होळीनिमित्त दारूची तस्करी

Last Updated: Thursday, March 8, 2012, 08:57

होळीनिमित्त मध्य प्रदेशातून तस्करी करून राज्यात आणला जाणारा विदेशी दारूचा मोठा साठा नागपूरच्या उत्पादन शुल्क विभागानं जप्त केला आहे.

यवतमाळमधील वाहनचोर अटकेत

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 16:27

यवतमाळ पोलीस ठाण्यात दर दिवशी एक ना एक वाहनचोरीची तक्रार दाखल होत असे. कारण शहरात वाहन चोरांनी उच्छाद मांडला होता. मात्र आता नागरिकांनी तुर्तास सुटकेचा निश्वास टाकला आहे. कारण ती अट्टल वाहनचोरांची पोलिसांनी गजाआड केली आहे.

कापूस निर्यातबंदी, शेतकऱ्यांचे आंदोलन

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 16:57

केंद्राने कापूस निर्यातीवर बंदी घातल्यानं त्यावर आता तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विविध शेतकरी संघटना निर्यातबंदीविरोधात आक्रमक झाल्या आहेत.

संपावर बस, पालक-विद्यार्थी 'बे'-बस

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 16:54

राज्यभरातील बस मालक ९ तारखेपासून बेमुदत संपावर जाणार आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यभरातल्या बसने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होण्याची शक्यात आहे. बस मालक संघटनेच्या सदस्यांना मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली.

होळीनिमित्त बंजारा समाजाचं 'लेंगी नृत्य'

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 09:27

आज देशभरात होळीचा उत्सव साजरा होत आहे. विविध ठिकाणी होळी साजरी कऱण्याच्या अनोख्या परंपरा आहेत. बंजाराबहुल यवतमाळ जिल्ह्यात सध्या तांड्यातांड्यावर लेंगी नृत्याची धमाल अनुभवायला मिळत आहे.

नागपूरमध्ये घातक भेसळयुक्त मध

Last Updated: Saturday, March 3, 2012, 22:07

नागपूरमध्ये भेसळयुक्त मध जप्त करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. हे भेसळयुक्त मध शरिराला घातक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे नागपूरकर धास्तावले आहेत.

३५ विद्यार्थी परीक्षेला अपात्र, शाळेची बनवाबनवी

Last Updated: Friday, March 2, 2012, 14:21

चंद्रपुरातील दहावीच्या ३५ विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेलं आहे. इथल्या सेंट मायकेल्स इंग्लिश स्कूलनं सीबीएसई बोर्डाची मान्यता नसतानाही ३५ विद्यार्थ्यांची दिशाभूल करत प्रवेश दिला.

मनसेमुळे फुलणार भाजपचं 'कमळ'

Last Updated: Friday, March 2, 2012, 14:00

नागपूर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी मनसे भाजपला मतदान करणार आहे. नागपूर महापालिकेत मनसेचे दोन नगरसेवक आहेत या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

किटाळी गावात वाघाचा मृत्यू

Last Updated: Friday, March 2, 2012, 09:11

चंद्रपूरजवळच्या किटाळी गावात एका वाघाचा मृत्यू झाला आहे. पूर्ण वाढीच्या एका वाघाचा मृत्यू झाल्याची बाब गस्तीवर असणा-या कनिष्ठ वन कर्मचा-यांच्या लक्षात आली.