उपमहापौरपदासाठी सेना X भाजप

Last Updated: Thursday, March 1, 2012, 19:25

नागपूरमध्ये उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. भाजपनं महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार जाहीर केलेत. तर शिवसेनेनं उपहापौरपदासाठी अलका दलाल यांना उमेदवारी दिली.

नागपुरात महायुतीत तणाव

Last Updated: Thursday, March 1, 2012, 13:42

नागपुरात महायुतीत तणाव निर्माण झालाय. नागपूरच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी भाजपनं उमेदवारी अर्ज दाखल केलाय. हा अर्ज दाखल करुन भाजपनं एकप्रकारे उपमहापौरपद शिवसेनेला देण्यास विरोध केलाय.

माकडाचा पाठलाग बिबट्याच्या जीवावर

Last Updated: Thursday, March 1, 2012, 08:35

माकडाची शिकार करण्यासाठी त्याचा पाठलाग करणाऱ्या बिबट्याला त्याचा प्रयत्न महागात पडला आहे. भरधाव रेल्वेची धडक लागल्याने बिबट्या गंभीर जखमी झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही रेल्वेस्थानकाजवळ घडली.

खंडणीप्रकरणी तिघांना अटक

Last Updated: Thursday, March 1, 2012, 09:26

चिखलीमधून प्रसिद्ध होणा-या साप्ताहिक विदर्भ वंदनच्या मुख्य संपादक, मंहेश गोंधने, कार्यकारी संपादक विजय गोंधने यांना खंडणी मागितल्या प्रकरणी रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

पालिकेत हाणामारी, मनसे नगरसेवकांवर गुन्हा

Last Updated: Tuesday, February 28, 2012, 19:24

यवतमाळ जिल्ह्यातील वणी नगरपरिषदेत मनसे आणि अपक्ष नगरसेवकांत हाणामारी झाली असून नगरसेवकांनी खुर्च्याची फेकाफेक केल्याने दोन नगरसेविका जखमी झाल्या आहेत.

नागपूर शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Last Updated: Tuesday, February 28, 2012, 09:57

महापालिका निवडणुकांनंतर नागपूर शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना जिल्हाध्यक्ष शेखर सावरबांधे आणि शहराध्यक्ष सूरज गोजे यांच्यात हाणामारी झाली आहे.

नागपुरात विलास गरुडांना मारहाण

Last Updated: Monday, February 27, 2012, 19:07

गपुरात बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांना मारहाण करण्यात आलीये. बसपाच्या कार्यकर्त्यांनीच गरुड यांना मारहाण केलीये. महापालिका निवडणुकीत तिकीट विकल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.

शिवसेनेशिवाय भाजपने 'करून दाखवलं'

Last Updated: Saturday, February 25, 2012, 21:11

नागपूरात परस्पर विरोधी विचारधारा असलेले राजकीय पक्ष सत्तेसाठी एकत्र आले आहेत. भाजपप्रणीत नागपूर विकास आघाडीमध्ये इंडियन मुस्लीम लीगनं प्रवेश केला आहे.

सीमावर्ती भागात नक्षली शाळा

Last Updated: Saturday, February 25, 2012, 13:59

नक्षलदलात भरती झालेल्यांच्या मनात व्यवस्थेविषयी व्देष निर्माण करण्यासाठी राज्याच्या सीमावर्ती भागात नक्षली शाळा सुरु करण्यात आली आहे. त्यात शिकवणा-या 2 नक्षल्यांनी गडचिरोलीत आत्मसमर्पण केले आहे.

बाळसाहेबांपर्यंत फोन पोहचत नाहीः गडकरी

Last Updated: Thursday, February 23, 2012, 16:28

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या भावनेविषयी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.