नाशिकमध्ये चोर सोडून संन्याशालाच फाशी

Last Updated: Friday, April 20, 2012, 17:35

वाहनचोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी नवं फर्मान सोडलंय. शहरात ज्या वाहनांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार होईल त्याची माहिती पोलिसांना देणं बंधनकारक करण्यात आलंय.

नाशिकमध्ये बिबट्याची दहशत

Last Updated: Thursday, April 19, 2012, 20:59

बिबट्याने नागरी वस्तीत येऊन धुमाकूळ घातल्याने नाशिक जिल्ह्यात अद्याप दहशत आहे. बुधवारी दिंडोरी तालुक्यातील मांदाणे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 2 जण गंभीर जखमी झाले तर एका जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सेनेने नाशिकमध्ये केला मनसेचा 'गेम'

Last Updated: Wednesday, April 18, 2012, 21:23

आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या नाशिक स्थायी समितीच्या निवडणुकीत काँग्रेसनं बाजी मारत मनसेला झटका दिला आहे. उद्धव निमसे यांनी मनसेच्या अशोक मुर्तडक यांना ९ विरुद्ध ७ मतांनी पराभव केला.

औरंगाबाद खंडपीठाचे अधिकाऱ्यांवर ताशेरे

Last Updated: Tuesday, April 17, 2012, 20:15

मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्याच्या तीन महत्वाच्या अधिकाऱ्यांविरोधात प्रतिज्ञापत्रात जाणिवपूर्वक खोटी माहिती दिल्याबद्दल ताशेरे ओढून नोटीस बजावली आहे.

मालेगावात पुन्हा 'कांदोलन'

Last Updated: Tuesday, April 17, 2012, 20:09

कांदा दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरु केलेलं आंदोलनं आता चांगलचं पेटलंय. खासदार राजू शेट्टींसह ३ ते ४ हजार शेतकऱ्यांना अटक करण्यात आलीय. मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये आंदोलनकर्ते जमलेत.

काँग्रेस सर्वात मोठा पक्ष

Last Updated: Monday, April 16, 2012, 16:04

पाच महापालिकांचा निकाल जवळपास निश्चित झाला असून आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार काँग्रेसने पाच पैकी चार महापालिकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येण्याची कामगिरी केली आहे.

मनसेनेने मालेगावात खातं उघडलं

Last Updated: Monday, April 16, 2012, 10:50

मालेगाव पालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन जागा मिळवित पालिकेत प्रवेश केला आहे. त्यामुळे राज ठाकरे फॅक्टरचा प्रभाव दिसून आला आहे. मतमोजणी सुरू असून किती जागा मनसेला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

पाच महापालिकांच्या रणसंग्रामाचा आज निकाल

Last Updated: Monday, April 16, 2012, 10:51

राज्यातील पाच महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल आज हाती येणार आहेत. लातूर महापालिकेच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून मालेगाव, परभणी आणि भिवंडी यांची मतमोजणी सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. तर चंद्रपुरात मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरूवात होईल, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

राष्ट्रपतींच्या सूनबाई करतायेत पाण्यासाठी वणवण

Last Updated: Sunday, April 15, 2012, 13:13

महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना आता त्याच्या झळा खुद्द देशाच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या माहेरगावालाही बसत आहे. जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड तालुक्यातल्या नाडगाव या राष्ट्रपतीच्या गावात पाणीटंचाईनं भीषण रुप धारण केलं आहे.

नगरसेवकाच्या भावाने केला महिलेवर अ‍ॅसिड हल्ला

Last Updated: Friday, April 13, 2012, 16:48

आपापसातील आर्थिक व्यवहारातील वादातून नाशिकमध्ये नगरसेवकाच्या भावानं महिलेवर ऍसिड हल्ला केलाय. या हल्ल्यात सुशिला कसबे या गंभीर जखमी झाल्या आहेत.