डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी गोव्यातून दोघे ताब्यात

Last Updated: Saturday, December 7, 2013, 11:20

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. शुक्रवारी दुपारी 2 वाजता गोव्यातून दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या दोघांना ताब्यात केलीय..

बेकायदेशीर गुटखा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

Last Updated: Thursday, September 12, 2013, 11:49

महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असताना रायगड पोलिसांनी जिल्ह्यात बनावट गुटखा तयार करणाऱ्या एका टोळीच्या मुसक्या आवळल्यात. विशेष म्हणजे ही टोळी एका आलिशान बंगल्यात हा बनावट गुटखा तयार करण्यात मग्न होती.

बिअर पार्टी उद्धवस्त, १२ मुली ताब्यात

Last Updated: Wednesday, July 31, 2013, 21:34

लोणावळ्यातल्या एका बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकला. पवना डॅमच्या बॅक वॉटर परिसरात बंगल्यात एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. छाप्यादरम्यान 12 मुलींसह 35 जणांना ताब्यात घेण्यात आलंय.

पुन्हा नशेत `चिल्लर पार्टी` पोलिसांच्या ताब्यात!

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 14:43

गुडगावमध्ये जिल्हा प्रशासनाच्या विशेष टीमनं टाकलेल्या धाडीत एका बारमधून नऊ अल्पवयीन मुला-मुलींना ताब्यत घेण्यात आलंय. हे सगळे अल्पवयीन मुल-मुली दारुच्या नशेत धुंद होते.

स्पॉट फिक्सिंगः पुण्यातील बुकीला घेतले ताब्यात

Last Updated: Monday, June 3, 2013, 10:59

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी पोलिसांचे अटकसत्र सुरूच असून मुंबई क्राईम ब्रांचने याप्रकरणी पुण्यातील एका मोठ्या बूकीला ताब्यात आहे.

`रक्ताच्या होळी`चा हिजबुलचा डाव उधळला!

Last Updated: Friday, March 22, 2013, 12:04

दिल्लीत घातपात घडवून आणण्याचा अतिरेक्यांचा कट उधळण्यात आलाय. दिल्लीच्या एका गेस्ट हाऊसमधून स्फोटकांचा भला मोठा साठा आणि शस्त्र जप्त करण्यात आलाय. होळीच्या अगोदरच दिल्लीत ‘रक्ताची होळी’ खेळण्याचा दहशतवाद्यांचा डाव पोलिसांनी हाणून पाडलाय.

हैदराबाद बॉम्बस्फोट : १० जण ताब्यात

Last Updated: Thursday, March 14, 2013, 12:10

हैदराबादच्या दिलसुखनगरमध्ये झालेल्या दोन बॉम्बस्फोट प्रकरणी दहा जणांना ताब्यात घेण्यात आलंय. बिहारमधील मुंगेरमध्ये ही कारवाई करण्यात आली.

अहमदनगरमध्ये तिघांचा खून, दोन जण ताब्यात

Last Updated: Thursday, January 3, 2013, 16:36

अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यात सोनाई येथे तिहेरी हत्याकांडामुळे खळबळ माजली आहे. एकाच वेळी तीन जणांचा खून झाल्याचे निदर्शनास आले आहे.

आंबेडकर झाले हक्काच्या घराला पारखे!

Last Updated: Thursday, December 6, 2012, 08:35

इंदू मिलची जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी देण्याची घोषणा संसदेत झाली असली तरी बाबासाहेबांच्या मालकीची जमीन मात्र अजुनही केंद्र सरकाच्याच ताब्यात आहे.

ऊस आंदोलन पेटलं, राजू शेट्टी ताब्यात, बस जाळली

Last Updated: Monday, November 12, 2012, 10:55

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांना इंदापूरमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोणीदेवकर इथं संतप्त शेतक-यांनी बस जाळलीये. दोन ते तीन बसच्या काचा फोडण्यात आल्यात. तर अनेक बस बंद पाडण्यात आल्यात.

मनसेच्या दोन आमदारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Last Updated: Monday, October 15, 2012, 19:12

मुंबईत ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मनसे तर्फे रास्ता रोको करण्यात आला होता. कांजुरमार्ग डंम्पिंग ग्राउंडच्या विरोधात मनसेनं रास्ता रोको केला होता.

'अल्पवयीन' दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात

Last Updated: Friday, October 12, 2012, 13:16

चंद्रपूर शहरात घरफोडी करणाऱ्या शाळकरी मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भीक मागण्याचं नाटक करून संधी मिळताच घरफोडी करण्याची त्यांची पद्धत होती. त्या शाळकरी मुलांकडून अडीच लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आलेत.

क्रांतिस्तंभावर लाथ मारणारा, पोलिसांच्या ताब्यात

Last Updated: Friday, August 31, 2012, 08:37

सीएसटी परिसरातील पवित्र अमर जवान क्रांतिस्तंभावर लाथा मारून त्याची नासधूस करणार्‍या शाहबाज अब्दुल कादीर शेख (२०) याला क्राइम ब्रँचच्या अधिकार्‍यांनी माहीम येथून अटक केली.

मुलुंडमध्ये बारवर छापा, १३ बारबाला ताब्यात

Last Updated: Sunday, July 15, 2012, 11:54

मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं रात्री उशीरा मुलुंडच्या पुष्पा बारवर छापा टाकला. यावेळी १३ बारबाला आणि २६ जणांसह बारमधल्या कर्मचा-यांना ताब्यात घेण्यात आलं. यावेळी एक लाख रुपये जप्त करण्यात आले.

सेना-मनसेत जुंपली, आमदाराला घेतलं ताब्यात

Last Updated: Tuesday, May 8, 2012, 13:47

डोंबिवलीत ग्रंथालयाच्या श्रेयावरून शिवसेना-मनसेत जुंपली आहे. उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज दुपारी ४ वाजता उदघाटनाचा कार्यक्रम असताना मनसे आमदार रमेश पाटील यांनी मनसे कार्यकर्त्यांसह या ग्रंथालयाचं बळजबरीनं उदघाटन उरकलं आहे.

डिस्को पबवर छापा, १६ तरुणी ताब्यात

Last Updated: Monday, April 30, 2012, 09:53

मुंबईच्या खार भागात मॅडनेस डिस्को पब आणि बारवर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी १६ मुली आणि १२ जणांना अटक करण्यात आली.

मुंबईत बारवर छापा, आठ मुली ताब्यात

Last Updated: Saturday, March 31, 2012, 12:07

मुंबईतल्या कुलाबा भागातल्या वुडो बारवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी वेश्या व्यवसाय करणा-या आठ मुली आणि 22 ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आणखी दोन संशयित अतिरेकी ताब्यात

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 16:35

औरंगाबादपाठोपाठ बुलढाणा जिल्हातल्या चिखलीतून दोन संशयित अतिरेक्यांना काल रात्री ताब्यात घेण्यात आलंय. अकोला एटीएसनं ही कारवाई केलीय. अखिल मोहम्मद युसूफ खिलची आणि मोहम्मद जाफर या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे दोघे संशयित खांडव्याचे असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.