पोलिसांची मोगलाई : चार पोलीस निलंबित

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 20:53

उस्मानाबादमधील कनगरा गावात दारूबंदीची मागणी करणाऱ्या ग्रामस्थांना झालेल्या मारहाण प्रकरणी चार पोलिसांना निलंबित करण्यात आलंय.

नोकरीची संधी: राज्यात चौदा हजार पोलिसांची भरती

Last Updated: Monday, April 28, 2014, 09:10

पोलीस दलात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील महिन्यात राज्यात पोलीस भरतीप्रक्रिया सुरू होणार आहे.

कोल्हापुरात पोलीस दलात कॉन्स्टेबल तरुणीचा लैंगिक छळ

Last Updated: Tuesday, February 11, 2014, 11:44

कोल्हापूर पोलीस दलातला लैगिंक छळाचं एक प्रकरण पुढे आलंय. पोलीस मुख्यालयातल्या एका लिपिकाकडून कॉन्स्टेबल तरुणीचा लैंगिक छळ होत असल्याचं निनावी पत्र पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांच्याकडे आल्यानं खळबळ माजलीय.

महिला कॉन्स्टेबलची गोळी झाडून आत्महत्या

Last Updated: Sunday, February 2, 2014, 14:38

महिला कॉन्स्टेबल वैशाली पिंगट यांनी गोळी झाडून आत्महत्या केली आहे. वैशाली पिंगट यांनी ठाण्यातील जीआरपी कार्यालयात स्व:तवर गोळी झाडली असल्याचं सांगण्यात येत आहे.

धक्कादायकः महिला पोलिसाच्या घरातच वेश्या व्यवसाय

Last Updated: Monday, December 30, 2013, 21:42

कोल्हापूर शहरातल्या फुलेवाडी परिसरातल्या महिला पोलीस कर्मचा-याच्या घरात वेश्याव्यवसाय सुरु असल्याचं उघडकीस आलंय.

पुण्यात महिला पोलिसाची पतीनं केली हत्या

Last Updated: Sunday, October 20, 2013, 14:04

पुण्यात एका महिला पोलीस कॉन्स्टेबलची तिच्या पतीनंच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. विशेष म्हणजे हे दोघंही पोलीस विभागात कार्यरत होते. रुपाली साळवी असं मृत महिलेचं नाव असून तिचा पती श्रेयस साळवी याला पोलिसांनी अटक केलीय.

शिवसेना आमदाराला महिला पोलिसाच्या विनयभंगाबद्दल अटक

Last Updated: Thursday, September 26, 2013, 18:20

कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेच्या 16 कार्यकर्त्यांना जुना राजवाडा पोलीसांनी अटक केलीय.राजेश क्षीरसागर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर पोलीस कर्मचा-यांशी हुज्जत घालुन पोलीसांवर दगडफेक करुन दंगल माजविण्याचा प्रयत्न करुन महिला कर्मचा-यांचा विनयभंग केल्याचा गुन्हा पोलीसात दाखल आहे.

लालबागच्या कार्यकर्त्यांनी महिला कॉन्स्टेबलला केली मारहाण?

Last Updated: Monday, September 16, 2013, 20:29

लालबागच्या राजाच्या मंडपात घडणा-या एकेक घटना सातत्यानं समोर येतायत. काल रात्री एका महिला कॉन्स्टेबलला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचं आम्हाला समजलंय.

नऊ वर्ष सावत्र मुलीवर पित्याकडून बलात्कार

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 16:00

आपल्या सावत्र मुलीवर गेली नऊ वर्ष पोलीस काँस्टेबल बलात्कार करीत असल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. पोलीस असणाऱ्या तिच्या वडिलांना पोलिसांनी अटक केलेय.

महिला पोलिसाने केलं ब्लॅकमेल, पुरूषाची आत्महत्या

Last Updated: Monday, June 3, 2013, 13:12

महिला पोलिस कर्मचा-यानं ब्लॅकमेल केले म्हणून एका तरुणानं आत्महत्या केल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडलाय.

महिला कॉन्स्टेबलचा विधान भवनात आत्महत्येचा प्रयत्न

Last Updated: Wednesday, February 27, 2013, 20:59

औरंगाबाद येथील एका पिडीत महिला कॉन्स्टेबलने विधानभवनात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. औरंगाबाद येथील एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने अत्याचार केल्याप्रकरणी ही महिला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री आऱ. आर. पाटील यांची भेट घेण्यासाठी आली होती, अशी माहिती मिळते.

राज ठाकरेंना `रोज` देणाऱ्या पोलिसाचा अजूनही काळा `रोज डे`

Last Updated: Thursday, February 7, 2013, 16:33

आज आंतरराष्ट्रीय `रोज डे` आहे. आज अनेक लोक एकमेकांना प्रेमाने गुलाब पुष्प भेट देतात. मात्र गेल्या वर्षी राज ठाकरेंना गुलाब देणाऱ्या पोलीस नाईक प्रमोद तावडे यांना मात्र अजूनही त्याची किंमत मोजावी लागत आहे.

महिला पोलीस बलात्कार : भाजीभाकरे – बहुरेंना अटक?

Last Updated: Thursday, January 17, 2013, 13:46

औरंगाबादेतील महिला कॉन्स्टेबलच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वैशाली पाटील यांनी दोन सहायक पोलीस आयुक्तांवर बलात्काराचा तर एका एसीपीवर विनयभंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे आदेश बुधवारी दिलेत.

दारुच्या नशेत... महिला पोलीसालाच बदडलं!

Last Updated: Monday, January 14, 2013, 15:47

भाईंदरमध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याला एका युवकाने दारुच्या नशेत मारहाण केल्याची घटना घडलीय. रविवारी रात्री ही घटना घडली. मारहाण झालेली महिला प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक म्हणून भाईंदर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

ACP कडून महिला कॉन्स्टेबलचा छळ

Last Updated: Thursday, December 27, 2012, 22:36

औरंगाबादचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. संदिप भाजीभाकरे यांच्यावर महिला कॉन्स्टेबलनं लैंगिक छळाचा आरोप केलाय. भाजीभाकरेंविरोधात शहरातील सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दिल्ली गँगरेप : आंदोलनाचा पहिला बळी, जखमी पोलिसाचा मृत्यू

Last Updated: Tuesday, December 25, 2012, 09:32

राजधानी दिल्लीत गेल्या आठवड्यात पॅरा मेडिकलच्या एका तरुणीवर चालत्या बसमध्ये झालेल्या पाशवी सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या विरोधार्थ इंडिया गेटवर आंदोलन सुरूच आहे.

पोलिस ठाण्यातच महिला पोलिसाला मारहाण

Last Updated: Monday, October 22, 2012, 21:59

महिला पोलीस अधिका-याला पोलीस ठाण्यातच मारहाण झाल्याची घटना विरारमध्ये घडलीये. सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं नाव प्रियतमा मुंडे असं आहे. मानव सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केलीये.