बुलढाण्यात दोन संशयित आतंकवादी अटक

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 21:06

औरंगाबादपाठोपाठ बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखलीतून दोन संशयित अतिरेक्यांना अकोला एटीएसनं अटक केली आहे. अकिल मोहम्मद युसूफ खिलजी आणि मोहम्मद जाफर हुसेन कुरेशी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

काँग्रेस आमदारांची मुख्यमंत्री हटाव मोहीम!

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 20:26

कामं होत नसल्यानं संतप्त झालेल्या आमदारांनी गुप्त बैठक घेऊन मुख्यमंत्री हटाव मोहीम सक्रीय करण्याचं ठरवलंय. विदर्भातील काँग्रेसच्या १०-१२ आमदारांनी मुख्यमंत्री हटाव सुरु केलीय.

नक्षलवादी हल्ल्यात १२ जवान शहीद

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 18:20

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील पुश्तोळा गावाजवळ नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात सीआरपीएफचे १५ जवान ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. आज सीआरपीएफचे जवान गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला.

काँग्रेसने अजितदादांना कोंडीत पकडलं....

Last Updated: Monday, March 26, 2012, 22:36

स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीवरून विरोधी पक्षांबरोबरच काँग्रेसनंही अर्थमंत्री अजित पवारांना खिंडीत गाठून दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे..... दरवाढीमुळे सर्वसामान्यांचा रोष वाढणार हे लक्षात येताच काँग्रेसनं विरोधाची भूमिका घेतली....

बजेटमधील दरवाढीला काँग्रेसचा विरोध

Last Updated: Monday, March 26, 2012, 18:54

बजेटवरून विरोधकांनी सत्ताधा-यांना लक्ष केलं असताना आता सत्ताधारी काँग्रेसचे आमदारही बजेटवर नाराजी व्यक्त करू लागलेत.... विशेषतः स्वयंपाकाचा गॅस आणि सीएनजी महागल्यानं थेट सर्वसामान्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, त्यामुळे काँग्रेसचे आमदार बजेटवर नाराज आहेत....

अजितदादांनी सर्वसामान्यांना ठेवलं गॅसवर

Last Updated: Monday, March 26, 2012, 16:52

राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवारांनी सन २०१२-१३ च्या अर्थसंकल्पात एकीकडे घरगुती गॅसवर पाच टक्के कर वाढवल्याने त्याची झळ सर्वसामन्यांना बसणार आहे. तर दुसरीकडे राज्यातील विभागवार विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच विविध सामाजिक घटक, ग्रामीण आणि शहरी भागातील पायाभूत सूविधांसाठी तरतूदीकडे लक्ष दिलं आहे. यंदाचा अर्थसंकल्प दोन हजार कोटी रुपयांच्या आर्थिक तूटीचा आहे. विक्रीकर संकलनात २० टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत चार हजार कोटी रुपयांनी अधिक आहे.

शिक्षकच दाखवतायेत विद्यार्थ्यांना पॉर्न फिल्म

Last Updated: Sunday, March 25, 2012, 18:28

ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संस्कार शिकवणं अपेक्षित आहे. त्यांनीच शाळेतील संगणकावर विद्यार्थ्यांना अश्लील चित्रफीत दाखवण्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोलीतील एका दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेत उघडकीस आला आहे.

शिवसेना-भाजपची आता वेगळी चूल

Last Updated: Saturday, March 24, 2012, 15:39

भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्याच चंद्रपूर शहरात महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप यांनी वेगळी चूल मांडली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात विदर्भासाठी मोठी तरतूद करण्याची मागणी करण्यात येते आहे.

राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा

Last Updated: Thursday, March 22, 2012, 18:28

केंद्र सरकारच्या बजेटकडून मोठा अपेक्षाभंग झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा आहेत त्या राज्य सरकारच्या बजेटकडून... शिक्षण, उद्योग, व्यापार, शेती आणि अर्थातच सामान्यांच्या नजरा आता राज्य सरकारच्या बजेटकडे लागल्या आहेत.

राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये संधीसाधू राजकारण!

Last Updated: Wednesday, March 21, 2012, 21:05

राज्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुसंख्य ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं बाजी मारलीय. तर अनेक संधी साधू युती पहायला मिळाल्यात. मनसेनं ठाणे, औरंगाबादेत शिवसेना-भाजप युती धक्का दिलाय.