मुंबईत मेट्रो उद्यापासून धावणार, अधिकृत घोषणा

Last Updated: Saturday, June 7, 2014, 14:42

मुंबईत मेट्रो ट्रेन उद्यापासून धावणार आहे. मुंबई मेट्रोचे सीईओ अभय मिश्रा यांनी याबाबत आज अधिकृत घोषणा केलीय.

नरेंद्र मोदींच्या लग्नावर स्पष्टीकरण

Last Updated: Thursday, April 10, 2014, 13:08

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी प्रतिज्ञापत्रावर आपल्या पत्नीचं नाव जसोदाबेन असल्याचं सांगितल्यानंतर हजारो सवाल उपस्थित केले जात आहेत.

सोमय्या माफी मागा, अन्यथा १०० कोटींचा दावा - भुजबळ

Last Updated: Thursday, March 13, 2014, 19:13

भ्रष्टाचारांच्या आरोपांप्रकरणी बिनशर्थ माफी मागा, अन्यथा १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहोत, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिलाय. याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भुजबळ यांनी रितसर नोटीस बजावली आहे.

सोमय्यांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार - भुजबळ

Last Updated: Sunday, February 23, 2014, 11:04

आयटी रिटर्न्ससंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांनी म्हंटलंय. त्याचबरोबर सोमय्या कुणाची तरी सुपारी वाजवण्याचं काम करतायत, असं म्हणत भुजबळांनी सोमय्यांवर टीका केलीय.

छगन भुजबळ कंपनीविरोधात लाचलुचपत विभागाकडे तक्रार

Last Updated: Friday, February 21, 2014, 19:12

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, तसंच समीर आणि पंकज भुजबळ यांच्यावर नवे गंभीर आरोप केलेत. या तिघांनी आपल्या ११ कंपन्यांचे आयकर परतावे गेल्या ५ वर्षांत भरलेच नसल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय.

सोमय्या हॉस्पीटलची लिफ्ट कोसळली

Last Updated: Thursday, December 12, 2013, 21:23

सायन-चुनाभट्टी इथं असलेल्या के.जे सोमय्या हॉस्पिटलमध्ये आज लिफ्ट कोसळली. मात्र, सुदैवानं या अपघातात जीवितहानी झाली नाही.

केंद्रीय मंत्री शुक्लाना अंधेरीत १०० कोटींचा भूखंड - सोमय्या

Last Updated: Friday, December 6, 2013, 20:38

काँग्रेस नेते राहुल गांधींचे मित्र आणि केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांच्या कंपनीला अंधेरी येथील सुमारे १०० कोटी रूपयांचा भूखंड दिल्याबाबतची फाइल मंत्रालयाच्या आगीत जळून खाक झाली आहे.

राजस्थानच्या निवडणुकीत मुंबईकरांची प्रतिष्ठा पणाला!

Last Updated: Thursday, November 28, 2013, 17:39

राजस्थान विधानसभा निवडणुकीत अशोक गेहलोत आणि वसुंधरा राजे यांच्यासोबतच मुंबईकर गुरूदास कामत आणि किरीट सोमय्या यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

जेव्हा भुजबळ-सोमय्या येतात आमने-सामने!

Last Updated: Monday, September 9, 2013, 21:12

गणपती बाप्पा कधी काय चमत्कार घडवेल, याचा नेम नाही... विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या विलेपार्ल्यातल्या घरीही असाच एक राजकीय चमत्कार बाप्पानं घडवला. एकमेकांवर आगपाखड करणारे छगन भुजबळ आणि किरीट सोमय्या एकत्रच आले नाही तर चक्क गळाभेट करतांना दिसले.

चुनाभट्टीतल्या झोपडपट्टीत कोट्यावधींचा घोटाळा!

Last Updated: Sunday, August 4, 2013, 18:24

मुंबईच्या चुनाभट्टी इथल्या झोपडपट्टीतील रहिवाशांच्या नावे सरकारकडून घरे मिळवून अपात्र लोकांना भरमसाठ किंमतीत विकल्याचा आणि यामधून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप होतोय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केलीय.

कुटिल भाजपचे किरीट राजदूत- काँग्रेस

Last Updated: Sunday, July 28, 2013, 19:33

भाजपच्या गप्पा नैतिकतेच्या असल्या तरी त्यांची कृती मात्र कुटीलतेची असल्याचं वारंवार दिसून आलंय. भाजपातल्या आधुनिक गोबेल्सनं किरीट सोमय्यांना आपला खास दूत म्हणून निवडलंय.

महाराष्ट्रात `आदर्श कोळसा घोटाळा`!

Last Updated: Saturday, July 6, 2013, 23:23

महाराष्ट्रातही कोळसा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या य़ांनी केलाय. मंत्री, सनदी अधिकारी आणि माफीया यांच्यातल्या साटेलोट्यातून हा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय.

वायुदलावर मराठी झेंडा, सोमण यांची भरारी

Last Updated: Wednesday, July 3, 2013, 23:42

वायू दलाच्या सर्वात महत्वाच्या आणि सर्वात मोठ्या अशा पश्चिम वायूदल विभागाचे प्रमुख म्हणून एअर मार्शल सुनिल सोमण ह्यांनी सुत्रे घेतली आहेत. पश्चिम वायूदल विभागाचे मुख्यालय नवी दिल्ली इथे सोमण ह्यांनी आज पदभार स्वीकारला.

भुजबळ-बेंडसेंच्या संबंधांचा पर्दाफाश

Last Updated: Saturday, May 18, 2013, 20:51

सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे ओएसडी राहिलेले संदीप बेडसे यांचे व्यावसायिक संबंध असल्याचं उघड झालंय.

नागपुरातही `चिखलीकर`!

Last Updated: Monday, May 13, 2013, 22:32

नागपुरात गैरव्यवहाराप्रकरणी निलंबित असलेल्या उप अभियंत्यानं आपल्या मुलालाच PWDविभागातली बांधकामाची कंत्राटं दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलाय.

चिखलीकरांच्या डोक्यावर भुजबळांचा वरदहस्त?

Last Updated: Sunday, May 5, 2013, 00:15

सार्वजनिक बांधकाम विभागाचे लाचखोर मुख्य अभियंता सतीश चिखलीकर यांच्यामागे छगन भुजबळांचा वरदहस्त आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय.

महाराष्ट्रातही चिटफंड घोटाळा - किरीट सोमय्या

Last Updated: Friday, April 26, 2013, 13:29

महाराष्ट्रातही चिटफंड घोटाळा झाल्याचा खळबळजनक खुलासा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय... महाराष्ट्रात 10 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचं त्यांनी म्हटलय.

ढोल बडवून, नाचून साजरा केला किरीट सोमय्यांनी जल्लोष

Last Updated: Thursday, December 20, 2012, 12:49

मुंबईतील भाजपचे प्रवक्ते किरीट सोमय्या यांनी तर अक्षरश: स्वत: ढोल बडवून बडवून आणि नाचून आनंद साजरा करीत आहेत.

मोदींचे वडीलबंधू म्हणतात, त्यांना आमची गरज नाही...

Last Updated: Wednesday, December 5, 2012, 17:16

नरेंद्र मोदी... गुजरातचे मुख्यमंत्री... आत्तापर्यंत सामाजिक जीवनात अनेक प्रसंगात अनेक रुपांत लोकांसमोर आलेले नरेंद्र मोदी सर्वांनीच पाहिलेत. पण, याच नरेंद्र मोदींचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे...

भुजबळांच्या संपत्तीत १०० पटीनं वाढ – किरीट सोमय्या

Last Updated: Thursday, November 29, 2012, 16:32

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांवर गंभीर आरोप केला आहे. भुजबळ कुटुंबियांच्या संपत्तीत तीन वर्षांत १०० पटीनं वाढ झालीय आहे, असे आरोप करताना त्यांनी म्हटले.

सोमय्यांचा भुजबळांवर नवा आरोप

Last Updated: Wednesday, October 10, 2012, 17:08

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी छगन भुजबळ यांच्यावर आणखी एक बॉम्बगोळा टाकलाय. पुण्यातील हेक्सवर्ल्ड प्रकल्पात भुजबळांनी घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रकल्पात 40 फ्लॅट दिल्याचंही सोमय्या यांनी सांगितलय.

किरीट सोमय्यांचे काँग्रेस-राष्ट्रवादीवर सनसनाटी आरोप

Last Updated: Tuesday, October 9, 2012, 17:52

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा सिंचन घोटाळ्याबाबत राष्ट्रवादीच्या नेते आणि मंत्र्यांवर खळबळजनक आरोप केलेत. अजितदादा-रामराजे निंबाळकर आणि सुनील तटकरेंनी मिळून सिंचन घोटाळा केल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी केलाय. सिंचन घोटाळा करून त्याचा पैसा राष्ट्रवादी काँग्रेसनं 2009 च्या निवडणुकीसाठी वापरलाय.

सिंचन घोटाळा; अविनाश भोसले पुन्हा वादात

Last Updated: Wednesday, October 3, 2012, 09:36

गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा उपसा सिंचन योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे अविनाश भोसले पुन्हा एकदा चर्चेत आलेत.

'शौचालयात घोटाळा' आव्हाडांचा सोमय्यांवर आरोप

Last Updated: Sunday, September 30, 2012, 08:53

मुंबईमध्ये शौचालयं बांधण्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीच शौचालय बांधकामामध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला आहे, असं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे.

'भुजबळ - तटकरेंविरोधात ढीगभर पुरावे'

Last Updated: Wednesday, August 1, 2012, 13:14

राज्याचे बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी विविध कंपन्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. मात्र, या आरोपात तथ्य नसल्याचे सांगून किरीट सोमय्या यांचे आरोप भुजबळ आणि तटकरे यांनी फेटाळले होते. त्यानंतर सोमय्या यांनी आक्रमक भूमिका घेत ढीगभर पुरावे सादर केले आहेत.

छगन भुजबळ महाघोटाळेबाज - सोमय्या

Last Updated: Sunday, July 22, 2012, 13:22

महाघोटाळे करुनही मंत्रीपदावर कायम राहणा-या सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी राज्यपालांकडं करणार असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिलीय.

राष्ट्रपतींचा महाराष्ट्र सदनाच्या उद्घाटनाला नकार

Last Updated: Thursday, July 19, 2012, 21:20

दिल्लीत उभारण्यात आलेल्या नव्या महाराष्ट्र सदनाचं उद्घाटन वादाच्या भोव-यात सापडलंय. सदनाचं उद्घाटन करण्यास राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी नकार दिलाय.

सोमय्यांनी ठोठावलं पंतप्रधान कार्यालयाचं दार

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 11:14

किरीट सोमय्या यांनी येत्या 3 महिन्यात महाराष्ट्रातील सहा भ्रष्ट मंत्र्यांचा भ्रष्टाचार समोर आणण्याचा दावा केलाय. महाराष्ट्रातील मंत्री सुनील तटकरे यांच्या जमिनीच्या सात बाराचे उतारे किरीट सोमय्यांनी पंतप्रधानाच्या कार्यालयात दिले. इतके पुरावे असूनही का कारवाई होत नाही? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

'आदर्श'च्या 'क्लीन चीट'वरुन सोमैया आक्रमक

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 22:47

आदर्श प्रकरणात अडकलेल्या काँग्रेस नेत्यांना क्लिन चीट मिळाली असं काँग्रेसनं एकिकडे बोलायला सुरुवात केलीय आणि याच सगळ्या प्रकारावरती भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी टीका केलीय.

लष्कराच्या जमिनीवर कल्पतरूचं 'पार्किंग' !

Last Updated: Wednesday, January 18, 2012, 08:33

कांदिवली येथील ‘कल्पतरू बिल्डर्स ‌लँड’ घोटाळा प्रकरणी मंगळवारी लोकायुक्तांपुढे सुनावणी झाली. कांदिवलीमधील कल्पतरू बिल्डर्सनं लष्कराच्या जमिनीचा वापर पार्किंगसाठी केल्याचा आरोप असून मूळ राज्यसरकारची असलेली ही जमीन डिफेन्सला लीझवर देण्यात आली होती.

अरबी समुद्रात सोमालियन चाच्यांचा थरार!

Last Updated: Saturday, November 12, 2011, 07:11

सोमालियन चाच्यांच्या पाच लहान बोटी एक व्यापारी जहाज लुटण्याच्या तयारीत असल्याचं INS सुकन्या मधील जवानांना समजलं. त्यानंतर जवानांनी तात्काळ कारवाई करत या चाच्यांचा डाव हाणून पाडला. दोन बोटीतील जवान मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले.

भाजप मंत्री सोमण्णांना चप्पलेचा 'प्रसाद'

Last Updated: Sunday, October 9, 2011, 13:02

भारतीय जनता पक्षाच्या माजी कार्यकर्त्याने कर्नाटकचे घरबांधणी मंत्री व्ही. सोमण्णा यांच्यावर आज विधानसभेत चप्पल भिरकावली. मंत्र्यावर चप्पल भिरकावलेल्या कार्यकर्त्याचे नाव बी एस प्रसाद असे असून, तो भाजपचा कार्यकर्ता होता.