चंद्रपूरात वैद्यकिय महाविद्यालय नाहीच

Last Updated: Friday, January 6, 2012, 09:27

चंद्रपूरमध्ये वैद्यकिय महाविद्यालय व्हावं ही अनेक दिवसांपासूनची मागणी आहे, तशी सरकारनकडून आश्वासनसुद्धा अनेकवेळा दिली गेली, पण ती फक्त आश्वासनचं राहिली आहेत. यावर्षी ही मागणी पूर्ण होईल अशी अपेक्षा होती, मात्र सरकारने पुन्हा एकदा चंद्रपूरवासियांच्या तोंडाला पानं पुसली आहेत.

नागपूर : तलावात बुडून ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Last Updated: Tuesday, January 3, 2012, 12:34

नागपूरमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला दुर्दैवी घटना घडली आहे. अभियांत्रिकी कॉलजेच्या तीन विद्यार्थ्यांना पोहताना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

विकास आमटेंना चंद्रपूर भूषण पुरस्कार

Last Updated: Monday, January 2, 2012, 09:15

बाबा आमटे यांचे पुत्र डॉक्टर विकास आमटे यांना यंदाचा चंद्रपूर भूषण पुरस्कार देण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सरकारी धोरणांवर जोरदार टीका केली.

शिक्षक नोकर भरतीतही आता घोटाळा

Last Updated: Sunday, January 1, 2012, 15:33

शिक्षण क्षेत्रामध्ये घोटाळा हे काही नविन नाही. पण आता शिक्षण क्षेत्रातील नोकर भरतीमधील सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. अकोल्याच्या पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या ८३ वरिष्ठ आणि कनिष्ठ संशोधन सहाय्यकांना बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली आहे.

'स्टार बस'चा रखडलेला मुद्दा

Last Updated: Thursday, December 29, 2011, 09:33

नागपूरच्या स्टार बसचा मुद्दा महापालिका निवडणूकीत पुन्हा गाजण्याची चिन्हे आहेत. मात्र समस्येकडं लक्ष देण्याऐवजी राजकीय पक्ष निवव्ळ आरोप प्रत्यारोप करत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.

विजेच्या टॉवरवर तळीरामची 'वीरुगिरी'

Last Updated: Sunday, December 25, 2011, 21:13

नागपूरमधल्या वाडी इथं वीजेच्या अतिउच्च दाबाच्या टॉवरवर चढून एका तरुणानं वीरुगिरी करत सगळ्यांनाच जेरीस आणलं. पत्नीशी भांडण झाल्यामुळे हा तरुण दारूच्या नशेत टॉवरवर चढला होता.

कवी ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार

Last Updated: Thursday, December 22, 2011, 06:46

ज्येष्ठ कवी ग्रेस ऊर्फ माणिक गोडघाटे यांना २०११चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. ‘वाऱ्याने हलते रान' या त्यांच्या ललितबंध संग्रहाला हा सन्मान मिळाला आहे.

गडकरी मोकळ्या मनाचा माणूस - राज

Last Updated: Wednesday, December 21, 2011, 11:56

राज ठाकरे आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी एकाच मंचावर हजर होते, राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्याच शैलीत पत्रकारांवर हल्ला चढवला. तर दुसरीकडे या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर कौतुकांचा वर्षाव केला.

नक्षलवाद्यांनी केली तरूणाची हत्या

Last Updated: Wednesday, December 21, 2011, 06:51

गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तहसिलच्या भेंडीकणार या गावात एका २१ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. पहाटे झोपेतून उठवून,गावाबाहेर नेऊन त्याच्या डोक्यावर बार करुन त्याला ठार करण्यात आलं.

सीमावादावर राज ठाकरे करणार गडकरीशी चर्चा

Last Updated: Wednesday, December 21, 2011, 06:51

बेळगाव सीमाप्रश्नी मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची आज भेट घेण्याची शक्यता आहे. राज यांचं आज सकाळी नागपुरात आगमन झालं आहे.