Last Updated: Monday, August 26, 2013, 16:17
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमहिला छायाचित्रकारावरील सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच धारावीत एका १० वर्षांच्या चिमुरडीवर तिच्या सख्ख्या काकानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली.
माणुसकीला काळिमा फासणार्या त्या नराधमाला पोलिसांनी अटक केली असून त्याला एचआयव्ही झाल्याचे समजते.
धारावीच्या सोशल नगरात बळीत मुलगी आणि तिचे कुटुंबीय राहतात. तेथेच त्या मुलीचा काका अमित गौड हादेखील कुटुंबासोबत राहतो. १५ दिवसांपूर्वी अमित त्याची पत्नी व तीन मुलींना उत्तर प्रदेश येथील गावी सोडून आला होता. दरम्यान, शनिवारी दुपारी रिक्षाचालक असलेला अमित त्याच्या पुतणीला पोटमाळ्यावर घेऊन गेला. तेथेच त्याने तिच्यावर बलात्कार केला.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, August 26, 2013, 15:37