महापालिकेविरुद्ध पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल

Last Updated: Wednesday, May 21, 2014, 08:19

ठाणे महापालिकेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कळव्यातील एका प्रकरणात करारपत्रात नमूद असलेल्या जागेपेक्षा कमी आकाराची घरं दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पालिका बजेटमध्ये काय काय मिळणार मुंबापुरीला?

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 09:39

देशातली सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचे बजेटही सर्वाधिक मोठे असते. आज स्थायी समिती बैठकीत वर्ष २०१४-२०१५ साठी पालिकेचं बजेट मांडलं जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरचे हे बजेट असल्यानं त्याला अधिक महत्त्व आहे.

कोल्हापुरानं केलं राज्याला जागं... पण, हिंसा असमर्थनीय!

Last Updated: Tuesday, January 28, 2014, 11:20

कोल्हापूर महानगरपालिकेच्या टोल विरोधातल्या विशेष सभेचा प्रस्ताव राज्य सरकारला प्राप्त झालाय. आता हा एका जिल्ह्याचा प्रश्न नाही, तर राज्यात टोल विरोधात आंदोलनाची एक लाट आलीय.

आता टपाल तिकीटावर ‘राजमुद्रा’!

Last Updated: Thursday, January 2, 2014, 21:40

कर्जत नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मनसेनं अनोखी शक्कल लढवलीय... टपालाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोचण्याच्या कालबाह्य पद्धतीला पक्षानं पुनरुज्जीवन दिलंय... त्यासाठी मनसेनं चक्क राज ठाकरेंची टपाल तिकीटं छापून घेतलीहेत...

बाप्पाच्या तलाव विसर्जनाला बंदी!

Last Updated: Monday, July 22, 2013, 12:59

एकिकडे संपूर्ण महाराष्ट्राला गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच नागपूर महानगर पालिकेने बाप्पाच्या सर्वच प्रकारच्या मूर्तींच्या तलावात विसर्जनावर बंदी आणली आहे.

राज ठाकरेंची आश्वासनं `इंजिना`च्या धुरात विरणार?

Last Updated: Monday, June 24, 2013, 19:04

नाशिकमध्ये आजवर सत्ताधारी मनसेचा प्रवास पाहता ही आश्वासनं इंजिनाच्या धुरात विरुन जाण्याचीच शक्यता नाशिककरांना जास्त वाटतेय.

जनतेकडूनही आहेत मनसेला अपेक्षा - राज ठाकरे

Last Updated: Monday, June 24, 2013, 13:24

मनसे अध्यक्ष राज ठाकरे रविवारपासून नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. आज दुपारी ते पत्रकारांना सामोरे गेले. यावेळी त्यांनी नाशिकच्या विकासासाठी मनसे कटीबद्ध असल्याचा पुनरुच्चार केलाय.

१३ फ्लॅटसचा कर चुकवणारे शेलार अडचणीत!

Last Updated: Wednesday, June 5, 2013, 10:45

पुणे मनपाचे उपायुक्त रमेश शेलार यांना मिळकत कर चुकवल्याप्रकरणी तीन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आलेत.

झोपेतच सादर झाला अर्थसंकल्प!

Last Updated: Thursday, May 30, 2013, 15:56

नागपूर महानगरपालिकेचा २०१३-१४ चा अर्थसंकल्प सादर झाला. अर्थसंकल्प सादर होताना नागपूरचे नगरसेवक मात्र गाढ झोपेत असल्याचं चित्र सभागृहात पहायला मिळालं.

भिवंडी महापालिकेत ५८ पदांसाठी भरती

Last Updated: Thursday, March 28, 2013, 18:17

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत ५८ जागा भरण्यात येणार आहे. वेगवेगळ्या पदासाठी भिवंडी महापालिकेत जागा भरती जाहीर करण्यात आली आहे.

वसुलीसाठी पालिकेकडून बँड, बाजा, बरात!

Last Updated: Saturday, March 16, 2013, 08:12

मिळकत कराची थकबाकी वसूल करण्यासाठी पुणे महापालिकेनं अनोखी शक्कल लढवलीय. ही थकबाकी न भरणाऱ्याऱ्यांची मात्र दारासमोर बँड, बाजा, बरात घेऊन आलेल्या पालिकेला पाहून चांगलीच धांदल उडाली.

घंटागाडी पडली मागे, आता `रोबोटिक मशीन्स`चा घाट!

Last Updated: Wednesday, February 6, 2013, 09:35

गेले कित्येक महिने प्रदूषणात अडकलेली गोदावरी आता कुठे मोकळा श्वास घेतेय आणि हे शक्य झालं महापालिकेच्याच पाण्यावरची घंटागाडी या प्रकल्पातून... त्याचं यश दिसत असतानाच महापालिकेनं नवा घाट घातलाय रोबोटिक मशीन्स खरेदीचा...

नांदेड पालिका काबीज, अशोकरावांच्या कामाचं होणार चीज?

Last Updated: Monday, October 15, 2012, 18:13

नांदेड महानगरपालिका निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी आपला करिष्मा दाखवला आणि पालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविला आहे.

निकाल महापालिका निवडणुकीचा, `अशोकपर्व सुरू`

Last Updated: Monday, October 15, 2012, 14:22

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने आघाडी घेतली आहे. ८१ पैकी ७४ जागांचे कल स्पष्ट झाले आहेत.

एव्हरेस्ट सर करणारे बहाद्दर मनपाच्या विस्मृतीत

Last Updated: Friday, October 12, 2012, 13:31

ज्या सागरमाथा वीरांनी पिंपरी चिंचवडचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात मोठं केलयं त्या विरांच्या इच्छेला नव्या अपेक्षा देऊन नुस्ती टांगणी लावण्याचं काम महापालिका करत आहे.

नगरसेवक होणार 'मालामाल'

Last Updated: Wednesday, August 1, 2012, 19:06

मुंबई महापालिकेचे नगरसेवक मालामाल होणार आहेत. प्रत्येक नगरसेवकाला आता महिन्याला २५ हजार रुपये मानधन म्हणून मिळणार आहेत. सोबतच लॅपटॉप आणि एण्ड्रॉइड फोनचीही सुविधा आता नगरसेवकांना महापालिकेकडूनच मिळणार आहे.

ही शाळा की गुरांचा गोठा?

Last Updated: Friday, July 27, 2012, 11:32

उमरखेड नगरपालिकेची तातारशा बाबा उर्दू शाळा... इथं शिकत असलेली मुलं नाही तर बांधलेली गुरं दिसतील... शाळेच्या परिसरातली ही दृश्यं पाहिल्यांनंतर याला गुरांचा गोठा का म्हणू नये, असा प्रश्न पडतो. हे कमी की काय, एकाच खोलीत दीडशे विद्यार्थी बसवले जातात. त्याच खोलीत पोषण आहारही शिजवला जातो. ना शौचालय ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था... आणि अशाच परिस्थितीत विद्यार्थी इथं शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

गोविंदांना महापालिकेचं सुरक्षा कवच

Last Updated: Saturday, July 14, 2012, 11:45

मुंबईतली गोविंदा पथकं आणि गणेश मंडळांच्या स्वयंसेवकांना आता विम्याचं संरक्षण मिळणार आहे. मुंबई महापालिकेनं दहीहंडीवेळी अपघातग्रस्त झालेल्या गोविंदांचा विमा काढण्याचा निर्णय घेतलाय.

स्त्री भ्रूणहत्या महापालिका करतेय दुर्लक्ष

Last Updated: Tuesday, May 15, 2012, 19:59

स्त्री भ्रूण हत्यांसारखा महत्त्वाच्या प्रश्नावर पुणे महापालिकेनं दुर्लक्ष केलं आहे. गर्भलिंग निदान रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेला स्वतंत्र कक्षालाच आरोग्य विभागानं टाळं ठोकलं आहे.

ठाण्यात राडा, महासभा तहकूब

Last Updated: Friday, April 20, 2012, 19:25

काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांत बाचाबाची आणि मारहाण झाली आहे. या गदारोळात अज्ञात व्यक्ती समजून शिवसेनेच्या नगरसेवकांनी मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्तांना मारहाण केल्याचं समोर आल्यानंतर, सत्ताधारी बॅकफूटवर गेले.

सेना-NCP नगरसेवकांची पालिकेत राडा

Last Updated: Friday, April 20, 2012, 16:11

आज ठाणे महानगरपालिकेत एकच राडा झाला. कारण की, सेना - राष्ट्रवादी नगरसेवक ह्यांनी मोठ्या प्रमाणात हाणामारी करावी लागली. शेवटी पोलिसांना मध्यस्ती करावी लागली. पोलिसांनी मध्ये ही हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र नगरसेवक एकमेंकांना अक्षरश: गुंडांसारखे मारत होते.

सेनेने नाशिकमध्ये केला मनसेचा 'गेम'

Last Updated: Wednesday, April 18, 2012, 21:23

आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या नाशिक स्थायी समितीच्या निवडणुकीत काँग्रेसनं बाजी मारत मनसेला झटका दिला आहे. उद्धव निमसे यांनी मनसेच्या अशोक मुर्तडक यांना ९ विरुद्ध ७ मतांनी पराभव केला.

चंद्रपूर पालिकेत कोण मारणार बाजी??

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 17:09

ऐतिहासीक पार्श्वभूमी असलेल्या चंद्रपूर शहराच्या स्थापनेला ५०० वर्ष पूर्ण झाली आहेत. पंचशताब्दीच्या पार्श्वभूमीवर शहरात आता महापालिका स्थापन झाली आहे. पहिल्या महापालिकेसाठी येत्या १५ तारखेला मतदान होणार आहे.

मुंबई पालिकेसाठी 'घसघशीत अर्थसंकल्प' सादर

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 14:53

मुंबई महापालिकेचा २०१२-१३ चा अर्थसंकल्प महापालिका आय़ुक्त सुबोध कुमार यांनी आज सादर केला. यात शिक्षणासाठी २,३४२ कोटी ची तरतुद करण्यात आली आहे.

मुंबई पालिकेचे बजेट, पाणी, वीज महाग?

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 13:13

मुंबई महापालिकेचा २०१२-१३ चा अर्थसंकल्प पालिका आयुक्त सुबोध कुमार स्थायी समितीत सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात पाणी आणि वीज महागण्याची शक्यता वर्तवण्यात येते.

मनसेला नाही मत, सेनेला मोजावी लागणार किंमत!

Last Updated: Monday, March 19, 2012, 19:42

नाशिकमध्ये मनसेला अपशकून करू पाहणा-या शिवसेनेला त्याची किंमत आता ठाण्यात चुकवावी लागतेय.... शिवसेनेच्या नाशिकमधील भूमिकेनं संतप्त झालेल्या मनसेनं ठाण्यातला ठाकरे पॅटर्न मोडीत काढून युतीऐवजी आघाडीला पाठिंबा दिलाय.

मनसेची साथ, NCPचा महापौरपदाचा घास?

Last Updated: Monday, March 19, 2012, 17:49

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं महापौरपदाचा ताबा घेतला आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक मनोहर साळवी महापौरांच्या खुर्चीत बसले. तर हनुमंत जगदाळे यांची सभागृह नेतेपदी निवड केली आहे.

हा तर सेनेचा रडीचा डाव – जितेंद्र आव्हाड

Last Updated: Monday, March 19, 2012, 19:41

शिवसेनेनं रडीचा डाव खेळत ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली, असा आरोप राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी केलाय. कोकण भवनातून पाठिंब्याबाबतचं पत्र न मिळाल्यामुळं महापौरांनी निवडणूक पुढे ढकललीय.

सुरेश जैन आज होणार कोर्टात हजर

Last Updated: Monday, March 19, 2012, 11:27

जळगावमधल्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी आरोपी असलेल्या आमदार सुरेश जैन यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यांची नऊ दिवसांची पोलीस कोठडी आज संपत आहे.

सुरेशदादांची १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

Last Updated: Monday, March 12, 2012, 09:08

सुरेशदादा जैन यांना काल मध्यरात्री अटक केल्यानंतर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांची रवानगी १९ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

नाशिक महापालिका निवडणुका होणार पुन्हा?

Last Updated: Sunday, March 4, 2012, 22:31

नाशिक महापालिकेची निवडणूक पुन्हा व्हावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. यासाठी दररोज न्यायालयात याचिका दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व पराभूत उमेदवार एकत्र आले आहेत.

नागपुरात काँग्रेसचा जोर, गडकरींवर होणार शिरजोर?

Last Updated: Tuesday, January 17, 2012, 23:58

भाजप अध्यक्ष नितीन गडकरींच्या ताब्यात असलेली नागपूर महापालिका खेचण्यासाठी काँग्रेसनं चांगलाच जोर लावला आहे. २०१४ च्या निवडणुकीत गडकरींनी लोकसभा लढवण्याचे संकेत दिलेत.

राष्ट्रवादी राज्यात अगदी जोरात.....

Last Updated: Wednesday, December 14, 2011, 11:11

राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपालिकेवर विजयाची पतका फडकावल्यानंतर आज ४६ नगरपालिकांचा निकाल येत आहे. यात देखील राष्ट्रवादीने आपला ठसा उमटवला आहे. राष्ट्रवादीने राज्यातील अनेक नगरपालिकेवर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे.

उर्वरित नगरपालिकांचे निकाल आज

Last Updated: Wednesday, December 14, 2011, 10:46

राज्यातल्या ४६ नगरपालिका निवडणुकांची मतमोजणी आज होते आहे. काल १९ नगरपालिकांसाठी झालेले मतदान आणि ११ तारखेला मतदान झालेल्या काही पालिका अशा ४६ नगरपालिकांची मतमोजणी आज होणार आहे.

'काल मतदान', 'आज निकाल' विजय कोणाचा?

Last Updated: Monday, December 12, 2011, 04:49

राज्यातील १२८ नगरपालिकांची मतमोजणी आज सुरू झाली आहे. त्यामुळे या नगरपालिकेमध्ये अनेक दिग्गजांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार हे निश्चित.

सोलापूर पालिकेत कोटीच्या कोटी उड्डाणे

Last Updated: Tuesday, December 6, 2011, 15:27

सोलापूरच्या राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली. महापालिकेतल्या सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या एका रस्ते ठेकेदारानं आपल्याला एक कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप भाजपचे विरोधी पक्षनेते सुरेश पाटील यांनी केला

बीड- साताऱ्यात 'राजेंची बाजी...

Last Updated: Thursday, December 1, 2011, 12:27

नगरपालिकांच्या निवडणुका आठवडाभरावर आल्या असताना प्रचाराचं घमासान सुरु आहे. मात्र साताऱ्यात तब्बल १७ तर बीडमध्ये ७ उमेदवार बिनविरोध निवडले गेल्यानं या गावातल्या बिनविरोध पॅटर्नची चर्चा सुरु झाली.