लवकरच देशात नव्या नोकऱ्यांची संधी

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 21:10

देशात नोकरीतील मंदीची लाट कमी झाल्याचे `नोकरी डॉट कॉम` संकेतस्थळाच्या निरीक्षणातून समोर आलंय. यंदाच्या एप्रिल महिन्यापर्यंत नोकऱ्यांमध्ये सात टक्के वाढ झालीय. ही वाढ गेल्या वर्षीपेक्षा १४ टक्कांनी जास्त आहे.

असं एक गाव आहे तिथं झालं 97 टक्के मतदान

Last Updated: Friday, April 18, 2014, 18:16

2014च्या लोकसभा निवडणुकीत मतदानात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीत 97 टक्के मतदान झालेलं गाव कोणतं तुम्हाला माहीत आहे का? हे आदर्श गाव महाराष्ट्रातच आहे. त्याच नाव आहे हिवरेबाजार.

दिल्लीत ६४ टक्के, देशात चांगला प्रतिसाद

Last Updated: Friday, April 11, 2014, 09:28

देशात आज 91 जागांसाठी मतदान होतंय. मतदानाची वेळ संपायला काही तास शिल्लक आहेत. दरम्यान उमेदवारांसह पक्षातील पदाधिकाऱ्यांनी मतदान हक्क बजावला आहे.

खुशखबर, आता मिळणार 90 टक्के होमलोन

Last Updated: Sunday, April 6, 2014, 12:05

जर तुम्हाला होम लोन घ्यायचं असेल, तर ही तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. कारण तुम्हाला आता घराच्या 90 टक्के रकमे एवढं लोन मिळणार आहे.

एसटीची ७ मार्चपासून २.५४ टक्के भाडेवाढ

Last Updated: Wednesday, March 5, 2014, 10:32

राज्यात एसटीचे ७ मार्चपासून भाडे वाढणार आहे. याबाबतची घोषणा एसटी महामंडळाने केली आहे. सर्वसामान्यांच्या एस.टी.ने ७ मार्चपासून २.५४ टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे. ३१ किलोमीटरनंतर ५४ किलोमीटरपर्यंत १ रुपया तर ५५ ते ९० कि.मी.पर्यंत २ रुपये आणि ९१ ते १५० कि.मी.करिता ३ रुपये अशी भाडेवाढ असेल.

खुशखबरः रातराणीचे भाडे १५ टक्क्यांनी कमी

Last Updated: Tuesday, January 14, 2014, 15:37

आज मध्यरात्रीपासून रातराणीच्या भाड्यात १५ टक्के कपात करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर... मुस्लिम आरक्षण?

Last Updated: Tuesday, October 22, 2013, 20:21

मुस्लिम समाजाला सरकारी नोकऱ्यांमध्ये तसेच शिक्षण क्षेत्रात किमान आठ टक्के आरक्षण ठेवण्याची महत्त्वपूर्ण शिफारस डॉ. महेमुदूर रहमान यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यासगटानं केलीय. निवडणुकांच्या तोंडावरच असे अहवाल का सादर होतात, याचा हा आढावा...

मुस्लिमांना आठ टक्के आरक्षण देण्याची शिफारस!

Last Updated: Tuesday, October 22, 2013, 17:52

सरकारी नोकरीत मुस्लिमांना आठ टक्के आरक्षण देण्याची शिफासर राज्य सरकारनं नेमलेल्या एका अभ्यासगटानं केलीय.

खूषखबर, केंद्रीय कर्मचाऱ्यांना ९० टक्के महागाई भत्ता

Last Updated: Saturday, September 21, 2013, 08:15

केंद्रीय कर्मचा-यांसाठी ही खूषखबर आहे. डीएमध्ये १० टक्क्यांची वाढ झाली आहे. ८० टक्क्यांवरून ९० टक्क्यांवर केंद्रीय कर्मचा-यांचा डीए वाकेंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही खूषखबर आहे. डीएमध्ये १० टक्क्यांची वाढ झाली आहे. ८० टक्क्यांवरून ९० टक्क्यांवर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढवण्यासाठी कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे. ढवण्यासाठी कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे.

पीएफवर ८.५ टक्के व्याज?

Last Updated: Monday, September 9, 2013, 12:08

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफओ) ८.५ टक्के व्याजदर मिळण्याची शक्यता आहे. हा व्याजदर २०१३-१४ या वर्षासाठी असेल. याबाबत २३ सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. त्यानंतर व्याजदराची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

सर्वेः मोबाईल, इंटरनेटमुळे ९९ टक्के महिलांचा छळ

Last Updated: Wednesday, July 3, 2013, 21:47

मोबाईल आणि इंटरनेटच्या क्रांतीनं जग जसं जोडलं गेलंय तसंच या क्रांतीचे आता वाईट परिणामही समोर येऊ लागलेत. ज्ञान आणि माहितीचे स्त्रोत खुले करणा-या या माध्यमांचा छळांसाठीही वापर केला जात असल्याचं या सर्वेक्षणातून पुढे आलंय

मुंबईत उद्या ५० टक्के पाणी कपात

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 18:50

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तानसाची जलवाहिनी आणखी दोन ठिकाणी फुटलीय. त्यामुळं मुंबईत आज 15 टक्के तर उद्या 50 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

धोनी निघाला धोकेबाज, फिक्सिंगच्या जाळ्यात

Last Updated: Monday, June 3, 2013, 16:08

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी क्रिकेट आणि बिझनेस गेम सध्या एकत्र खेळतांना दिसतोय. एका वृत्तपत्राच्या सर्वेनुसार रिती स्पोर्टस् मॅनेजमेंट कंपनीमध्ये धोनीची १५ टक्के भागीदारी आहे.

तेरा महिन्यानंतर १ कोटीचे मिळाले बक्षिस

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 17:35

भारताला मार्च २०१२मध्ये कबड्डीचा विश्वचषक मिळवून देणाऱ्या तिन मराठी कन्यांना तब्बल १३ वर्षांनंतर त्यांचे जाहीर झालेले १ कोटी रूपयांचे बक्षिस मिळाले आहे. यासाठी झी २४ तासने पाठपुरावा केला. तेव्हा कुठे त्यांची बक्षिसाचे रक्कम हातात पडली.

देशातील आयर्न वूमेन, 33 टक्क्यांचं काय?

Last Updated: Friday, March 8, 2013, 13:27

आपण केवळ शोभेची बाहुली नसून आयर्न वूमेन आहोत हे देशातल्या महिला नेत्यांनी सिद्ध केलंय. राष्ट्रपती पासून पंचायत समितीच्या सभापतीपर्यंतच्या प्रत्येक जबाबदा-या महिला नेत्यांनी यशस्वीपणे पार पाडल्यात. मात्र तरीही संसदेत महिलांना 33 टक्के आरक्षणाचं विधेयक अजूनही रेंगाळलंय. राजकारणात महिलांच्या मतांना किती स्थान आहे, याबाबत एक विशेष रिपोर्ट..

‘बेस्ट’मध्ये खेळाडूंना २% आरक्षण

Last Updated: Friday, February 1, 2013, 17:58

बेस्ट उपक्रमाच्या नोकर भरतीत खेळाडूंना दोन टक्के आरक्षण देण्याची शिवसेनेची मागणी बेस्ट प्रशासनाने आज मंजूर केली. त्यामुळे बेस्टच्या आगामी नोकर भरतीत खेळाडूंना आरक्षण ठेवण्यात येणार आहे.

मराठी मालिकांचा 'झोका' अंधारात!

Last Updated: Friday, February 1, 2013, 15:58

गोरेगाव फिल्मसिटीत मराठी मालिकांच्या चित्रिकरणासाठी दिली जाणारी ५० टक्के सवलत बंद करण्यात आली आहे.

म्हाडाचे ४० टक्के अर्जदार अपात्र

Last Updated: Tuesday, November 20, 2012, 12:35

म्हाडाच्या घरांच्या लॉटरीविजेत्यांसाठी थोडीशी वाईट बातमी. मे २०१२मध्ये मीरा रोडमधील म्हाडाच्या लॉटरीमध्ये घर लागलेले ४० टक्के अर्जदार अपात्र ठरलेत.

विदेशी दुकानदारीला ५१ टक्के सरकारची मान्यता

Last Updated: Friday, September 14, 2012, 18:47

सरकारने आणखी एक कडक निर्णय घेऊन खळबळ निर्माण केली आहे. कालच डिझेलच्या दरात वाढ आणि गॅसच्या सबसिडी नाकरण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आले.

'उन्नतीवूड्स'ने ६० टक्के केले पाणी बचत

Last Updated: Monday, June 25, 2012, 14:27

दिवसेंदिवस शहरांची लोकसंख्या वाढत चालली आहे. यात शहरांमध्ये पाणीप्रश्न गंभीर होत चाललाय.. अशा वेळी रेन वॉटर हार्वेस्टिंग हा चांगला पर्याय ठरतोय.. ठाण्यात उन्नतीवूड्स सोसायटीनं अशाच हार्वेस्टिंग मधून दरवर्षी सुमारे ६०टक्के पाणी वाचतय.

मुंबईत ९० टक्के फायर हायड्रन्ट निकामी

Last Updated: Sunday, June 24, 2012, 14:54

मुंबईतील मंत्रालयातली आग विझवतांना पाण्याची कमतरता स्पष्टपणे जाणवत होती. कारण मुंबईतील ९० टक्के फायर हायड्रन्ट निकामी झाले आहेत.

महाराष्ट्र झाला ७० टक्के लोडशेडींगमुक्त

Last Updated: Thursday, May 10, 2012, 12:35

महाराष्ट्र जवळजवळ ७० टक्के लोडशेडिंगमुक्त झाला आहे असा दावा महावितरणने केला आहे. राज्यभरातील १४२ पैकी ९४ विभाग लोडशेडिंगमुक्त झाल्याचं महावितरणतर्फे सांगण्यात आलं आहे.

मुंबईकरांना आज अजिबात पाणी नाही...

Last Updated: Monday, May 7, 2012, 10:39

मुंबईत आज काही भागात १०० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. तर काही भागात अंशतः पाणीकपात करण्यात आली आहे. पाईपलाईन जोडण्याच्या कामामुळं ही पाणीकपात करण्यात आली आहे.

पीएफवर ८.६ टक्के व्याजदर

Last Updated: Friday, April 27, 2012, 15:52

नोकरी करणाऱ्यांसाठी एख खुश खबर आहे. पीएफवर ८.६ टक्के व्याजदर मिळणार आहे. २०१०-११ या आर्थिक वर्षात ईपीएफवर तब्बल ९.५ टक्के इतका व्याजदर दिला गेला होता. २०११-१२ मध्ये मात्र कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने तो थेट ८.२५ टक्क्यांवर आणला होता. त्यावर कर्मचारी संघटनांकडून मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती.

भाकीत : ९९ टक्के पाऊस, पीकपाणीही चांगले

Last Updated: Friday, April 27, 2012, 08:50

देशात यंदा सर्वसाधारण सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडण्याची. पर्जन्यवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान संस्थेच्या (आयएमडी) शास्त्रज्ञांनी वर्तविल्याची माहिती विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांनी गुरूवारीयेथे दिली.

खासगी शाळांतील गरीब विद्यार्थांना आरक्षण

Last Updated: Thursday, April 12, 2012, 12:20

देशातल्या सर्व खासगी शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी 25 % आरक्षण लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय. या निर्णयाची आजपासूनच अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७ टक्के भत्ता

Last Updated: Saturday, March 24, 2012, 10:41

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही गुड न्यूज आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाईचा थोडासा दिलासा मिळाला आहे. कारण केंद्राने सात टक्के महागाईच्या भत्त्यात वाढ केली आहे. आता हा भत्ता ६५ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे पगारात चांगलीच वाढ होणार आहे.

गरिबीची क्रूर थट्टा, २८ रु. जगायला पुरतात!

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 16:08

नियोजन आयोगाच्या श्रीमंतीच्या व्याख्येवरून पुन्हा वाद होण्याची चिन्हे आहेत. रोज 28 रुपये खर्च करण्याची क्षमता असलेली व्यक्ती गरीब नसल्याचं नियोजन आयोगाच्या नव्या व्याख्येमध्ये स्पष्ट करण्यात आलंय.

दारिद्रयाचा टक्का घटला, चिंता कायम

Last Updated: Monday, March 19, 2012, 17:47

गेल्या पाच वर्षात दारिद्र्याच्या टक्केवारीत ७.३ टक्क्यांची घट झाली असून ते देशातील एकूण लोकसंख्येच्या २९.८ टक्के पर्यंत खाली आल्याचं नियोजन आयोगाने म्हटलं आहे. नियोजन आयोगाने जारी केलेल्या अंदाजानुसार २००४-०५ ते २००९-१० या कालावधीत ग्रामीण भागातील दारिद्र्याच्या प्रमाणात शहरी भागाच्या तुलनेत अधिक वेगाने घट झाली.

सुवर्ण कन्यांना बाळासाहेबांचा आशीर्वाद

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 18:22

भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावणा-या सुवर्णा बारटक्के आणि अभिलाषा म्हात्रे या दोन महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

बाळासाहेब-राज ठाकरेंनी केलं मतदान

Last Updated: Thursday, February 16, 2012, 13:40

मुंबई महानगरपालिकेसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. शहर आणि उपनगरांमध्ये शांततेत मतदान सुरू आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या तीन तासांत ११ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

उत्तर प्रदेशात ६० टक्के मतदान

Last Updated: Saturday, February 11, 2012, 23:14

संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱया टप्प्यासाठीचे ६० टक्के मतदान शांततेत पार पडले. मतदानासाठी सकाळी मतदानकेंद्रांसमोर रांगा लावल्या आहेत. यात एकूण एक कोटी ९७ लाख लोक मतदान करणार असून, ५९ मतदारसंघ आहेत.

राज्यात झेडपी मतदान ७० टक्के

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 21:24

राज्यातल्या २७ जिल्हा परिषदा आणि ३०५ पंचायत समित्यांसाठी सरासरी ६५ टक्के मतदान झालं. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मतमोजणी महापालिकांबरोबच १७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दोन्ही काँग्रस या निवडणूकीत स्वबळावर लढले.

मणिपूरमध्ये ३० टक्के मतदान

Last Updated: Saturday, January 28, 2012, 15:21

मणिपूर विधानसभा निवडणुकीत इंफाळ पूर्व, इंफाळ पश्‍चिम, थोऊबल आणि बिशेनपूर या जिल्ह्यांमध्ये सकाळपासून मतदान केंद्रांपुढे उत्साही मतदारांच्या लांबच रांगा लागल्या आहेत. निवडणुकीत पहिल्या ३ तासांमध्ये तब्बल ३० टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे. साठ सदस्यांच्या विधानसभेसाठी २७९ उमेदवार रिंगणात आहेत.

आंध्र प्रदेशची शेतकऱ्यांसाठी पथदर्शी कर्ज योजना

Last Updated: Saturday, November 19, 2011, 16:16

आंध्र प्रदेशने शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीक कर्ज उपलब्ध करुन दिलं आहे. पीक कर्जासाठी शून्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करुन देणारे आंध्र देशातले पहिले राज्य आहे. आंध्र प्रदेशातील ९५ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.