Last Updated: Sunday, February 5, 2012, 17:44
मुंबई पश्चिम रेल्वेवरील जम्बो ब्लॉकमुळे मुंबईकरांचे आज चांगलेच हाल झाले. या जम्बो ब्लॉकचा परिणाम बेस्ट वाहतुकीवरही झाला. लोकल बंद असल्याने मुंबईकरांनी दुसरी लाइफलाईन बेस्टचा आधार घेतला. मात्र वाहतुकीचा सारा ताण बेस्ट बसवर आल्याने प्रवाशांची गर्दी पाहायला आज मिळाली.