झेडपीत नवी समीकरणं उदयास

Last Updated: Wednesday, March 21, 2012, 20:31

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी नवी राजकीय समीकरणे उदयाला आलीत. काँग्रेसला ठिकठीकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं दणका दिलाय.यवतमाळमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं दणका दिलाय.

नागपूर झेडपीमध्ये कोणची येणार सत्ता?

Last Updated: Wednesday, March 21, 2012, 08:38

नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाकरिता आज होणाऱ्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. वरकरणी भाजप-शिवसेनेकडे बहुमत असल्यामुळे त्यांची सत्ता येण्याची चिन्ह आहे.

सेनेचे नगरसेवक काँग्रेस पळवणार???

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 09:20

नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक होणार आहे. या निवडणूकीसाठी आघाडी आणि महायुती सज्ज झाली असून सदस्यांची पळवापळवी टाळण्यासाठी शिवसेनेनं आपल्या सर्व सदस्यांना अज्ञात स्थळी पाठवलं आहे.

करा मटण पार्टी, जिंका निवडणूक

Last Updated: Monday, March 19, 2012, 12:56

निवडणुका आणि ओल्या पार्ट्या हे समीकरण काही आता नवं राहिलेलं नाही. मात्र मटणाची पार्टी एका ठराविक विक्रेत्याकडील बकरे खरेदी करुन केल्यास निवडणुका जिंकता येतात असं तुम्ही कधी ऐकलंय का, मात्र असं घडलं आहे.

'लिव्ह इन रिलेशनशिप'ला रा.स्व.सं.चा विरोध

Last Updated: Saturday, March 17, 2012, 16:28

‘लिव्ह इन रिलेशनशिप’ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला आहे. अशाप्रकारे ‘लिव्ह इन रिलेशन’ मानव संस्कृतीविरोधात असून समाजासाठी घातक असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहकार्यवाहक दत्तात्रय होसबले यांनी व्यक्त केलंय.

पाच महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

Last Updated: Tuesday, March 13, 2012, 16:18

पाच महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम आज राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन यांनी जाहीर केला आहे. भिवंडी, परभणी, लातूर, मालेगाव आणि चंद्रपूर या महापालिकांसाठी पंधरा एप्रिलला मतदान होणार आहे.

नागपूरमध्ये शिवसेना ठरणार भाजपच्या वरचढ

Last Updated: Monday, March 12, 2012, 21:29

नागपूर महापालिकेत भाजपनं शिवसेनेला डावलल्यानं आता जिल्हा परिषदेत शिवसेना महत्त्वाची पदं पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळं काठावर बहुमत असलेल्या भाजपपुढच्या अडचणी वाढल्या आहेत.

विदर्भात रेल्वेतही अनुशेष

Last Updated: Monday, March 12, 2012, 21:10

गेल्या एक दशकापासून विदर्भातला अमरावती-नरखेड प्रकल्प अपूर्ण आहे. शिवाय अनेक नव्या रेल्वेमार्गाच्या मागण्याही प्रलंबित आहेत. त्यामुळे 14 मार्चला सादर होणा-या रेल्वे अर्थसंकल्पात नागपूरकरांच्या या मागण्यांना विचारात घेऊन विदर्भाच्या विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होतेय.

बिबट्या अडकला विहीरीत

Last Updated: Sunday, March 11, 2012, 22:31

वन विभागाच्या चमूने लाकडी शिडी टाकून बिबट्याला बाहेर येण्यासाठी मार्ग उपलब्ध करुन दिला मात्र तब्बल २ तासांनंतरही बिबट्याला बाहेर काढण्यात वनविभागाला यश आलं नाही

अकोल्यात अर्भकाच्या वाट्यास नरक याताना

Last Updated: Sunday, March 11, 2012, 16:28

अकोल्यातल्या जिल्हा सरकारी रुग्णालयात स्त्री अर्भकाचे कुत्र्याने लचके तोडल्याची हृदयद्रावक घटना घडलीय. तीन ते चार कुत्र्यांनी झुडपात अर्भकाचे लचके तोडले.