ऐन उन्हाळी सुट्टीत तरण तलावाची दुरुस्ती

Last Updated: Thursday, April 26, 2012, 20:38

नाशिक महापालिकेच्या गलथान कारभाराचा फटका असंख्य जलतरणपटूना बसतोय. शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या एकमेव जलतरण तलावाच्या दुरूस्तीच काम ऐन उन्हाळ्यात सुरु असल्यानं जलतरणपटूना जलतरणापासून वंचित राहव लागतं.

नाशिकमध्ये विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 19:39

नाशिक शहरात विजेचा शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झालाय. जया अमन शर्मा असं मरण पावलेल्या महिलेचं नाव आहे. दिंडोरी रस्त्यावरील खान्देश गल्लीत ही घटना घडली.

मुबलक पाणी असूनही धुळ्यात टंचाई

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 15:55

राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ आहे.. मात्र मुबलक पाणी असतानाही काही ठिकाणी टंचाईसदृश परिस्थिती असेल तर.. उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात ही परिस्थिती आहे. शासनाच्या उदासीनतेमुळे तीन वर्षांपासून हे पाणी उन्हाळ्याच्या शेवटी गुजरातच्या शेतकऱ्यांना मिळत आहे.

दिवेआगर चोरी : चोरांचा लागला छडा

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 09:46

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर सुवर्णगणेश चोरीप्रकरणाचा छडा लागला आहे. या प्रकरणी शहर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गणेशमूर्तीचे अवशेष आणि दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

संपाला आळा, कामगारवर्गाला झळा

Last Updated: Tuesday, April 24, 2012, 22:18

संपावर बंदी घालणारं विधेयक राज्य सरकारनं विधान परिषदेत मंजूर केलं. सरकारच्या या निर्णयामुळे कामगारवर्गात संतापाचं वातावरण आहे. दुसरीकडे उद्योजकांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय.

नाशिकमध्ये रिक्षाप्रवास महागला

Last Updated: Tuesday, April 24, 2012, 00:14

नाशिककरांचा रिक्षाप्रवास आता आणखी महागलाय. नाशिकमध्ये रिक्षाभाड्यात तब्बल पंचवीस टक्क्यांनी वाढ झालीय. नाशिककरांना पहिल्या टप्प्यासाठी म्हणजे किमान भाड्यापोटी 15 रुपये मोजावे लागणार आहेत.

पाणी आहे, मात्र शेतीसाठी अजिबात नाही

Last Updated: Monday, April 23, 2012, 09:32

पाण्याच्या टंचाईमुळे राज्यात दुष्काळ असला तरी धुळे जिल्ह्यात मात्र मुबलक पाणी असूनही टंचाई आहे. तापी नदीपात्रात मुबलक साठा असूनही शेतीला पाणी मिळत नाही ते केवळ योग्य सिंचन व्यवस्थेअभावी. पाणी असून ते मिळत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

नाशिकमध्ये दोन गटात तुफान हाणामारी

Last Updated: Saturday, April 21, 2012, 22:38

नाशिकमध्ये दोन गटांत तूफान हाणामारी झाली आहे. नाशिक रोडच्या पांढूर्ली गावात ही घटना घडली आहे. तिथं मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि घरांची तोडफोड करण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.

हुक्का पार्लरमुळे मुलं जातायेत वाया.....

Last Updated: Saturday, April 21, 2012, 17:36

नाशिकच्या पारिजातनगरमधल्या एका हुक्कापार्लवर पोलिसांनी छापा टाकून सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांमध्ये दोन मुलींचाही समावेश आहे.

साईभक्तांसाठी कृत्रिम धुकं

Last Updated: Friday, April 20, 2012, 21:22

शिर्डीच्या साईभक्तांना भर उन्हाळ्यातही थंडा थंडा कूल कूल वातावरणाचा अनुभव आता घेता येणार आहे. कारण साईभक्तांच्या दर्शनबारीत कृत्रिम धुके तयार करणारी यंत्रणा बसवण्यात आली आली आहे.