मुंबई गँगरेपः तरुणी आणि मित्राच्या हत्येचा होता विचार, Mumbai gangrape: How the MMS is helping nail rapists

मुंबई गँगरेपः तरुणी आणि मित्राच्या हत्येचा होता विचार

मुंबई गँगरेपः तरुणी आणि मित्राच्या हत्येचा होता विचार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पीडित तरुणी आणि तिच्या सहकाऱ्याला ठार मारण्याचा विचार आरोपींनी केला होता. परंतु, हत्यात केल्यास आपण लवकर पकडले जाऊ, असे सांगून बंगालीने हा प्लान बदलला. पीडितेची व्हिडिओ क्लिप बनविल्याने ती पोलिसांकडे जाण्याची हिंमत करणार नाही, अशी खात्री वाटल्यामुळे दोघांना सोडून देण्यात आले.

महिला फोटोग्राफर तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. परंतु, आता दुसरीच समस्या निर्माण झाली आहे. आरोपींनी छायाचित्रण केलेला मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. हा मोबाईल आरोपीने दिल्लीत विकल्याची माहिती आहे. घटनेच्या‍ वेळेस काढलेले फोटो आणि व्हिडीओ क्लिप्स अजुनही त्यां मोबाईलमध्येच आहेत. त्यामुळे पोलिसांची चिंता वाढली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीला दिल्लीतून अटक करण्या‍त आली. त्याने पैशांची चणचण भासल्यालमुळे मोबाईल दिल्लीतच विकला. फोटो आणि व्हिडिओ त्यातच असल्या्मुळे वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. फोटो आणि क्लिपचा गैरवापर होण्याची भीती असून पीडितेची ओळखही सार्वजनिक होण्याचा धोका आहे.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मोबाईल क्लिप याप्रकरणातील एक महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. त्यामुळे कोणत्याचही परिस्थितीत पोलिसांना तो मोबाईल आणि डाटा हस्तगत करणे अतिशय आवश्यक आहे. विशेष म्हणजे, पीडित तरुणीने हे फोटो आणि व्हिडीओ नष्ट करण्याची पोलिसांना विनंती केली होती.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, August 26, 2013, 18:27


comments powered by Disqus