नायझेरियामध्ये दोन बॉम्बस्फोटात 118 ठार

Last Updated: Wednesday, May 21, 2014, 10:46

नायझेरियामध्ये झालेल्या दोन बॉम्बस्फोटात 118 लोक ठार झालेत. पहिला बॉम्बस्फोट हा गजबजलेल्या एका मार्केटमध्ये झाला तर दुसरा हॉस्पीटलच्या बाहेर झाला. यामध्ये शेकडो लोक जखमी झाले आहेत.

चेन्नईत स्फोट, दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता

Last Updated: Thursday, May 1, 2014, 15:41

चेन्नईत मध्य रेल्वेच्या स्थानकावर दोन स्फोट झाले आहेत. यामध्ये किमात एक ठार तर दहा जण जखमी झालेत. दक्षिण रेल्वेचे महाव्यवस्थापक आर.के. मिश्रा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या स्फोटात एक महिला ठार झाली. तपासासाठी श्वान पथक बोलविण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी गाडीमध्येच लपून बसलेल्या एका संशयीताला अटक करण्यात आले असून हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

चेन्नईत मध्य रेल्वे स्थानकावर दोन स्फोट, महिला ठार

Last Updated: Thursday, May 1, 2014, 09:58

चेन्नईत मध्य रेल्वेच्या स्थानकावर दोन स्फोट झाले आहेत. यामध्ये किमात सात जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. दक्षिण रेल्वेचे महाव्यवस्थापक आर.के. मिश्रा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या स्फोटात एक महिला ठार झाली. तपासासाठी श्वान पथक बोलविण्यात आले.

माओवाद्यांनी केलेल्या सुरुंग स्फोटात आठ ठार

Last Updated: Friday, April 25, 2014, 10:56

झारखंडमधल्या दुमकामध्ये संदिग्ध माओवाद्यांनी केलेल्या सुरुंग स्फोटात सहा निवडणूक कर्मचारी आणि दोन पोलीस शहीद झालेत.

शरद पवारांचा गौप्यस्फोट, माझं एेकलं असतं तर...

Last Updated: Saturday, March 1, 2014, 09:21

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय ऐतिहासिक गौप्यस्फोट. यशवंतराव चव्हाण यांनी आपलं म्हणणं ऐकलं असतं, तर ते त्याचवेळी भारताचे पंतप्रधान झाले असते.

कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाजवळ बॉम्ब स्फोट, ६ ठार

Last Updated: Wednesday, November 27, 2013, 10:23

कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पापासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या इदिन्तकाराई या गावात गावठी बॉम्बचा स्फोट होऊन सहाजण ठार तर दोन जण जखमी झालेत. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे.

मोदींच्या ‘हुंकारा’आधी पाटण्यात साखळी बॉम्बस्फोट

Last Updated: Sunday, October 27, 2013, 13:05

एकामागून एक आठ साखळी स्फोटांनी पाटणा हादरलंय. पहिला स्फोट पाटणा रेल्वे स्टेशनवर दोन आणि गांधी मैदानाजवळ सहा स्फोट झालेत. याच गांधी मैदानावर मोदींची सभा होणार आहे.

अमेरिका नौसेनेच्या केंद्रात स्फोट, आठ जखमी

Last Updated: Wednesday, August 21, 2013, 11:13

अमेरिकेच्या न्यूजर्सी येथील नौसेनेच्या केंद्रात मंगळवारी झालेल्या स्फोटात आठ लोकं जखमी झाल्येत.या भयंकर स्फोटात घायाळ झालेल्यापैकी एक गंभीर जखमी असून स्फोटाचं कारण शोधलं जातय.

खोपोलीत स्टील कंपनीत स्फोट, १० जखमी

Last Updated: Saturday, July 6, 2013, 12:38

रायगड जिल्ह्यातील खोपोलीमधल्या इंडिया स्टील कंपनीच्या भट्टीमध्ये काल रात्री भयंकर स्फोट झाला. यात १० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटानंतर वितळलेल्या लोखंडाचे तीन गोळे बाजूच्या वस्तीच्या दिशेनं फेकले गेले.

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा मृत्यू

Last Updated: Monday, May 6, 2013, 10:27

१९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिका खटल्यातील आरोपी इसाक मोहम्मद हजवाने याचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले.

हिमायत बेगला फाशी!

Last Updated: Thursday, April 18, 2013, 18:11

पुणे जर्मन बेकरी स्फोटातील प्रमुख आरोपी हिमायत बेगला पुणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. १७ जणांच्या मृत्यूला हिमायत बेग जबाबदार आहे.

LIVE - 'हा दहशतवादी हल्ला आहे, भाजप निशाण्यावर'

Last Updated: Wednesday, April 17, 2013, 16:45

बंगळुरूत मल्लेश्वरम परिसरात झालेला स्फोट हा सिलेंडर स्फोट नसून बॉम्बस्फोट असल्याची शक्यता बंगळुरू पोलिसांनी व्यक्त केलीय. या स्फोटात १६ जण जखमी झाले आहेत. झी मीडियाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या स्फोटासाठी आयइडीचा वापर करण्यात आला होता.

अमेरिकेला हादरा !

Last Updated: Wednesday, April 17, 2013, 00:02

१२७ वर्षांची परंपरा असलेल्या बोस्टन मॅरेथॉनला लक्ष्य करण्यात आलंय.. जगातल्या सहा महत्वाच्या मॅरेथॉनपैकी एक अशी ही बोस्टन मॅरेथॉन समजली जाते..

अमेरिकेत साखळी बॉम्बस्फोट; ३ ठार १३० जखमी

Last Updated: Tuesday, April 16, 2013, 12:54

अमेरिकेतल्या बोस्टनवासियांसाठी आजचा दिवस काळा मंगळवार ठरला आहे. शहरात आज झालेल्या ३ स्फोटात ३ जण ठार तर १३० जण जखमी झालेत.

पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट : हिमायत बेग दोषी

Last Updated: Monday, April 15, 2013, 11:54

पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी हिमायत बेग याला शिवाजी सत्र न्यायालयाने दोषी ठरविले आहे.

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटचा आज निकाल

Last Updated: Monday, April 15, 2013, 08:47

पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी हिमायत बेग याच्या विरोधात सुरु असलेल्या खटल्याचा निकाल आज लागणारंय.

हैदराबाद स्फोट : एमआयएमच्या पदाधिका-याची चौकशी

Last Updated: Sunday, February 24, 2013, 09:42

हैदराबादमधील स्फोटप्रकरणी नांदेडमधल्या एमआयएमच्या वरिष्ठ पदाधिका-यांची काल रात्री कसून चौकशी करण्यात आलीय. महाराष्ट्र एटीएसनं ही चौकशी केलीय. एटीएसनं आता एमआयएमवरही लक्ष केंद्रीत केल्याचं दिसून येतंय. कारण यापूर्वीच्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये मराठवाडा कनेक्शन समोर आलंय.

बॉम्बस्फोटाची माहिती द्या, १० लाख जिंका

Last Updated: Sunday, February 24, 2013, 07:44

दिलसुखनगर येथील बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणचं `CCTV` फूटेज पोलिसांना मिळाले आहे. `CCTV`मधला `तो` सायकलस्वार कोण? याची माहिती मिळत नाही. असे असले तरी या स्फोटाविषयी माहिती देणाऱ्याला दहा लाख रूपयांचं बक्षिस देण्याचे जाहीय करण्यात आले आहे. तशी माहिती हैदराबाद पोलीस आयुक्तांनी दिली.

सायकलवर ठेवले होते बॉम्ब

Last Updated: Thursday, February 21, 2013, 21:12

हैदराबादमध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोट झालेत. हे बॉम्ब सायकलवर ठेवण्यात आले होते. गर्दीच्या ठिकाणी हे बॉम्बस्फोट सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडवून आणलेत. या बॉम्बस्फोटात ११ ठार झाले असून ५० पेक्षा जास्त जखमी झालेत.

पाक बॉम्बस्फोटात १७ ठार

Last Updated: Friday, February 1, 2013, 16:56

पाकिस्तानात करण्यात आलेल्या एका बॉम्बस्फोटात १७ जण ठार झालेत. एका मशिदीजवळ आज बॉम्बस्फोट घडवून आणला गेला. या स्फोटात २० पेक्षा अधिक लोक जखमी झालेत.

पुणे स्फोटानंतर मुंबईसह राज्यात हायअलर्ट

Last Updated: Wednesday, August 1, 2012, 21:48

पुण्यात चार स्फोट झाल्यानंतर मुंबईसह राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आले आहे. सर्वत्र कडेकोट बंदोबस्तात वाढ कऱण्यात आली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्येही अलर्ट जारी केला गेला आहे.