'स्वदेस' घडवायला, शास्त्रज्ञ निवडणुकीत

Last Updated: Thursday, February 2, 2012, 12:48

निवडणूक आली की राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांशिवाय अनेक हवशे-गवशे-नवसे निवडणुकीच्या आखाड्यात उतरतात. मात्र अमेरिकेत शिकलेला, नासामध्ये नोकरी केलेला एक तरुण झेडपीच्या आखाड्यात उतरला आहे.

नागपुरात इमारत कोसळून दोन ठार

Last Updated: Tuesday, January 31, 2012, 08:37

नागपूरच्या चिरवली ले आऊट परिसरात सात मजली इमारत कोसळलीय. त्यात दोघांचा मृत्यू झालाय तर ११ व्यक्तींना बाहेर काढण्यात यश आलं.

नक्षलवाद्यांकडून भामरागड सभापतींची हत्या

Last Updated: Saturday, January 28, 2012, 11:42

गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा नक्षलवाद्यांनी धुडगूस घातला आहे. भामरागड पंचायत समितीचे सभापती बहादुरशहा आलम यांची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकारामुळे नक्षलवादी पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

गडचिरोलीत जिल्हा परिषद निवडणुकीचे पडघम

Last Updated: Friday, January 27, 2012, 22:30

गेल्या पाच वर्षातल्या कामामुळे तसंच केंद्रात आणि राज्यातही काँग्रेसचं सरकार असल्यामुळं यावेळीही गडचिरोली झेडपीत काँग्रेसची सत्ता येईल असा त्यांच्या नेत्यांना विश्वास वाटत आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी गृहमंत्री आर आर पाटील यांनी घेतली आहे.

अकोल्यात पण युती तुटणार?

Last Updated: Friday, January 27, 2012, 22:22

अकोला महापालिकेच्या निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती तुटण्याच्या मार्गावर आहे. नाशिकमध्ये युतीचं फिस्कटल्यानंतर अकोल्यात देखील तिच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता अकोला महानगरपालिकेसाठी युती एकत्र लढणार का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

कोण करतयं शिकार वाघाची???

Last Updated: Thursday, January 26, 2012, 20:18

चंद्रपूरच्या चांदा जंगलात एका वाघाची विजेचा शॉक देऊन शिकार केल्याची धक्कादाय़क घटना उघडकीस आली आहे. चांदा भागातील झरणच्या जंगलात एका वाघाचा कुजलेला मृतदेह आढळून आला.

नागपुरात दारु तस्करी

Last Updated: Wednesday, January 25, 2012, 11:17

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपुरात दारु तस्करीचं प्रमाण वाढलयं. मध्य प्रदेशात मिळणारी स्वस्त दारु नागपुरात बेकायदा आणली जातेय. या विरोधात पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागानं धडक मोहीम उघडली आहे.

साहित्य संमेलनातून मंत्र्यांची 'EXIT'

Last Updated: Tuesday, January 24, 2012, 14:38

चंद्रपूर इथं ३ ते ५ फेब्रुवारीला होणारे साहित्य संमेलनही आचारसंहितेच्या कचाट्यात सापडलं आहे. या संमेलनाला मुख्यमंत्र्यांसह कोणत्याही मंत्र्यांना हजेरी लावण्यास राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी मनाई केली आहे.

आजी आजोबांना राहयचयं 'लिव्ह-इन' मध्ये

Last Updated: Monday, January 23, 2012, 21:10

आयुष्याच्या संध्याकाळी एकट्या असलेल्या किंवा जोडीदार सोडून गेलेल्या आजी-आजोबांना लिव्ह-इन रिलेशनशिपच्या धर्तीवर जोडीदारांची गरज भासते आहे. नागपुरात या धर्तीवर मंडळ स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या निमित्तानं कित्येक आजी-आजोबांनी नवा जोडीदार शोधायला सुरुवात केली आहे.

शिवसेना कौनसे खेत की मुली है - आझमी

Last Updated: Monday, January 23, 2012, 19:30

सपाचे आमदार अबू आझमी यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला 'टार्गेट' करत शिवसेनेवर चांगलीच टीका - टिप्पणी केलेली आहे. 'शिवसेना कौनसे खेत की मुली है' असं म्हणून अबू आझमी यांनी शिवसेनेला अगदीच तुच्छ लेखलं आहे.