भविष्य : फुटबॉल वर्ल्डकपमध्ये `शाहीन`ची हॅट्रिक

Last Updated: Thursday, June 19, 2014, 11:31

फुटबॉल वर्ल्डकपमधील भविष्यवाणी करणारा शाहीन सुरुवातील हिरो झाला. त्याने सांगितलेली सुरुवातीची भविष्य अचूक ठरलीत. मात्र, त्यानंतर पुढची तिन्ही भविष्य चुकीची ठरलीत. त्याच्या चुकीच्या भविष्यवाणीची हॅट्रिक झालीय.

आज जाहीर होणार दहावीचा निकाल

Last Updated: Tuesday, June 17, 2014, 10:34

दहावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे.

राज ठाकरेंच्या घोषणेनंतर मनसे लागली कामाला

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 07:59

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः विधनसभा निवडणूक लढण्याची तसंच माहाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची भूमिका व्यक्त केल्यानं पक्षात उत्साहाचं वातावरण आहे. राज ठाकरे यांच्या संकल्पनेतली सत्ता महाराष्ट्रात आणण्यासाठी तसंच या सत्तेचे प्रमुख बनवण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामाला सुरूवात केलीये.

पवारांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करा - राष्ट्रवादी कार्यकर्ते

Last Updated: Friday, June 6, 2014, 19:52

राज्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरचा कार्यकर्त्यांचा विश्वास उडाला आहे. थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करण्याची मागणी पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

रणबीर-कतरिना लग्नाची तारीख लवकर करणार जाहीर

Last Updated: Thursday, June 5, 2014, 18:10

रणबीर आणि कतरिनाच्या लग्नाची तारीख नक्की झाल्याची बातमी पुढे येत आहे. एका इंटरटेन्मेंट चॅनलने दिलेल्या बातमीनुसार रणबीर आणि कतरिना या वर्षाच्या शेवटी लग्न करणार आहे

नोकरी : ‘एसबीआय’मध्ये 5092 जागांसाठी भरती!

Last Updated: Thursday, May 29, 2014, 20:39

देशातील प्रतिष्ठित समजली जाणाऱ्या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये क्लेरिकल ग्रेडमध्ये असिस्टंट पदावर 5092 जागांसाठी भरती जाहीर झालीय.

गौतमचं पुनरागमन; रैनाच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा!

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 18:29

बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यात आलीय. या दौऱ्यात कर्णधारपदाची धुरा सुरेश रैनाच्या खांद्यावर सोपवण्यात आलीय.

नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचं खाते वाटप

Last Updated: Tuesday, May 27, 2014, 11:06

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाची अधिकृत घोषणा झाली आहे. राजनाथ सिंह यांना गृहविभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

राष्ट्रीय पुरस्कारात मराठी चित्रपटांची बाजी

Last Updated: Wednesday, April 16, 2014, 20:29

61 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठी चित्रपटांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. नागराज मंजुळे या नव्या दमाच्या दिग्दर्शकाला उत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला आहे. आजचा दिवस माझा या चित्रपटाला त्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

दिनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा

Last Updated: Sunday, April 13, 2014, 23:23

कला आणि साहित्याच्या क्षेत्रात मानाच्या समजला जाणारा दिनानाथ मंगेशकर पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन, आणि संगीतकार पंढरीनाथ कोल्हापूरे यांना जाहीर झालाय.

LIVEलोकसभा निवडणुका जाहीर, आचारसंहिता लागू

Last Updated: Wednesday, March 5, 2014, 13:21

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या १६व्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आज जाहीर झाली. सहा ते सात टप्प्यांत मतदान होणार आहे.

आता... औषधं मोफत, झोपड्यांचं हस्तांतरणही शक्य!

Last Updated: Wednesday, February 26, 2014, 21:16

निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकारनं जनतेला आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात अनेक घोषणा केल्या आहेत.

CM यांचा घोषणांचा धडाका, तिजोरीत खडखडाट

Last Updated: Friday, February 7, 2014, 17:17

निवडणुकींच्या तोंडावर राज्य सरकारनं एका पाठोपाठ एक नव्या योजनांच्या घोषणांचा धडाका लावला आहे. हा कामांचा धडाका लावला तरी सरकारची तिजोरी खाली असल्यानं या योजनांच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हे कसं शक्य होणार आहे, असा सवालही उपस्थित केला. त्यामुळे या घोषणाच ठरण्याची शक्यता आहे.

स्वतंत्र तेलंगणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Last Updated: Thursday, October 3, 2013, 23:14

केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वतंत्र तेलंगणा राज्याला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी जाहीर केलं.

भारत-ऑस्ट्रेलियात वनडे मालिका, संघ जाहीर

Last Updated: Thursday, September 19, 2013, 15:36

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील महिन्यात वनडे मालिका होत आहे. या मालिकेत सात वनडे तर एक ट्वेंटी-२० सामना होणार आहेत. यासाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे.

दिल्ली गँगरेप : कोर्टानं निर्णय ठेवला राखून, शुक्रवारी सुनावणार शिक्षा

Last Updated: Wednesday, September 11, 2013, 14:45

दिल्ली गँगरेप प्रकरणी दिल्लीतील फास्ट ट्रॅक कोर्टानं आपला निर्णय राखून ठेवलाय. दोषी आरोपींना शुक्रवारी दुपारी अडीच वाजता शिक्षा सुनावण्यात येणार आहेत. चारही आरोपींना काल कोर्टानं दोषी ठरवलं.

‘रॉयल बेबी’च्या जन्माची घोषणा करणारा भारतीय लंडनच्या वाटेवर...

Last Updated: Friday, August 2, 2013, 14:39

इंग्लंडचा राजकुमार जॉर्जच्या जन्माची घोषणा करण्यात मदत करणारा शाही कुटुंबातला सेवक बदर अजीम हा रमजानचा महिना संपल्यावर पुन्हा लंडनला जावू शकतो.

मुंबई खड्डेमुक्तची आयुक्तांची घोषणा पोकळ

Last Updated: Tuesday, July 30, 2013, 08:53

रविवारी रात्रीपर्यंत मुंबई खड्डेमुक्त करण्याची महापालिका आयुक्तांची घोषणा केवळ घोषणाच राहिली आहे. कारण अजूनही मुंबई खड्डेमुक्त करण्यात महापालिकेला यश आलेलं नाही.

भारताच्या द.आफ्रिका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर

Last Updated: Monday, July 8, 2013, 18:38

टीम इंडियाच्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. २१ नोव्हेंबर ते १५ जानेवारी २०१४ असा टीम इंडियाचा भरगच्च दौरा असेल.

रेल्वे मंत्र्यांच्या राज्यासाठी नव्या घोषणा

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 16:45

रेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसल्यानंतर राज्यातल्या खासदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्याची रेल्वे मंत्र्यांनी दखल घेऊन राज्यासाठी नव्या घोषणा केल्या आहेत.

सुभाष तोमर कुटुंबीयांना दहा लाखांची मदत

Last Updated: Wednesday, December 26, 2012, 15:16

केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्लीतील पोलीस हवालदार सुभाष चंद तोमर यांच्या कुटुंबियांना दहा लाख रूपयांचे आर्थिक मदत जाहीर केली आहे.

बॅंक कर्मचाऱ्यांचा २० रोजी संप

Last Updated: Sunday, December 16, 2012, 13:02

सरकारने लोकसभेत मांडलेल्या बँकिंगविषयक विधेयकाचा विरोध करण्यासाठी २० डिसेंबरला संप पुकारण्यात आलाय. त्यामुळे बॅंकांचे व्यवहार बंद राहणार असल्याने याचा फडका सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना बसणार आहे.

शिवसैनिकांना त्रास नको... ऊस आंदोलकांचा 'रास्ता रोको' स्थगित

Last Updated: Saturday, November 17, 2012, 15:33

‘ऊस दराच्या आंदोलनाचं स्वरुप आम्ही बदलतोय, ऊस आंदोलक रास्ता रोको करणार नाही’ अशी ग्वाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलीय.

राज्य सरकारचं शिष्टमंडळ दिल्ली दरबारी

Last Updated: Friday, August 24, 2012, 11:45

दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज दिल्लीला जाणार आहे. पंतप्रधान आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.

दुष्काळ जाहीर, मदतीसाठी केंद्राकडे धावा...

Last Updated: Thursday, August 23, 2012, 11:51

राज्यातल्या १२२ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. राज्य सरकारनं ही घोषणा केलीये. ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस आणि ५० टक्क्यांपेक्षा कमी पेरण्या झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलाय.

आरबीआयच्या घोषणा: टीकावू की दिखाऊ

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 08:25

देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं मह्त्त्वपूर्ण निर्णायांची घोषणा केलीय. देशात डॉलरची आवक वाढवण्यासाठी परदेशी गुंतवणुकी संदर्भातल्या नियमांमध्ये मोठी सूट देण्यात आली. शेअर बाजाराने मात्र या बदलांना नकारात्मक प्रतिसाद दिलाय, तर रुपयाचीही घसरण झालेली दिसून आली.