तिकीट मागितले तर कंडक्टरला जिवंत जाळले

Last Updated: Wednesday, May 21, 2014, 18:31

तामिळनाडूच्या तिरूनेलवेली जिल्ह्यात तझयुतू मध्ये चार गुंडांनी तिकीट मागणाऱ्या एका कंडक्टरला जीवंत जाळण्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. पोलिसांनी कंडक्टरला जीवंत जाळल्याच्या आरोपावरून दोघांना अटक करण्यात आले आहे. भाजलेल्या अवस्थेत कंडक्टरला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

राहुल गांधींची पप्पी घेणारी महिला जिवंत

Last Updated: Saturday, March 1, 2014, 20:34

राहुल गांधी यांची पप्पी घेणारी महिला जिवंत आहे, ज्या महिलेचा जळून मृत्यू झाला, ती महिला दुसरीच होती, असा दावा आसाम पोलिसांनी केला आहे.

धक्कादायक: तिसरीही मुलगी झाली म्हणून विवाहितेला जाळलं

Last Updated: Tuesday, December 31, 2013, 18:42

पुरोगामी महाराष्ट्रात रोज नवनवीन धक्कादायक घटना घडतायेत. नागपूरात असाच एक गंभीर प्रकार घडलाय. तिसरीही मुलगीच जन्मली म्हणून संतापलेल्या सासू-सासर्‍यानं आपल्या सुनेचा जाळून खून केल्याची खळबळजनक घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवनगर इथं घडली. दरम्यान, पोलिसांनी या दोघांनाही अटक केलीय.

पुण्यात इमारतीला आग, २५ वाहनं जळून खाक, एकाचा मृत्यू

Last Updated: Saturday, November 23, 2013, 11:15

पुण्यातल्या अर्पाटमेंटमध्ये आग लागून जवळपास २५ वाहनं जळून खाक झाली आहेत. शनिवार पेठेतील अनुदत्त अपार्टमेंटमधील ही घटना आहे.

प्रेमाला नकार दिला म्हणून मैत्रिणीला जाळलं!

Last Updated: Thursday, November 14, 2013, 22:52

आपलं प्रेम नाकारल्याचा राग येऊन एका तरुणाने आपल्या मैत्रिणीची हत्या केली. इतकंच नव्हे, तर तरुणीची ओळख पटू नये, म्हणून तिचं प्रेत जाळलं

सिंधुदुर्गमध्ये चाललंय काय? आजही जाळल्या बाईक

Last Updated: Saturday, October 12, 2013, 19:11

कुडाळ पाठोपाठ बाईक जाळण्याचे लोण आता मालवणातही पसरले आहे. आज कुडाळ येथे पहाटेच्या सुमारास तीन बाईक जाळण्यात आल्या आहेत. मालवणमधील दांडी भागात ही घटना घडली आहे.

अवघ्या एका महिन्याच्या चिमुरडीला जिवंत जाळलं!

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 13:09

अवघ्या एका महिन्याच्या तान्हुलीस जिवंत जाळल्याची घटना औरंगाबादजवळच्या वाळूज भागातल्या शिवराई परिसरात घडलीय.

रत्नागिरी - जिवंत जाळलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

Last Updated: Monday, October 7, 2013, 17:12

सहा जणांच्या टोळक्या नं पेट्रोल आणि रॉकेल ओतून जिवंत जाळलेल्या हरिश्चंद्र पेव्हेकर या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. रत्नागिरीत मुख्य रस्त्यावर कुवारबावजवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या आवारात पेव्हेकर पेटलेल्या अवस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली होती.

स्वत:ला जाळून घेणाऱ्या आयपीएस अधिकारी सहाय यांचं निधन

Last Updated: Thursday, October 3, 2013, 11:33

अतिरिक्त पोलीस महासंचालक आर. के. सहाय यांचं निधन झालंय. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

बलात्काराच्या आरोपीला जिवंत जाळलं

Last Updated: Friday, September 6, 2013, 20:15

मध्यप्रदेशच्या कटनी जिल्ह्यातील बडवाराजवळच्या एका गावात बलात्काराच्या एका आरोपीला जिवंत जाळण्यात आलंय. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी जामिनावर सुटलेल्या आरोपीला जाळलंय.

जैन साधकांना मारहाण, बस दिली पेटवून

Last Updated: Saturday, August 10, 2013, 14:15

सोलापूरमध्ये किरकोळ कारणावरुन जैन साधकांना जबर मारहाण झालीये. त्यांची बसही पेटवून देण्यात आली. सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावरील कोयना नगर येथे ही घटना घडलीये.

विनयभंगाला प्रतिकार; मुलीला दिलं पेटवून!

Last Updated: Wednesday, August 7, 2013, 09:06

एकतर्फी प्रेमातून मुलीला जाळण्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या कामरगावमध्ये घडलीय. आपल्या घराशेजारीच राहणाऱ्या एका मागासवर्गीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला पेटवून देण्याचा क्रूरपणा एका नराधमानं केलाय.

बलात्कार करणाऱ्याला पीडितेनंच जिवंत जाळलं!

Last Updated: Thursday, April 4, 2013, 07:05

सरकार देशातील महिलांना सुरक्षित वातावरण तयार करण्याचा प्रयत्नात असताना बिहारमधील एका महिलेने रणरागिणी होत आपल्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमाला धडा शिकवला आहे. या महिलेने नराधमाला जीवंत जाळण्याचा प्रकार घडला आहे.

लग्नाचा जाब विचारला; दिलं पेटवून!

Last Updated: Wednesday, March 6, 2013, 15:01

दुसऱ्या महिलेबरोबर लग्न केलं म्हणून जाब विचारणाऱ्या प्रेयसीला ऑफिसमध्येच अंगावर रॉकेल ओतून प्रियकरानं पेटवून दिलंय. औरंगाबादमधली ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडलीय.

भावी वधुला जिवंत जाळलं; जवानाचं क्रूर कृत्य

Last Updated: Thursday, February 7, 2013, 12:27

क्षुल्लक कारणावरून भावी नवरदेवानं आपल्या नियोजित वधुला जिवंत जाळल्याची घटना औरंगाबादमध्ये घडलीय. विशेष म्हणजे हा भावी नवरदेव भारतीय सैन्यदलात काम करतो.

क्षुल्लक कारणावरून तरूणाला जिवंत जाळलं

Last Updated: Wednesday, December 5, 2012, 16:28

नागपुरात क्षुल्लक कारणावरुन एका युवकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. यामध्ये तरुण 80 टक्के भाजलाय. राजेश मोगरे असं या तरुणाचं नावं आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये विवाहितेला जाऴलं

Last Updated: Sunday, September 16, 2012, 22:21

पिंपरी चिंचवडमध्ये एका विवाहितेला सासरच्या मंडळींनी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. नवविवाहिता प्रियांका गालफाडे हिचे हात पाय बांधून जाळण्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडलाय. या नवविवाहितेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.