महिलेची छेड काढणाऱ्या पाच नेव्ही अधिकाऱ्यांना अटक

Last Updated: Monday, April 28, 2014, 12:35

बोरीवली पोलिसांनी आज पाच नेव्ही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलीय. या पाच नेव्ही अधिकाऱ्यांवर वांद्र्यातील पबमध्ये महिलेची छेड काढल्याचा आरोप आहे.

नौसेना पाणबुडी दुर्घटना : दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू

Last Updated: Thursday, February 27, 2014, 15:50

भारतीय नौदलाच्या आयएनएस सिंधुरत्न पाणबुडीला बुधवारी लागलेल्या आगीनंतर बेपत्ता असलेल्या दोन अधिकाऱ्यांचे मृतदेह गुरूवारी सापडलेत. याबाबत नौदलाकडून तसे अधिकृत स्पष्ट करण्यात आले.

सिंधुरत्न दुर्घटना : नौदल प्रमुखांचा राजीनामा

Last Updated: Wednesday, February 26, 2014, 22:54

`सिंधुरत्न`च्या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून नौदल प्रमुख एडमिरल डी के जोशी यांनी राजीनामा दिलाय. संरक्षण मंत्रालयाने जोशींचा राजीनामा स्वीकारलाय.

सिंधुरत्न पाणबुडीला अपघात, दोघे जखमी

Last Updated: Wednesday, February 26, 2014, 14:58

मुंबई किनारपट्टीजवळ सिंधुरत्न पाणबुडीला अपघात झाल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. या अपघातात दोघे जखमी झाल्याचे म्हटले आहे.

अंदमान निकोबार बेटांवर यापुढील कारगील होईल

Last Updated: Monday, February 3, 2014, 20:45

भारतीय माजी नौसेना प्रमुख एडमिरल अरूण प्रकाश यांच्या मते अंदमान निकोबार बेटांवर यापुढील कारगील होईल. राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या सेवाभावी संस्थेने आयोजीत केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना अरूण प्रकाश यांनी हे मत व्यक्त केले आहे.

नेव्हीच्या जहाजाची बोटीला धडक

Last Updated: Tuesday, December 24, 2013, 18:59

नेव्हीच्या जहाजाने धडक दिल्याने समुद्रात मच्छिमारी करणाऱ्या अलसौबान या बोटीला जलसमाधी मिळालीय. काल रात्री ही घटना दापोली तालुक्यातल्या हर्णे बंदरात घडलीय. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

अखेर ‘आयएनएस विक्रमादित्य’ भारतीय नौदलात दाखल

Last Updated: Saturday, November 16, 2013, 22:43

खूप प्रतिक्षेनंतर `आयएनएस विक्रमादित्य` ही विमानवाहू नौका आज भारतीय नौदलात दाखल झालीय. मागील पाच वर्षांपासून विविध कारणांमुळं ही प्रलंबित राहत होती. सेवरोदविंस्क या बेटावरील एका कार्यक्रमात रशियानं ही नौका आज भारताला सोपवली. या नौकेमुळं भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे.

‘आयएनएस विक्रांत’ची चीनला भरली धडकी

Last Updated: Wednesday, August 21, 2013, 11:43

भारतीय बनावटीनं बनलेलं विमानवाहू जहाज ‘आयएनएस विक्रांत’ आणि ‘जापानचं हेलिकॉप्टर’ सैन्यात सहभागी केल्यानं चीनला धडकी भरलीय. चीनमधील मीडियात आलेल्या एका बातमीत असा आरोप करण्यात आलाय की, काही देश चीनचं सामर्थ्य संतुलित करण्यासाठी भारताचं समर्थन करत आहेत.

अमेरिका नौसेनेच्या केंद्रात स्फोट, आठ जखमी

Last Updated: Wednesday, August 21, 2013, 11:13

अमेरिकेच्या न्यूजर्सी येथील नौसेनेच्या केंद्रात मंगळवारी झालेल्या स्फोटात आठ लोकं जखमी झाल्येत.या भयंकर स्फोटात घायाळ झालेल्यापैकी एक गंभीर जखमी असून स्फोटाचं कारण शोधलं जातय.

नौसैनिक ओळखीसाठी मृतदेहांची डीएनए चाचणी

Last Updated: Friday, August 16, 2013, 12:46

सिंधुरक्षक पाणबुडीतून ३ मृतदेह मिळालेत. तीनही मृतदेह वाईट अवस्थेत आहेत. त्यांच्या डीएनए चाचणीसाठी ते आयएनएस अश्विनी इथे पाठवणण्यात आलेत. पाणबुडी आणि या मृतदेहांची अवस्था पाहता इतर १५ जण जिवंत असण्याची शक्यता धूसर वाटत असल्याचं नौदलाने स्पष्ट केलंय.

सिंधुरक्षक दुर्घटना : तीन नौसैनिकांचे मृतदेह हाती

Last Updated: Friday, August 16, 2013, 12:41

सिंधुरक्षक पाणबुडीतील बेपत्ता १८ नौसैनिकांपैकी दोन सैनिकांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहेत. अद्याप १६ नौसैनिकांचा शोध सुरू आहे.

४० तासांनंतरही १८ नौसैनिकांचा पत्ता नाहीच!

Last Updated: Thursday, August 15, 2013, 17:27

सिंधुरक्षक पाणबुडी दुर्घटनेला 40 तास उलटून गेले तरी अद्याप 18 बेपत्ता नौसैनिकांचा शोध लागलेला नाही... त्यामुळे हे सर्वजण मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जातेय.

`माझा अमर गेला, पण नेव्हीला धडा शिकवायलाच हवा`

Last Updated: Tuesday, June 18, 2013, 11:40

ही बातमी आहे एका आईच्या लढ्याची.... डोंबिवलीला राहणाऱ्या अनुराधा पळधे यांच्या लढ्याची... अनुराधा पळधे यांचा नौदलाशी गेली सतरा वर्षं न्यायालयीन लढा सुरु आहे.

सेक्स स्कँण्डल उजेडात, महिलेला धमकी

Last Updated: Tuesday, June 4, 2013, 16:00

नौदलातील सेक्स स्कँण्डल काही दिवसापूर्वीच उजेडात आले होते. नौदलातील सहकार्‍यांसोबत संबंध ठेवण्यास बळजबरी केली जात असल्याचा आरोप एका अधिकार्‍याच्या पत्नीने केला आहे.

नौदलातलं आणखी एक `सेक्स स्कँडल` उघडकीस!

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 08:52

भारतीय नौदलात आणखी एका कथित सेक्स स्कॅन्डल उघडकीला आलंय. यावेळी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नीनं आपल्या पतीवरच आरोप ठेवलाय की, तो आपल्या सहकाऱ्यांबरोबर सेक्ससाठी आपल्यावर दबाव टाकतो.

प्रमोशनसाठी पत्नीला करायला लावली १० जणांशी शय्यासोबत!

Last Updated: Thursday, April 11, 2013, 19:16

भारतीय नौदलात नैतिक अधःपतनाची घटना समोर आली आहे. कोची येथी एका तरुण नौसेना अधिकाऱ्याच्या पत्नीने आपला पती आणि त्याच्या दहा वरीष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप केला आहे, की पदोन्नतीसाठी आपल्या पतीने आपल्याला वरीष्ठ अधिकाऱ्यांशी शय्यासोबत करण्यास भाग पाडले.

लादेनचा जावई अटकेत, अमेरिकेच्या ताब्यात

Last Updated: Friday, March 8, 2013, 20:03

आंतरराष्ट्रीय दशहतवादी ओसामा बिन लादेन याचा जावई सुलेमान अबू गैथ याला अटक करण्यात आली आहे. त्याला अमेरिकेने ताब्यात घेतले आहे.

लादेनला ठार मारणारा जगतोय हालाखीचे जीवन

Last Updated: Wednesday, February 13, 2013, 07:10

अलकायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला ज्या अमेरिकेच्या सील कमांडोने गोळ्या घालून ठार केले, त्यालाच हालाखीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे. ही धनाढ्य अमेरिकेतील बाब उघड झाल्याने आश्चर्च व्यक्त होत होत.

ऐतिहासिक `विक्रांत` भंगारात जाणार?

Last Updated: Friday, November 30, 2012, 10:01

१९७१च्या पाकिस्तान युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या, एकेकाळी भारतीय नौदलाची शान असलेल्या आयएमएस विक्रांत या विमानवाहू युद्ध नौकेचे भवितव्य अंधारात आहे.

नौदलातील हेलिकॉप्टरला अपघात, तिघांचा मृत्यू

Last Updated: Monday, October 15, 2012, 13:41

भारतीय नौदलातील चेतक हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. त्यात तिघांचा दुर्दैवी मुत्यू झाला आहे. त्यात दोन वैमानिकांचा समावेश आहे.

रशियन पाणबुडी भारतीय नौदलात दाखल होणार

Last Updated: Wednesday, December 28, 2011, 16:47

भारतीय नौदलात बहू प्रतिक्षीत रशियन बनावटीची नेरपा ही अणवस्त्र सज्ज पाणबूडी येत्या काही दिवसात दाखल होणार आहे. ही पाणबूडी दहा वर्षांच्या लीजवर घेण्यात आली असून तिची किंमत आहे तब्बल ९२० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.

हमसे बढकर कौन, राष्ट्रपतींना नौदलाची मानवंदना

Last Updated: Tuesday, December 20, 2011, 10:33

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचं आज मुंबई बंदरावर आगमन झालं आहे. राष्ट्रपती तिन्ही दलांचे प्रमुख असतात त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ भारतीय नौदलातर्फे संचलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सव साजरा

Last Updated: Monday, December 19, 2011, 05:49

गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सवाच्या निमित्त गोवा सरकारच्या वतीनं कृतज्ञता म्हणून ऑपरेशन विजयमध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचा सन्मान करण्यात आला. पन्नास वर्षापूर्वी पोर्तूगीजांची राजवट उलथवून लावण्यात नौदल, वायूदल आणि सेनादलातील सैनिकांनी महत्वाची कामगिरी बजावली होती.

अरबी समुद्रात सोमालियन चाच्यांचा थरार!

Last Updated: Saturday, November 12, 2011, 07:11

सोमालियन चाच्यांच्या पाच लहान बोटी एक व्यापारी जहाज लुटण्याच्या तयारीत असल्याचं INS सुकन्या मधील जवानांना समजलं. त्यानंतर जवानांनी तात्काळ कारवाई करत या चाच्यांचा डाव हाणून पाडला. दोन बोटीतील जवान मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले.