रत्नागिरीत गतिमंद मुलीवर गँगरेप, Gang Rape in Ratnagiri

रत्नागिरीत गतिमंद मुलीवर गँगरेप

रत्नागिरीत गतिमंद मुलीवर गँगरेप
www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
रत्नागिरीमध्ये एका गतिमंद तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं धक्कादायक प्रकरण आज उघडकीस आलं आहे. सहा नराधमांनी हे घृणास्पद कृत्य केलं असून पोलिसांनी त्यांना अटक केल्याचं समजतं.

विवेक होरंबे (१९), गणेश होरंबे (१९), सूरज होरंबे (१९), राकेश शिंदे (२१), संजय होरंबे (२०), नितीन होरंबे (१८) अशी त्यांची नावं आहेत. या आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली.

१९ ऑगस्टच्या रात्री पानवल गावी ही दुर्दैवी घटना घडली. त्या दिवशी बलात्कार पीडित तरुणी तिथल्या एसटी पिकअप शेडमध्ये बसली होती. तेव्हाच, सहा तरुण फिरत-फिरत तिथे आले. एसटी शेडमध्ये एकटीच मुलगी आहे आणि आजूबाजूलाही कुणी नाही, हे पाहून त्यांनी तिला खाणाखुणा करून शेडच्या मागे बोलावलं आणि तिच्यावर आळीपाळीनं बलात्कार केला. हा भीषण प्रकार सुरू असतानाच, त्या मुलीचा एक नातेवाईक रस्त्यावरून चालला होता. एसटी शेडच्या मागून तरुणांचा आवाज आल्यानं तो तिथे डोकावला आणि समोरचं दृश्यं पाहून हादरलाच.

हे प्रकरण आज पोलिसांत दाखल झालं, तेव्हा सा-यांना धक्काच बसला. पीडित तरुणीच्या मामानं याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस वेगानं कामाला लागले. सहाही तरुण गावातलेच असल्यानं तरुणीचे कुटुंबीय त्यांना ओळखत होते.

त्यामुळे पोलिसांनी संशयित आरोपींना तात्काळ अटक केली.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, August 26, 2013, 19:53


comments powered by Disqus