बँकेतून 15 मिनिटांत 30 लाखांची लूट

Last Updated: Friday, May 23, 2014, 23:18

एखाद्या चित्रपटातील दृश्य असावं, अशा फिल्मी स्टाईलने चोरट्यांनी आग्रामधील विजया बँक लुटली आहे.

सोनिया गांधींच्या नावाने 5 लाख लुटले

Last Updated: Sunday, May 18, 2014, 23:52

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच नाव घेऊन एका बडतर्फ पोलीस हवालदाराने एका संस्थेतील लोकांना साडेपाच लाख रुपयांचा गंडा घातला. दहिसर पोलिसांनी याप्रकरणी मिलिंद साळवी या हवालदाराच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय.

सावधान, लिफ्ट देणं तुमच्या जीवावर बेतू शकत!

Last Updated: Wednesday, December 11, 2013, 09:01

तुम्ही कारने जात आहात अथवा मोटार सायकलने जात असाल तर कोणी लिप्ट मागितली तर ती देऊ नका. तुमची दया तुमच्या जीवावर बेतू शकते. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तसेच नवी मुंबईत असे प्रकार घडले आहेत. बंदुकीचा धाक दाखवून लूटणारी टोळी सक्रीय आहे. अशाच एका टोळीला पोलिसांनी अटक केलेय.

महिलांना संमोहित करुन लुटणाऱ्या भोंदूबाबाला अटक

Last Updated: Thursday, November 7, 2013, 09:01

मुंबईतल्या वडाळा परिसरात एका भोंदू साधूचा पर्दाफाश करण्यात आलाय. महिलांना संमोहित करुन त्यांच्या गळ्यातल्या दागिने घेऊन हा साधू फरार होत असे... राजू चौगुले असं या भोंदू साधूचं नाव आहे...

दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची लूट

Last Updated: Friday, October 25, 2013, 21:23

दिवाळी आणि प्रवाशांची लूट हे जणु समिकरण बनलय. दिवाळीच्या काळात राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी फुल्ल असल्याचं फायदा घेत खाजगी ट्रॅव्हल्स सर्वसामन्य प्रवाशांकडुन अतिरीक्त पैसा उकळतात.

दिवाळीच्या मुहूर्तावर प्रवाशांची लूट!

Last Updated: Sunday, October 20, 2013, 22:09

दिवाळीच्या सणांमुळे खाजगी टूर-ट्रॅव्हल्स कंपन्या प्रवाश्यांची लूट करताना दिसत आहेत. नाशिकमधून गुजरातला जाण्यासाठी ट्रेन नसल्याने ट्रव्हल्स कंपन्या दुप्पट ते तिप्पट भाड्याची आकारणी करण्यात येतेय.

कुरियरवाले बनून आले, लाखो रुपये लुटून नेले!

Last Updated: Sunday, June 30, 2013, 21:24

कुरियर कंपनीचे कर्मचारी असल्याची बतावणी करत घरात घुसलेल्या ३ भामट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लुटल्याचा खळबळजनक प्रकार नागपुरात घडला आहे.

प्रेतांचे अवयव कापून दागिने केले लंपास!

Last Updated: Tuesday, June 25, 2013, 16:59

साधूंच्या रूपातील काही बदमाषांनी पाण्यात तरंगणाऱ्या नोटांवर डल्ला मारला होता. तर काही लुटारूंनी दागिने लुटण्यासाठी क्रुरपणे भाविकांच्या प्रेतांचे अवयवही कापले.

नेपाळी गुंडांकडून भाविकांवर अत्याचार आणि लूट

Last Updated: Friday, June 21, 2013, 22:45

उत्तराखंड राज्यात झालेली ढगफुटी आणि त्यानंत गंगा आणि यमुना कोपल्याने हजारो लोकांचा जीव गेला. तर हजारो लोक वाचले असले तरी ते मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. असे असताना नेपाळी गुंडांकडून हतबल भाविकांवर अत्याचार करण्यात येत असून मौल्यवान दागिन्यांची लूटही करण्यात आलेय.

तृतीयपंथी बनून रहिवाशांना लुटणारी टोळी अटकेत

Last Updated: Wednesday, February 6, 2013, 21:25

तृतीयपंथीयांचा वेष धारण करून रहिवाशांना लुटणाऱ्या एका परप्रांतीय टोळीला नागपूर पोलिसांनी गजाआड केलंय. राज्यात कुठे कुठे अशा लुटीच्या घटना घडल्यात याचा पोलीस आता शोध घेत आहेत..

३०० कोटी रुपयांच्या हिऱ्यांची लूट, एकाची हत्या

Last Updated: Wednesday, December 26, 2012, 17:17

केरळमध्ये शाही परिवाराचे तब्बल ३०० कोटी रुपयांचे हिरे लुटले गेल्याची घटना घडली आहे. यावेळी हरिहर शर्मा या हिरे व्यापाऱ्यांची हत्याही झाली. शाही परिवारातीलच एक असणारे हरिहर शर्मा हिऱ्यांचा सौदा करत असताना ही घटना घडली.

पर्यटकांची लूट बंद करा!

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 09:13

पर्यटकांचं आवडीचं ठिकाण म्हणजे लोणावळा. या लोणावळ्यात गेलेल्या पर्यटकांच्या लूट करण्यात होत असल्याचं आता उघड झालंय.

‘लो लल्ला लूट लो’ला बनवायचाय वर्ल्ड रेकॉर्ड!

Last Updated: Friday, August 17, 2012, 11:37

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आता एक चित्रपट आपल्या नावाची नोंद करण्याच्या तयारीत आहे. ‘लो लल्ला लूट लो’ हा तब्बल दोन तासांचा सिनेमा एकाच टेकमध्ये चित्रित केला जाणार आहे. हा प्रयत्न यशस्वी झाला तर तो निश्चितच नवा रेकॉर्ड असेल.

युवी झाला फीट, रन्सची करणार लूट?

Last Updated: Thursday, August 9, 2012, 00:04

कॅन्सरशी झगडत युवराज सिंगने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्यामुळे आता युवराज पुन्हा एकदा लवकरच मैदानावर परतेल अशी आशा त्याच्या साऱ्या फॅन्सना लागून राहिली आहे.

आजपासून टोल भरू नका, राज ठाकरेंचं आवाहन

Last Updated: Tuesday, July 24, 2012, 12:01

नागरिकांनी आजपासून टोल भरणं बंद करावा, यापुढे कुणीही टोल भरू नये, असं आवाहन राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना केलंय. आता नागरिकांच्या मदतीसाठी आणि संरक्षणासाठी मनसे कार्यकर्ते टोल नाक्यांवर उभे राहणार असल्याचंही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलंय.

महिलेची लूट करून तिघांनी केला बलात्कार

Last Updated: Thursday, June 28, 2012, 23:28

नाशिक जिल्ह्यातील पाढूर्ली गावाजवळ तीन जणांनी एका महिलेची लूट करत तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नाशिकमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे.

प्रवाशांची लूट, टॅक्सी-रिक्षावाल्यांनी केली बेछूट

Last Updated: Wednesday, April 18, 2012, 16:14

मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईकर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. रेल्वे स्टेशन्सवर प्रवाशांची गर्दी उसळल्याने अर्धा ते एक तासाने धावणाऱ्या रेल्वेमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप करावा लागला.

लूट करणाऱ्या खासगी बसला कोर्टाचा चाप

Last Updated: Wednesday, April 11, 2012, 09:20

सुटीच्या काळात खासगी बसचालक बसभाडे दुप्पट ते तिप्पट आकारता. तसेच दर सप्ताहाखेरीस तिकिटांचे दर भरमसाट वाढवून प्रवाशांना लुटणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांना येत्या चार आठवडय़ांत तिकीटाचे दर ठरवून द्यावेत, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. यामुळे मे महिन्यात बाहेरगावी जाणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

बुलढाण्यात दोन संशयित आतंकवादी अटक

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 21:06

औरंगाबादपाठोपाठ बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखलीतून दोन संशयित अतिरेक्यांना अकोला एटीएसनं अटक केली आहे. अकिल मोहम्मद युसूफ खिलजी आणि मोहम्मद जाफर हुसेन कुरेशी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मुजोर रिक्षाचालकांचा संप कायम

Last Updated: Saturday, March 3, 2012, 18:17

मीरारोडमध्ये मुजोर रिक्षाचालकांनी सलग चौथ्या दिवशीही बंद पुकारला आहे.आरटीओनं रिक्षा प्रवासी वाहतूकीचं नविन दरपत्रक जारी केलं होतं. मात्र हे दरपत्रक मान्य नसल्यानं कोणतीही पूर्वसुचना न देता रिक्षाचालकांनी बंद पुकारला.

राज्यातील रिक्षाचालकांची मुजोरी कायम

Last Updated: Friday, March 2, 2012, 08:16

महाराष्ट्र राज्यात बुधवारपासून डिजीटल मीटरची सक्ती करण्यात आली असली, तरी अनेक शहरांमध्ये मीटरप्रमाणं भाडे आकारणी होत नाही. त्यामुळे संतापाचे वातावरण आहे. मुंबईतील मीरारोड आणि नाशिकमध्ये तर मनमानी पद्धतीनं भाडे आकारणी सुरू आहे. तीन आसनी शेअर रिक्षांमध्ये सहा ते सात जणांना कोंबून परिवहन विभागाच्या आशीर्वादानं नाशिककरांची गळचेपी सुरू आहे. रत्नागिरी शहरातही रिक्षाचालकांची मुजोरी दिसून येत आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरील रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट चालली आहे.

'बडे मियाँ, छोटे मियाँ' अटक!

Last Updated: Tuesday, November 29, 2011, 13:27

नागपूर पोलिसांनी अशा एका दुकलीला गजाआड केलंय, ज्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या नाकी नऊ आणले होते.विशेष म्हणजे या चोरांच्या टोळीवर पोलीस नजर ठेऊन होते. मात्र ही टोळी पोलिसांच्या हाती लागत नव्हती.