रेल्वे ट्रॅकला तडा, ट्रान्सहार्बरची वाहतूक विस्कळीत

Last Updated: Wednesday, May 21, 2014, 10:08

ट्रान्सहार्बरची वाहतूक विस्कळीत झाली होती. तुर्भे - कोपरखैरणे दरम्यान रेल्वे ट्रॅकला तडा गेल्याने सकाळी वाहतुकीचा खोळंबा झाला. यामुळे वाहतूक एक तास बंद होती. रेल्वे वाहतूक बंद अल्याने सकाळच्या वेळी प्रवाशांचे हाल झालेत.

हार्बर रेल्वे सेवा सुरळीत

Last Updated: Wednesday, August 28, 2013, 15:44

मालगाडीचे डबे घसरल्याने हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली होती. ही सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. कुर्ला स्थानकाजवळ मालगाडीचे तीन डबे घसरल्याने या मार्गावरील रेल्वे सेवेवर परिणाम झाला होता.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला पुन्हा एकदा धक्का

Last Updated: Monday, August 5, 2013, 23:38

मुंबईतला महत्वाकांक्षी सी लिंक प्रकल्प मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजे शिवडी-चिर्ले सी लिंकला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. या प्रकल्पाची निविदा भरण्यासाठी एकही कंपनी पुढे आली नाही.

हार्बर रेल्वे विस्कळीत, रूळाला तडे

Last Updated: Friday, June 28, 2013, 10:42

हार्बर रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा खोळंबा झाला आहे. वाशी आणि मानखूर्द दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे रेल्वेगाड्या वीस मिनिटे उशीराने धावत आहे.

हार्बरची रेल्वे वाहतूक सुरू, गती कमी

Last Updated: Tuesday, June 18, 2013, 18:31

हार्बर मार्गावरील गोवंडी ते चेंबूर स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मंगळवारी दुपारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली. मात्र, युद्धपातळीवर काम करण्यात आल्यानंतर हार्बरची सेवा सुरू झाली आहे.

हार्बरवर मेगाब्लॉक! नो टेन्शन, रेल्वे सुरूच

Last Updated: Tuesday, April 30, 2013, 16:22

हार्बरवासीयांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने खूशखबर दिलेय. मेगाब्लॉक जरी हार्बर रेल्वेवर असला तरी पनवेल-सीएसटी आणि सीएसटी-पनवेल सेवा सुरूच ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे हार्बरवरील प्रवाशांचे मेगाहाल थांबणार आहेत.

हार्बर रेल्वेवर अल्पवयीन मुलांचा दरोडा, एक ठार

Last Updated: Tuesday, April 16, 2013, 21:37

हार्बर मार्गावरील सीएसटी ते पनवेल लोकलवर पहाटे साडेपाच वाजता मानखुर्द ते वाशी दरम्यान दरोडा पडला. मानखुर्द येथे अल्पवयीन मुलांनी हा दरोडा घातला.

हार्बर रेल्वे खोळंबली, पत्रे उडून ओव्हरहेड वायर तुटली

Last Updated: Thursday, March 7, 2013, 16:40

ठाणे ते वाशी ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रबाळे स्टेशनमध्ये छताचे पत्रे रेल्वे रुळांवर पडल्यानं ओव्हरहेड वायर तुटली आहे.

ट्रान्स हार्बरवर धावणार १२ डब्यांची रेल्वे

Last Updated: Tuesday, January 15, 2013, 12:50

ठाणे वाशी आणि ठाणे पनवेल मार्गावर लोकलने प्रवास करणा-या प्रवाशांसाठी खुशखबर. ठाणे-पनवेल-वाशी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील सर्व लोकल्स आजपासून बारा डब्यांच्या होणार आहेत. त्यामुळं या मार्गावर सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत होणारी गर्दी काही प्रमाणात कमी होणार आहे.

हार्बर मार्गावर लोकलच्या डब्याला आग

Last Updated: Tuesday, December 4, 2012, 19:14

मुंबईतल्या हार्बर मार्गावर लोकलच्या डब्याला आग लागली होती. डॉकयार्ड स्टेशनजवळ ही आग लागली. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. यात काही प्रवासी जखमी झालेत.

हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्ववत

Last Updated: Thursday, November 22, 2012, 10:40

हार्बर रेल्वे मार्गावरील जीटीजी ते वडाळा स्टेशन दरम्यान रूळ तुटल्याने हार्बरची लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. छत्रपती शिवाजी टर्मीनसकडे येणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान हार्बर रेल्वेची वाहतूक मेन लाईनवरून सुरू ठेवण्यात आली होती. आता वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत

Last Updated: Wednesday, November 7, 2012, 19:57

आज संध्याकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळील पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वे तसंच हार्बर रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. यामुळे ऑफिसमधून घरी परतण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. सीएसटी स्टेशनवर हजारो प्रवाशांचा खोळंबा होत आहे.

प्रवास हार्बर लोकलचा, आता आणखी सुखाचा

Last Updated: Wednesday, October 31, 2012, 10:25

हार्बर मार्गावरील लोकल 10 डब्यांच्या होणार आहेत. याचा प्रवाशांना दुहेरी फायदा होणार आहे. अतिरीक्त डब्यामुळं प्रवासी संख्यातर वाढणारच आहे. शिवाय लोकलचा वेगही आता वाढणार आहे.

ओव्हरहेड वायरला चिटकून एकाचा मृत्यू; हार्बर रेल्वे विस्कळीत

Last Updated: Wednesday, October 17, 2012, 10:55

हार्बर लाईनवर ओव्हरहेड वायरला चिटकून एका प्रवाशाचा मृत्यू झालाय. त्यामुळे रेल्वेची हार्बर लाईनवरची वाहतूक विस्कळीत झालीय.

'हार्बर' लाईनसाठी१२ डब्यांची लोकल दूरच

Last Updated: Friday, May 11, 2012, 23:21

हार्बर रेल्वे मार्गावर 12 डब्यांच्या लोकलसाठी आणखी तीन वर्षं वाट पहावी लागणार आहे. सीएसटी ते मानखुर्द रेल्वे स्थानकांची लांबी वाढवण्याच्या कामाला येत्या ऑक्टोबरनंतरच सुरुवात होणार असून हे काम 2014 पर्यंत पूर्ण होणार आहे.

खोळंबलेली हार्बरची रेल्वे सेवा रूळावर

Last Updated: Wednesday, May 2, 2012, 11:11

हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वेने प्रशासनाने युद्धपातळीवर काम हाती घेतल्याने हार्बरची रेल्वे सेवा हळूहळू रूळावर आली आहे. आधी एकमार्ग सुरू करण्यास यश आले.