रवी राणाविरूद्ध आचार संहिता भंगाची तक्रार

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 22:13

मतदारांना आकर्षित करण्यासाठी मतदारांना लक्झरी बसनं तीर्थ यात्रेला पाठवून आचार संहिता भंग केल्याची तक्रार बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणांविरूध्द पोलिसांकडे करण्यात आली होती, त्यानुसार पोलिसांनी आठ ते दहा शेगावला जाणाऱ्या लक्झरी बसेसची चौकशीही केली.

गडचिरोलीत काँग्रेस उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 13:15

गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे काँग्रेस उमेदवार बंडोपंत मल्लेवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपुरात दारुचा मोठा साठा जप्त

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 14:01

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात मोठ्या प्रमाणात दारु पकडण्यात आली.

मिनी विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 12:37

मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी आज राज्यातील मतदार आपला कौल देतील. राज्यात २७ जिल्हा परिषदा आणि ३०५ पंचायत समित्यांसाठी निवडणुकांसाठी मतदानाला सुरवात झाली आहे.

चंद्रपुरात ग्रंथ प्रसाराचा जागर

Last Updated: Monday, February 6, 2012, 13:26

चंद्रपुरातल्या 85 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात विक्रमी पुस्तक विक्री झाली. संमेलनात तब्बल तीन कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

अकोल्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हल्लाबोल

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 18:29

अकोल्यात संतप्त कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ला केलाय. तिकीट न मिळाल्याच्या निषेधार्थ शहराध्यक्ष संदिप पुंडकर यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली

काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचा गोंधळ

Last Updated: Saturday, February 4, 2012, 19:08

महापालिका निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या रोषाचा फटका नेत्यांना बसला. एबी फॉर्मवरून महिला कार्यकर्त्या संतापल्या होत्या. त्याचा फटका सरचिटणीस आणि स्थानिक खासदार विलास मुत्तेमवारांना बसला.

चंद्रपूर साहित्यनगरीत 'माय मराठी'चा जयघोष

Last Updated: Saturday, February 4, 2012, 09:04

डोईवर ग्रंथ घेतलेल्या पारंपरिक वेशभूषेतील तरुणी, शिस्तबद्ध लेझीमपथक, मोरपंखांची टोपी घातलेला वासुदेव, अंगावर फटके मारणारा मरीआईचा भोप्या, अश्‍वारूढ मावळे, सजावट केलेले उंट, वाद्यवृंद पथकासह राष्ट्रसंतांच्या भजनांच्या सुरांनी नटलेल्या ग्रंथदिंडीने केलेल्या ‘माय मराठी'च्या जयघोषात अवघी चंद्रपूरनगरी दुमदुमून गेली. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभामंडपात न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन झाले.

मराठी साहित्य संमेलनाचं आज उदघाटन

Last Updated: Friday, February 3, 2012, 12:17

महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण महोत्सव आणि चंद्रपूर शहराची पंचशताब्दी या पार्श्वभूमीवर ८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उदघाटन आज होतंय.

४८ तास इमारत अपघाताचे मदतकार्य सुरूच

Last Updated: Thursday, February 2, 2012, 12:54

नागपूरच्या डिप्टीसिग्नल या भागात कोसळलेल्या इमारतीखाली अडकलेल्या मजुरांना ४८ तासांनंतरही बाहेर काढण्यात अपयश आल आहे. बचाव दलाला अत्तापर्यंत ५ मजुरांचे मृतदेह बाहेर काढता आले आहेत.