्षाचालकांनी सलग चौथ्या दिवशीही बंद पुकारला आहे.आरटीओनं रिक्षा प्रवासी वाहतूकीचं नविन दरपत्रक जारी केलं होतं. मात्र हे दरपत्रक मान्य नसल्यानं कोणतीही पूर्वसुचना न देता रिक्षाचालकांनी बंद पुकारला.

राज्यातील रिक्षाचालकांची मुजोरी कायम

Last Updated: Friday, March 2, 2012, 08:16

महाराष्ट्र राज्यात बुधवारपासून डिजीटल मीटरची सक्ती करण्यात आली असली, तरी अनेक शहरांमध्ये मीटरप्रमाणं भाडे आकारणी होत नाही. त्यामुळे संतापाचे वातावरण आहे. मुंबईतील मीरारोड आणि नाशिकमध्ये तर मनमानी पद्धतीनं भाडे आकारणी सुरू आहे. तीन आसनी शेअर रिक्षांमध्ये सहा ते सात जणांना कोंबून परिवहन विभागाच्या आशीर्वादानं नाशिककरांची गळचेपी सुरू आहे. रत्नागिरी शहरातही रिक्षाचालकांची मुजोरी दिसून येत आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरील रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट चालली आहे.

रिक्षाचालक होऊ नका मालक...

Last Updated: Saturday, October 22, 2011, 15:53

अतुल सरपोतदार
मनसे म्हणजे राडा इतकंच समीकरण झालं आहे किंबहुना, अशाच काहीतरी वावड्या याबाबत नेहमीच उठत असतात. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच वाईट गोष्टींविरोधात आवाज उठवत आली आहे आणि यापुढेही उठवणारच.

बंद रिक्षा.. प्रवाशांना शिक्षा..

Last Updated: Monday, October 3, 2011, 16:42

महाराष्ट्रातील मुठभर मुजोर रिक्षाचालक. त्यांची मुजोरी ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. काही मुठभरांमुळेच साऱ्या रिक्षाचालंकावरच आज प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. परिवहन विभागानं केलेल्या कारवाईत बोगस मीटरचा पर्दाफाश झाला. दुर्दैवाने या