मुंबईचं शांघाय आता नागपूरचं सिंगापूर?

Last Updated: Monday, February 13, 2012, 15:03

अनेक वर्ष सत्ता उपभोगून सुध्दा काँग्रेसला मुंबईचं शांघाय करता आलेलं नाही ते नागपूरचं सिंगापूर काय करणार असा सवाल भाजपचे प्रदेश अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसला विचारला आहे.

अमरावतीतील रोकड हा पक्षनिधी- ठाकरे

Last Updated: Monday, February 13, 2012, 14:46

अमरावतीत नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी जप्त केलेल एक कोटी रूपये हा पक्षनिधी असल्याचा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे. उमेदवारांना हा पैसा देण्यात येणार असल्याचं माणिकरावांनी सांगितलय. काल अमरावती पोलिसांनी एका गाडीतून एक कोटींची रक्कम जप्त केली होती. फोर्ड गाडीतून हे पैसै आणण्यात आले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पैसा मतदारांना वाटण्यासाठी आणण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र हा पैसा पक्षनिधी असल्याचं माणिकरावांनी स्पष्ट केलं.

अमरावतीत पैसे काँग्रेसनं पाठवले - पोलीस आयुक्त

Last Updated: Sunday, February 12, 2012, 22:55

अमरावतीमध्ये नाकाबंदीदरम्यान जप्त केलेली रक्कम काँग्रेसनं पाठवल्याच्या पोलीस आयुक्तांच्या स्पष्टीकरणानंतर खळबळ उडाली आहे. त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

अमरावतीमध्ये एक कोटी रुपये जप्त

Last Updated: Sunday, February 12, 2012, 13:50

अमरावतीमध्ये पोलिस नाकाबंदीत फोर्ड एन्डेव्हर गाडीतून एक कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. अमरावती महापालिकेच्या निवडणुकीसाठी या पैशांचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

नागपूरमध्ये नात्यांचे 'महाभारत' !

Last Updated: Saturday, February 11, 2012, 15:06

नागपूरमध्ये सर्वच पक्षांनी नेत्यांच्या सग्यासोयऱ्यांनाच तिकीटं वाटली आहेत. आई- वडील अपक्ष तर मुलगा मनसेकडून, काका विरुद्ध पुतण्या, काका विरुद्ध पुतणी अशाही लढती रंगत आहेत.

निवडणुकीतल्या प्रचारासाठी काँग्रेसचे क्लासेस !

Last Updated: Friday, February 10, 2012, 16:17

निवडणुक जिंकण्यासाठी उमेदवार किंवा राजकीय पक्ष प्रचारात कुठलीच कसर ठेवत नाहीत. नागपुरमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना नेत्यांनी प्रचाराच्या टीप्स दिल्या. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी क्लासेस घेतले.

भाजपचं 'डर्टी' कांड, राष्ट्रवादीचं भांडवल!

Last Updated: Friday, February 10, 2012, 13:17

राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांसाठी ज्वलंत प्रश्नांची कमतरता नाही. पण फोडणीसाठी एकादा नवीन खमंग मुद्द हवा हे जाणूनच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता भाजपला घेरण्याची तयारी केली आहे.

निवडणुकीतील 'नातीगोती'

Last Updated: Thursday, February 9, 2012, 23:42

नागपूरमध्ये सर्वच पक्षांनी नेत्यांच्या सग्यासोयऱ्यांना तिकीटं वाटली आहेत. आई- वडील अपक्ष तर मुलगा मनसेकडून, काका विरुद्ध पुतण्या, काका विरुद्ध पुतणी अशाही लढती रंगत आहेत. तीन कार्यकर्ते एकाच कुटुंबातले असून तिघेही महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.

माणिकराव ठाकरेंवर गुन्हा दाखल

Last Updated: Thursday, February 9, 2012, 19:57

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

माणिकरावांचं मानसिक संतुलन बिघडलंय- राठोड

Last Updated: Wednesday, February 8, 2012, 09:36

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचा टोला, शिवसेना आमदार संजय राठोड यांनी लगावला आहे. मुलाला विजयी करण्यासाठी ते माझ्यावर खोटे आरोप करत असल्याचंही राठोड यांनी म्हटलं.