साईबाबा संस्थान कारभारवर संशय

Last Updated: Friday, April 13, 2012, 11:51

शिर्डीतील साईबाबा संस्थानचा कारभार चोख व पारदर्शी व्हावा यासाठी राज्य सरकारनं २००४ मध्ये साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची नियुक्ती केली खरी, मात्र कारभार पारदर्शी होण्याऐवजी त्याभोवती संशयाचं जाळंच निर्माण झालं. या विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी या दानाचा वापर स्वत:ची मोबाईलची हौस भागवण्यासाठी केल्याचं समोर आले आहे.

राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

Last Updated: Thursday, April 12, 2012, 21:00

राज ठाकरे यांची मुलूख मैदान तोफ मालेगावात धडाडली. या भाषणात त्यांनी नीतिश कुमार, अबु आझमी यांच्यासह शिवसेनेवर जोरदार हल्ला चढविला.

राज ठाकरे यांची तुफानी फटकेबाजी

Last Updated: Thursday, April 12, 2012, 21:22

राज ठाकरे यांनी आज मालेगावत प्रचार सभा घेतली, ह्या प्रचार सभेकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले होते, राज ठाकरे यांनी नीतिश कुमार आणि अबू आझमी यांचा चांगलाच समाचार घेतला.

राज ठाकरे यांची तोफ धडाडणार

Last Updated: Friday, April 13, 2012, 10:13

मुंबईत बिहार दिन साजरा करण्याच्या नितीशकुमारांच्या आव्हानाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय उत्तर देतात, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. राज ठाकरेंची थोड्याच वेळात मालेगावमध्ये तोफ धडाडणार आहे.

साई संस्थानाच्या विश्वस्तांची उधळपट्टी

Last Updated: Thursday, April 12, 2012, 14:45

शिर्डीतील साई संस्थानच्या तिजोरीचा अध्यक्ष-विश्वस्त आणि कार्यकारी अधिकाऱ्यांकडूनच गैरवापर होत असल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. संस्थानच्या विश्वस्तांनी मोबाईल बिलावर हजारो रुपयांची उधळपट्टी केल्याचं उघडकीस आलंय.

राज यांची आज मालेगावात प्रचारसभा

Last Updated: Thursday, April 12, 2012, 13:27

नाशिकची महापालिका काबीज केल्यानंतर मनसेनं आता मालेगावची महापालिकाही ताब्यात घेण्याचा चंग बांधलाय. यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकचे सर्व पदाधिकारी मालेगावात तळ ठोकून आहेत.

सुप्रिया सुळे म्हणतात.... 'मुली वाचवा'

Last Updated: Wednesday, April 11, 2012, 19:47

नाशिकमध्ये लेकींचा आवाज आज दुमदुमला. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी जागर हा जाणिवांचा तुझ्या माझ्या लेकींचा या उपक्रमार्गतं शहरातून पदयात्रा काढण्यात आली. राज्यात मुलांच्या तुलनेत मुलींच प्रमाण कमी होत आहे.

शवविच्छेदनासाठी मनिषाचा मृतदेह उकरणार

Last Updated: Tuesday, April 10, 2012, 17:37

जळगावात खोट्या प्रतिष्ठेसाठी हत्या केलेल्या मनीषा धनगर हिच्या मृतदेहाचं पुन्हा पोस्टमॉर्टेम होणार आहे. त्यासाठी मनीषाचा मृतदेह आज उकरला जाणार आहे.

वाळू माफियांविरोधात नागरिक रस्त्यावर

Last Updated: Tuesday, April 10, 2012, 17:24

वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरखाली चिरडल्याने एका सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूरमध्ये घडली आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने डंपरच्या काचा फोडत पेटवून देण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर डंपरचालक पसार झाल्याने स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं.

मालेगावात १२ एप्रिला राज ‘गर्जना’

Last Updated: Tuesday, April 10, 2012, 13:31

मालेगाव महापालिका निवडणूक प्रचाराचे रणशिंग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या १२ एप्रिलला फुंकणार असून यावेळी विविध मुद्द्यांवर आपल्या खास ठाकरी शैलीत फटकेबाजी करण्याची शक्यता आहे.