मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊदचा मृत्यू

Last Updated: Friday, June 13, 2014, 09:52

1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद फणसेचा मृत्यू झालाय. जे. जे. रुग्णालयात मृत्यू झालाय. विशेष टाडा न्यायालयानं त्याला शिक्षा सुनावली होती. मुंबईत आरडीएक्स आणण्याची जबाबदारी दाऊद फणसेकडे होती. न्यायालयात त्यानं गुन्हा कबुल केला होता.

खूर्चीचा किस्सा: जिथे-जिथे जयललिता तिथे त्यांची खूर्ची

Last Updated: Wednesday, June 11, 2014, 15:30

राजकारणात नेत्यांचं आपल्या खूर्चीवर किती प्रेम असतं हे आपल्याला माहितीय. अनेक नेते असे आहेत की जे एकदा खूर्चीवर बसले की उठायचं नाव घेत नाहीत. मात्र आम्ही अशा राजकीय खूर्चीबद्दल सांगतोय, ज्यात थोडा ट्वीस्ट आहे.

मुख्यमंत्रीपदाची खुर्ची... राज ठाकरेंचं दिवास्वप्न!

Last Updated: Saturday, May 31, 2014, 18:32

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून मनसेतर्फे पुढे आणण्याचा मनसे नेत्यांचा विचार आहे.

इमारतीतून पडणाऱ्या चिमुकल्याला अलगद झेलले

Last Updated: Friday, May 23, 2014, 21:20

चीनमध्ये इमारतीवरून पडणाऱ्या एका चिमुकल्याला सतर्क नागरिकांनी हवेतच पकडले. त्यामुळे चिमुकल्याचे प्राण वाचले. चिमुकला अचानक खाली पडत असल्याची ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

40 वर्षांनी लहान तरुणीच्या बाळाचा बाप होणार इमरान?

Last Updated: Thursday, May 8, 2014, 10:21

पाकिस्तानल्या राजकारणातला एक मोठा नेता आणि माजी क्रिकेटर इमरान खान यांच्या कथित नव्या प्रेमसंबंधांमुळे पाक राजकारणात एकच खळबळ उडालीय.

चैत्र नवरात्रीतील ५ दिवसांचे खास योगायोग!

Last Updated: Monday, March 31, 2014, 15:16

आजपासून चैत्र महिन्यातील नवरात्रौत्सवाला उत्सवाला सुरुवात झालीय. यावर्षी चैत्र नवरात्रीचे पहिले पाच दिवस खूपच खास आहेत. घर आणि मंदिरांत देवीच्या उपासनेसाठी विशेष घटाची स्थापना केली गेलीय.

तेलंगणा विधेयकावर राज्यसभेत जोरदार आक्षेप

Last Updated: Thursday, February 20, 2014, 20:46

राज्यसभेत तेलंगणा राज्य निर्मितीचा मुद्दा जोरदार गाजला. विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रचंड गदारोळात तेलंगणा विधेयक गुरुवारी दुपारी राज्यसभेत सादर केले. यावेळी विरोधक खासदारांनी तेलंगणा विधेयकाचा निषेध करत सभागृहात जोरदार गोंधळ केला.

दबावानंतर न्या. गांगुली यांचा अखेर राजीनामा!

Last Updated: Tuesday, January 7, 2014, 09:25

लॉ इंटर्न तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून अडचणीत आलेले न्यायमूर्ती ए.के. गांगुली यांनी पश्चिम बंगाल मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदाचा अखेर राजीनामा दिलाय.

पिंपरीत ‘स्पेशल ४२’ची कामगिरी, ५ सोनसाखळी चोरांना अटक

Last Updated: Wednesday, January 1, 2014, 21:45

पिंपरीत सोनसाखळी चोरांचा धुडगूस सुरू असल्यानं स्थापन करण्यात आलेल्या पोलिसांच्या ‘स्पेशल ४२’ या तपास पथकानं पाच सोनसाखळी चोरांना अटक केलीय. त्यांच्याकडून सोनसाखळी चोरीचे ४२ गुन्हे उघडकीस आले असून, ६० तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

आज मिळणार राज्य महिला आयोगाला अध्यक्ष?

Last Updated: Tuesday, December 31, 2013, 11:14

गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांचा शोध अखेर मंगळवारी संपणार आहे.

हाणामारीनंतर आज परिवहन समितीची निवडणूक

Last Updated: Monday, December 23, 2013, 08:49

आज ठाणे परिवहन समितीच्या सभापतीपदाची निवडणूक होतीये... या निवडणूकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी करण्यात आलीय.

सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ, १७ तासात १४ घटना

Last Updated: Saturday, December 7, 2013, 13:00

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी.... सोनसाखळी चोरांनी पुण्यात अक्षरशः धुमाकूळ घातलाय. पुण्यात फक्त १७ तासांत सोनसाखळी चोरीच्या तब्बल १४ घटना घडल्यायत. या १४ घटनांमध्ये महिलांच्या गळ्यातील तब्बल अर्धा किलो सोन्यावर डल्ला मारण्यात आलाय.

राज ठाकरेंच्या कल्याण दौऱ्यावेळी चोरांची हातसफाई

Last Updated: Monday, November 25, 2013, 10:13

राज ठाकरे यांच्या कल्याण दौऱ्यावेळी चोरांनी हातसफाई दाखवली आहे. या दौऱ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत एका महिलेचे मंगळसूत्र आणि चेन तर काहींचे मोबाइल आणि पाकीट चोरट्यांकडून लांबवण्यात आल्याचे समोर आले आहे.

दादर-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसला जादा तीन कोच

Last Updated: Thursday, November 7, 2013, 18:51

कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक गुड न्यूज आहे. दादर-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस या गाडीला तीन जादा कोच जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना थोडासा दिसाला मिळणार आहे.

सोनसाखळी चोरांची `दिवाळी`!

Last Updated: Tuesday, October 29, 2013, 22:24

पुण्यात सोनसाखळी चोरांची दिवाळी पूर्वीच दिवाळी सुरु झालीय. अवघ्या दीड तासात ७ सोनसाखळ्या हिसकावण्याच्या घटना शहरात आज घडल्या आहेत.

१६ चीनी नागरिकांना घुसखोरी करताना अटक

Last Updated: Thursday, October 17, 2013, 18:48

भारत-चीन सीमा अनधिकृतरित्या ओलांडून भारतात घुसखोरी करण्याऱ्या १६ चीनी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यापैकी बहुसंख्य तिबेटमधील नागरिक आहेत.

‘कायदेतज्ज्ञ’ महापौरांची खुर्ची जप्त होणार?

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 23:10

येत्या २४ ऑक्टोबरला नाशिकच्या महापौरांची खुर्ची जप्त झाली तर बसायचं कुठे? हा प्रश्न नाशिकच्या महापालिकेला पहिल्यांदा सोडवावा लागेल.

नाशिकच्या महापौर, आयुक्तांची खूर्ची जप्त!

Last Updated: Monday, October 14, 2013, 18:59

नाशिकचे महापौर आणि आयुक्तांची खुर्ची जप्त करण्यासाठी न्यायालयीन कर्मचारी महापालिकेत पोहोचलेत. खुर्ची जप्त करण्याची मुदत वाढवण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू झालीय.

श्रीनिवासन यांना निवडणूक लढण्याची परवानगी, पण...

Last Updated: Friday, September 27, 2013, 19:13

एन. श्रीनिवासन यांना बीसीसीआयची निवडणूक तर लढता येईल पण, अध्यक्षपदाची सूत्रं मात्र हाती घेता येणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या एका खंडपीठानं दिलाय.

श्रीनिवासन नरमले, बीसीसीआयची बैठक रद्द

Last Updated: Friday, August 2, 2013, 22:38

अखेर आडमुठ्या एन. श्रीनिवासन यांना मवाळ भूमिका घेण भाग पडल आहे. वाढता विरोध आणि कायदेशीर पेच यांना घाबरून दिल्लीत होणारी बीसीसीआय वर्किंग कमिटीची मीटिंग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

श्रीनिवासन पुन्हा बीसीसीआय अध्यक्ष?

Last Updated: Wednesday, July 31, 2013, 22:25

एन. श्रीनिवासन हे पुन्हा एकदा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलीय. आयपीएल फिक्सिंगप्रकरणी बीसीसीआयचे अध्यक्षपद श्रीनिवासन यांना सोडावे लागले होते.

सोनसाखळी चोरी सीसीटीव्हीत कैद

Last Updated: Wednesday, July 31, 2013, 20:15

नवी मुंबईत सोनसाखळी चोरांचा प्रताप सीसीटीव्हीत कैद झालाय.

मंगळसूत्र चोरीचे नऊ गुन्हे उघड

Last Updated: Wednesday, July 10, 2013, 19:23

औरंगाबादमध्ये मंगळसूत्र चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात सिडको पोलिसांना यश आलंय. त्यात सुमारे पाच लाख रुपये किंमतीचे दागिने जप्त करण्यात आलेत. चोरीप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी मात्र फरार झालेत.

चॅम्पियन्स ट्रॉफी : भारत आणि पाकची टशन!

Last Updated: Saturday, June 15, 2013, 10:02

पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीत आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचची उत्सुकता आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात नेहमीच असते.

नारायण मूर्तींची `इन्फोसिस`मध्ये पुन्हा एन्ट्री

Last Updated: Sunday, June 2, 2013, 07:25

नारायण मुर्तींचे आयटी कंपनी ‘इन्फोसिस’मध्ये पुनरागमन झालंय. कंपनीचे विद्यमान संचालक के. व्ही. कामत यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला असून त्याऐवजी मुर्तींची पुन्हा निवड करण्यात आलीय.

रोमिंग फ्रीचा १० ते १५ दिवसांत निर्णय

Last Updated: Sunday, May 26, 2013, 10:48

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने दहा दिवसाच रोमिंग फ्रीबाबत निर्णय घेण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रव्यापी मुक्त रोमिंगवर विचारविनिमय प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर पुढील १० ते १५ दिवसांत त्याबाबत शिफारसी लागू होतील.

पुण्यातील महिलांनो जरा सावध रहा !

Last Updated: Thursday, March 7, 2013, 12:40

पुणेकरांनो सावधान ! पुण्यामध्ये सोनसाखळी चोरांचा अक्षरश: धुमाकूळ सुरु आहे. महिलांचे सोन्याचे दागिने हिसकावण्याच्या एकाच दिवसात ६ घटना घडल्या आहेत.

`भारत पाकिस्ताननं एकत्र येण्यानंच प्रश्न सुटेल`

Last Updated: Monday, December 10, 2012, 09:46

प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष न्या. मार्कंडेय काटजू यांच्या एका विधानानं पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण केलाय. काटजू यांच्या मते, ९० टक्के भारतीय मूर्ख आहेत, अशा लोकांना अगदी सहजपणे आपल्या बाजूने वळवता येऊ शकतं.

कुंबळे आयसीसीच्या समिती अध्यक्षपदी

Last Updated: Thursday, October 11, 2012, 15:56

भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे यांची आज सर्वसंमत्तीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. यापूर्वी या पदावर वेस्ट इंडिजचे महान खेळाडू क्लाइव्ह लॉईड हे होते.

भुजबळ ‘शॅडो-डेप्युटी सीएम’?

Last Updated: Thursday, October 4, 2012, 16:03

उपमुख्यमंत्रिपदाचा राजिनामा दिलेल्या अजित पवारांच्या अनुपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचं नेतृत्व सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांकडे आलंय.

चीनच्या भिंतीची लांबी किती?

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 18:01

'द ग्रेट वॉल' म्हणून ओळखली जाणारी चीनची भिंत २,२०० वर्षांपूर्वी बनवली गेली असली तरी आजही तिचं रहस्य कायम आहे. आत्तापर्यंत या भिंतीची लांबी ८,८५१.८ किलोमीटर इतकी ही भिंत लांब असल्याचं म्हटलं जात होतं. पण नुकत्याच झालेल्या एका अभ्यासामध्ये ही भिंत त्याच्यापेक्षाही २.४ पट मोठी असल्याचं म्हटलंय.

माहितीच्या खजिन्यासाठी उघडा गुगलची 'झिप'

Last Updated: Tuesday, April 24, 2012, 17:58

आज जर गुगलवर पहाल तर चक्क गुगल झिप चेनने उघडावं लागतंय असं दिसेल. ही अद्भुत कल्पना आज गुगलवर मांडली जात आहे, कारण आज झिप चेनचा शोध लावणाऱ्या गिडिओन संडबॅक यांची जयंती आहे. झिप चेनच्या जनकाला गुगल डुडलने दिलेली ही आगळी वेगळी आदरांजली आहे.

चहा बनणार 'राष्ट्रीय पेय'

Last Updated: Monday, April 23, 2012, 16:49

करोडो भारतीयांना रोज सकाळी उठल्यावर अत्यावश्यक असणारी गोष्ट म्हणजे चहा. असा हा देशभरात उत्साह जागवणारा चहा आता अधिकृतरीत्या भारताचं राष्ट्रीय पेय बनणार आहे.

सोनसाखळी चोराला 'पब्लिक'चा चोप

Last Updated: Saturday, April 7, 2012, 09:22

नालासोपाऱ्यात एका सोनसाखळी चोराला लोकांनी चांगलाच चोप दिला आहे. इथल्या उमराळा गावात गुरूवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

ऑफिसमधील चहा, कॉफी बनवतं आळशी

Last Updated: Friday, March 30, 2012, 16:38

ऑफिसमध्ये वारंवार चहा, कॉफीचा अस्वाद घेणाऱ्यांनी आपली सवय सोडण्याचा पुन्हा विचार करणं आवश्यक आहे. लाइव्हसायंसमधील वृत्तानुसार एका नव्या संशोधनातून असं सिद्ध झालं आहे, की चहा, कॉफी किंवा इतर पेयांमधील कॅफिन मेहनती लोकांना आळशी बनवतं.

सलमान-जॅकी चॅन हॉलिवूड सिनेमात एकत्र

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 16:35

बॉलिवूडचा दबंग आता झळकणार आहे हॉलिवूड अॅक्शन स्टार जॅकी चॅनबरोबर. सलमान खान आणि जॅकी चॅन ही स्वप्नवत वाटणारी स्टारकास्ट चक्क एका बॉलिवूड सिनेमासाठी एकत्र येते आहे

झेडपीत नवी समीकरणं उदयास

Last Updated: Wednesday, March 21, 2012, 20:31

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी नवी राजकीय समीकरणे उदयाला आलीत. काँग्रेसला ठिकठीकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं दणका दिलाय.यवतमाळमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं दणका दिलाय.

'सेहवाग का नाही'?... अन् श्रीकांत चिडले?

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 17:08

एशिया कपसाठी आज टीम इंडिया जाहीर करण्यात आली. वीरेंद्र सेहवाग, जहीर खान आणि उमेश यादव यांना विश्रांतीच्या नावाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब कामगिरी करणाऱ्या सेहवागच्या जागी विराट कोहलीला उपकर्णधार पद बहाल करण्यात आले आहे.

नवलेंचा खोटारडेपणा

Last Updated: Thursday, February 23, 2012, 12:02

पुण्यातल्या ‘सिंहगड इन्स्टिट्युट'च्या नवलेंचा आणखी एक प्रताप केला आहे. नवलेंनी आता पवन गांधी ट्रस्टच्या चैनसुख गांधींविरोधातच याचिका दाखल केली आहे. चैनसुख गांधींनीच एका शेतकऱ्याची जमीन हडपल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

घ्या हृतिकची भेट आणि सोडा सिगारेट

Last Updated: Friday, February 10, 2012, 13:37

संजय दत्तने सिगारेट ओढणं बंद करावं यासाठी हृतिक प्रयत्न करतोय. तसंच हृतिकने चेन-स्मोकर असणाऱ्या शाहरुख खान, फरहान आख्तरनेही सिगारेट सोडावी यासाठी हृतिक मनापासून प्रयत्न करत आहे.

निवडणुकीच्या रिंगणात चहावाला

Last Updated: Wednesday, February 8, 2012, 10:07

निवडणूक लढवायची असल्यास मोठ्या प्रमाणात पैसा आणि मनुष्यबळ लागते. त्याचसोबत ‘गॉडफादर’चा आशिर्वादही महत्वाचा असतो. नाशिकमध्ये मात्र चहाचा टपरीवाला निवडणुकीच्या रंगणात उतरला आहे.

मराठी माध्यमांच्या शाळांसाठी मानवी साखळी

Last Updated: Friday, January 27, 2012, 00:02

मराठी माध्यमांच्या शाळांच्या स्वातंत्र्याचे रक्षण सरकारने करावे यासाठी नाशिकमध्ये मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. यांत विद्यार्थी, पालक आणि संस्थाचालक सहभागी झाले होते.

चीनमध्ये भारतीय अधिकाऱ्यांला धक्काबुकी

Last Updated: Tuesday, January 3, 2012, 19:33

चीनमध्ये भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याला व्यापाऱ्याला धक्काबुक्की करण्यात आली आहे, भारताने आपली तीव्र नाराजी याबाबत चीनकडे दर्शवली आहे, त्यामुळे चीन सरकार आता यावर काय कारवाई करणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.