कम्प्युटरनं स्वत:ला ‘जिवंत व्यक्ती’ सिद्ध केलं

Last Updated: Wednesday, June 11, 2014, 15:17

एका कम्प्युटरनं आपण एक मशिन नसून जिवंत व्यक्ती असल्याचं सिद्ध करून दाखवलंय... त्यामुळे जगभर आश्चर्य व्यक्त केलं जातंय. रशियामध्ये हा कम्प्युटर बनवला गेलाय.

`जिवंतपणी कुणावरही शालेय अभ्यासक्रमात धडा नको`- मोदी

Last Updated: Friday, May 30, 2014, 10:17

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या जीवनावर आधारीत धडा शालेय पाठ्यक्रमात सामाविष्ठ करण्यात येऊ नये, असं ट्वीट करून स्पष्ट केलं आहे.

चीनमध्ये भटक्या कुत्र्यांना जिवंत गाडले

Last Updated: Tuesday, April 29, 2014, 15:25

चीनमध्ये प्राण्यांवर दया माया दाखविली जात नाही, हेच दिसून येत आहे. चीनच्या उत्तरेकडील भागात तब्बल १०० भटक्या कुत्र्यांना जमिनीत जिवंत गाडल्याची घटना पुढे आलेय. हा प्रकार समजताच प्राणीप्रेमींचा संताप अनावर झालाय.

सोन्यामुळं त्याला मिळाली जिवंत समाधी

Last Updated: Tuesday, April 15, 2014, 11:20

सोनं, खजिना, धन याची लालसा माणसाकडून काय करवते याची अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. असाच काहीसा प्रकार घडला पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतातील मुल्तान जिल्हात...

राहुल गांधींची पप्पी घेणारी महिला जिवंत

Last Updated: Saturday, March 1, 2014, 20:34

राहुल गांधी यांची पप्पी घेणारी महिला जिवंत आहे, ज्या महिलेचा जळून मृत्यू झाला, ती महिला दुसरीच होती, असा दावा आसाम पोलिसांनी केला आहे.

मृतदेह जेव्हा जिवंत झाला...

Last Updated: Wednesday, January 22, 2014, 15:48

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे जिवंत व्यक्ती मृत घोषित झाल्याची घटना घडली आहे. नागपुरातल्या हडकेश्वर पोलीस ठाण्याचे कॉन्सटेबल विनोद धरपाळ हे आपल्या पायांच्या शस्त्रक्रियेसाठी नागपुरातल्याच सनफ्लॉवर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांच्यावर ऑपरेशनही पार पाडण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृतीली सुधारणा नाहूी. त्यामुळे सोमवारी त्यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केलं.

बलात्काराला विरोध केला म्हणून विधवेला जिवंत जाळलं

Last Updated: Monday, January 6, 2014, 14:25

बलात्काराला विरोध केला म्हणून एका विधवा महिलेला नराधमानं जिवंत जाळल्याची घटना घडलीय. नांदेडमधल्या कंधारमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय.

मुंबईतील वास्तववादी घटना...अंत्ययात्रेची तयारी अन् मृत रूग्ण जिवंत

Last Updated: Thursday, December 12, 2013, 13:19

आजच्या २१ शतकातील वास्तवादी घटना मुंबईत घडली. अत्यवस्थ असणाऱ्या रुग्णाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तुमच्या सर्व नातेवाईकांना बोलावून घ्या, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार या रूग्णाच्या नातेवाईकांनी अंत्ययात्रेची तयारी सुरू केली. मात्र, हा रूग्ण जिवंत झाला.

बलात्कार करून तरुणीला जिवंत जाळलं

Last Updated: Tuesday, October 29, 2013, 16:37

वर्धा जिल्ह्यातल्या समुद्रपूर तालुक्यात २० वर्षांच्या युवतीवर बलात्कार करुन तिला जिवंत जाळण्यात आल्याची घटना उघडकीस आलीय. २५ ऑक्टोबरला हा दुर्दैवी प्रकार घडला. मुलीच्या वडिलांनी याबाबत काल पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सचिन शेंदूरकरला अटक करण्यात आलीय. मात्र यामध्ये तोही भाजला असल्यानं त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

अवघ्या एका महिन्याच्या चिमुरडीला जिवंत जाळलं!

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 13:09

अवघ्या एका महिन्याच्या तान्हुलीस जिवंत जाळल्याची घटना औरंगाबादजवळच्या वाळूज भागातल्या शिवराई परिसरात घडलीय.

बलात्काराच्या आरोपीला जिवंत जाळलं

Last Updated: Friday, September 6, 2013, 20:15

मध्यप्रदेशच्या कटनी जिल्ह्यातील बडवाराजवळच्या एका गावात बलात्काराच्या एका आरोपीला जिवंत जाळण्यात आलंय. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी जामिनावर सुटलेल्या आरोपीला जाळलंय.

मुंबईत लोकलमध्ये सापडलीत जिवंत काडतूसे

Last Updated: Friday, August 16, 2013, 14:05

जोगेश्वरी यार्डात उभ्या असलेल्या लोकलमध्ये जिवंत काडतुसं मिळाल्याची घटना घ़डलीय. सीटखाली ही काडतुसं मिळाली आहेत. याबाबतचा तपास सुरू आहे. सफाई कर्मचा-यालाही ही काडतुसं मिळाली आहेत.

दोन वर्षं `तो` राहिला हृदयाशिवाय जिवंत!

Last Updated: Sunday, July 28, 2013, 23:57

एका ब्रिटिश व्यक्तीने दोन वर्षं विना हृदयाचं जिवंत राहाण्याचा रेकॉर्ड केला आहे. ही व्यक्ती दोन वर्षं बाह्य रक्तपंपाच्या मदतीने जिवंत राहिली आहे. फार्मा कन्सल्टटंट असणारे मॅथ्यू ग्रीन गेले दोन वर्षं बिन हृदयाचे जिवंत आहे.

मुलीला जन्म दिला आणि मृत महिला झाली जिवंत

Last Updated: Monday, May 27, 2013, 12:56

हृदयाचे ठोके पूर्णपणे थांबले. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या मृत ठरविण्यात आलेल्या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर मृत झालेली ती महिला जिवंत झाली. ही वास्तवातील घटना असून हा निसर्गाचा चमत्कार अमेरिकेत पाहायला मिळाला.

नवीन तंत्रज्ञान : मृत व्यक्ती पुन्हा उठून बसल्या!

Last Updated: Tuesday, May 14, 2013, 12:27

मेलबर्नमध्ये एक चमत्कारच पाहायला मिळालाय. वैज्ञानिकदृष्ट्या मृत घोषित केल्या गेलेल्या एका ३० वर्षीय मृत व्यक्तीला ४० मिनिटानंतर पुन्हा जिवंत करण्यात आलंय.

प्रेयसीला जिवंत गाडलं...

Last Updated: Thursday, March 7, 2013, 15:38

प्रेयसीच्या चारित्र्याबद्दल संशय घेणार्या एका नराधमाने आपल्या प्रेयसीला १० फुटी खड्ड्यात जिवंत गाडून टाकल्याची घटना उत्तर प्रदेशातील सहारणपूर येथे घडली आहे

रेल्वेस्टेशनवर सापडली दोन बेवारस अर्भकं

Last Updated: Sunday, March 3, 2013, 16:04

एका प्लॅस्टिकच्या पिशवीत पुरुष जातीची दोन जिवंत अर्भकं सापडल्यानं एकच खळबळ उडालीय. औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर ही अर्भकं सापडली आहेत.

भावी वधुला जिवंत जाळलं; जवानाचं क्रूर कृत्य

Last Updated: Thursday, February 7, 2013, 12:27

क्षुल्लक कारणावरून भावी नवरदेवानं आपल्या नियोजित वधुला जिवंत जाळल्याची घटना औरंगाबादमध्ये घडलीय. विशेष म्हणजे हा भावी नवरदेव भारतीय सैन्यदलात काम करतो.

अनैतिक संबंधातून विवाहितेला जिवंत जाळलं

Last Updated: Friday, December 28, 2012, 17:51

जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यात अनैतिक संबंधांतून विवाहितेला जाळून मारण्यात आलं आहे. विवाहितेला पेटवल्यानंतर प्रियकरानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

क्षुल्लक कारणावरून तरूणाला जिवंत जाळलं

Last Updated: Wednesday, December 5, 2012, 16:28

नागपुरात क्षुल्लक कारणावरुन एका युवकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. यामध्ये तरुण 80 टक्के भाजलाय. राजेश मोगरे असं या तरुणाचं नावं आहे.

प्रियकराने जिवंत अजगराने प्रेयसीला झोडपून काढलं

Last Updated: Friday, November 9, 2012, 21:35

प्रियकर प्रेयसीमध्ये होणारी भाडणं ही काही नवी गोष्ट नाही... मात्र आपल्या प्रेयसीला एका माथेफिरू प्रियकराने चक्क जिवंत अजगराने झोडपून काढलं आहे.

डॉक्टरला जिवंत जाळलं... आरोपीला अटक

Last Updated: Thursday, October 18, 2012, 11:46

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या लोहगावमध्ये बुधवारी एका डॉक्टरला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनंतर पोलिसांनी नाकाबंदी करत आरोपीला अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगावमध्ये अटक केलीयं.

मातेनं मरण्यासाठी दिलं सोडून, पण...

Last Updated: Sunday, August 12, 2012, 20:37

प्रत्यक्ष जन्मदात्या मातेनं जन्मत:च मरण्यासाठी सोडून दिलेल्या बाळाला जीवदान मिळालंय. पोलिसांनी याप्रकरणी कोथरुडमध्ये राहणाऱ्या लक्ष्मी होनबोले या निर्दयी मातेला अटक केलीय.

कुराणाचा अपमान; व्यक्तिला जिवंत जाळलं

Last Updated: Thursday, July 5, 2012, 11:59

कुराणाचा अपमान केल्याच्या आरोपाखाली एका मानसिक विकृती असलेल्या व्यक्तिला जिवंत जाळण्याची घटना पाकिस्तानातल्या लाहोरमध्ये घडलीय. या कृत्यात एका-दुसरी व्यक्ती सहभागी नव्हती तर पंजाब प्रांतातील हजारो लोकांनी एकत्र येऊन हे कृत्य केलंय. पोलिसांनी या घटनेची माहिती दिलीय.

कसाबची झाली 'बकरी'!

Last Updated: Monday, May 21, 2012, 10:11

२६-११च्या अतिरेकी हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाब याला आता फक्त शाकाहारी जेवण खावं लागतंय.

लादेन संपला तरी दहशतवाद जिवंत

Last Updated: Wednesday, May 2, 2012, 12:31

अमेरिकेकडून केल्या गेलेल्या ओसामा बिन लादेनच्या ऑपरेशनला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. तरीही लादेनचा दहशतवाद संपलेला नाही, तो जिवंत असल्याचे दिसून येत आहे. आजच्या अफगाणिस्तानमधील काबुल धमाक्यानंतर हा दहशतवाद आजही डोकेवर काढीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बीडः उसतोड मजुराला जिवंत जाळले

Last Updated: Monday, January 9, 2012, 14:32

उस तोडीसाठी घेतलेली उचल परत केली नाही म्हणून शेषराव तायडे या उस तोड मजुराला मुकादमाने जीवंत जाळल्याची घटना बीड जिल्ह्यातील सिंदफणा चिंचोळी येथे घडली. या मजूराने वशिष्ठ डाकेकडून उस तोडीला जाण्यासाठी दहा हजार रुपयांची उचल घेतली होती.