कैद्यांची तुरुंगातील बडदास्त !

Last Updated: Monday, June 4, 2012, 22:32

..धनदांडग्यांसाठी कायदा वाकवला जात असल्याचं या प्रकरणातून उघड झालंय..ऍलिस्टर परेराची नाशिकच्या तुरुंगात कशा प्रकारे शाही बडदास्त ठेवली जातेय ?...कोण पुरवतं कैद्यांना या सुविधा ? भ्रष्ट यंत्रणा याला कारणीभूत तर नाही ना ? या आणि अशा विविध पैलूंचा वेध घेतला आहे, प्राईम वॉचमध्ये ....तुरुंगातील बडदास्त !

कुपोषित गावांकडे आमदार, खासदारांचं दुर्लक्षच

Last Updated: Monday, June 4, 2012, 09:23

बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातलं कुपोषणाचं विदारक चित्र झी 24 तासनं संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडताच प्रशासन खडबडून जागं झालं मात्र स्थानिक खासदार, आमदार अजूनही याठिकाणी फिरकले नाहीत.

नाशिक कारागृहात आरोपीची शाही बडदास्त

Last Updated: Saturday, June 2, 2012, 09:55

मुंबईच्या हीट एन्ड रन प्रकरणातील आरोपी एलिस्टर परेराला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शाही बडदास्त मिळतंय. जेलमध्येही त्याला रपेट मारण्यासाठी मर्सिडीज पुरवली जाते. या शाही वागणुकीचा झी 24 तासनं पर्दाफाश केल्यानंतर, गृहराज्यमंत्र्यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

वाघ, राज आणि वनमंत्री

Last Updated: Saturday, June 2, 2012, 00:04

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा दौरा केल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी वाघ वाचवण्यासाठी पुढाकार घेतलाय..शिकारी टोळ्यांची माहिती देणा-यांना, तसंच शिका-यांवर कारवाई करणा-या वनखात्यातील कर्मचा-यांना, मनसेकडून बक्षिस दिलं जाणार आहे.

१४ गावांमध्ये कुपोषणाचा प्रश्न गंभीर

Last Updated: Friday, June 1, 2012, 14:55

मेळघाट, नंदूरबार किंवा ठाणे या जिल्ह्यातच नव्हे तर आता पश्चिम विदर्भातही कुपोषणाची समस्या तीव्र होत चाललीय. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातल्य़ा १४गावांमध्ये कुपोषणाचा प्रश्न गंभीर झालाय.

कथा..सोलापुरातील अदृश्य किल्ल्याची

Last Updated: Friday, June 1, 2012, 11:02

कथा आहे, सोलापूरमधील एका अदृश्य किल्ल्याची. शनिवारवाड्यापेक्षा मजबूत असणारा किल्ला अचानक दिसू लागलाय. तो चक्क पाण्यात. झी 24 तासनं सातशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा दिला.

भारत बंद

Last Updated: Saturday, June 9, 2012, 13:35

पेट्रोल दरवाढीविरोधात आज पुकारलेल्या भारत बंदमुळे राज्यातल्या जनजीवनावर परिणाम रात्रीपासूनच जाणवू लागलाय. पुण्यात पीएमपीएलच्या चार बसेसवर काही अज्ञातांनी दगडफेक केली.

यूपीएला पेट्रोलची झळ

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 23:48

पेट्रोल दरवाढीवरुन केंद्र सरकारच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे. तृणमूल काँग्रेसने विरोध दर्शवल्यानंतर डीएमकेही रस्त्यावर उतरलं. मित्र पक्षांसोबत मनमोहन सिंगाच्या मंत्री मंडळातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्य़ांनीही पेट्रोलच्या दरवाढीचा विरोध केलाय.

विधान परिषदेचा आखाडा

Last Updated: Tuesday, May 29, 2012, 23:49

राज्यातली प्रत्येक निवडणूक सध्या कुठल्याना कुठल्या कारणानी गाजतेय. विधानपरिषदेची निवडणूक तरी याला अपवाद ठरेल अस वाटत असताना सत्तेच्या भागीदाऱ्यांमधला सत्तासंघर्ष सा-या महाराष्ट्रानं पाहिला. राष्ट्रवादीचा वरचढपणा दिसत असला तरी, यामागे काँग्रेसचाही स्वार्थ दडलाय.