पाकिस्तानी महिलेनं भारतात दिला बाळाला जन्म, अन्...

Last Updated: Wednesday, April 30, 2014, 22:58

पाकिस्तानी नागरिक असलेल्या एका महिलेनं तिच्या मुलाला भारताच्या भूमिवर जन्म दिला. पण, पाकिस्ताननं मात्र कागदपत्रांची मागणी करत या नवजात बालकाला पाकिस्तानात येण्यास बंदी घातलीय. यामुळे या महिलेवर मोठं संकटच कोसळलं.

पाकिस्तानातील नऊ महिन्याच्या मुसाची हत्येच्या आरोपातून मुक्तता

Last Updated: Sunday, April 13, 2014, 18:34

पाकिस्तानमध्ये मुसा खान या नऊ महिन्याच्या बालकालाही हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

महिलेनं दिला कासवाला जन्म

Last Updated: Sunday, March 9, 2014, 16:04

छत्तीसगडमध्ये एक आगळीवेगळीचं घटना घडलीय... छत्तीसगडमधील केशकाळ भागात एका विचित्र बालकाचा जन्म झालाय. या बालकाच्या शरीराची रचना इतर बालकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे त्याला बघण्यासाठी हॉस्पीटलमध्ये प्रचंड गर्दी झालीय.

...त्यांनी आपलं बाळ बॅगेत भरून टाकलं रेल्वेत

Last Updated: Wednesday, January 29, 2014, 10:17

मुंबईच्या लोकलमध्ये एक बेवारस पडलेली बॅग एका नेलपॉलिश विक्रेत्यानं एक बॅग पळवली. पण बॅग उघडल्यावर मात्र त्याची बोबडीच वळली आणि त्यानं पळ काढला... का काढला त्यानं पळ? असं काय होतं त्या बॅगेत.... एखाद्या सिनेमात शोभेल असा हा प्रकार प्रत्यक्षात घडलाय... आणि अखेर एका निरागस जिवाला जीवदान मिळालं..

कोण खोटं बोलतंय? बालक की बालकल्याण मंत्री ?

Last Updated: Monday, January 6, 2014, 15:56

दिल्लीत सत्ता हातात आल्यानंतर आपचे आमदार आणि मंत्री नको ते पराक्रम करत असल्याचं दिसून येत आहे. दिल्ली सरकारमध्ये सर्वात कमी वयात मंत्रीपद मिळालेल्या महिला आणि बालकल्याण मंत्री राखी बिर्ला यांच्यावर खोटारडेपणाचा आरोप होत आहे.

संतांच्या माहेरघरातून दोन मुलींचं अपहरण!

Last Updated: Thursday, November 28, 2013, 00:06

पंढरपूरमधील नवरंगे बालकाश्रमातून नऊ आणि बारा वर्षांच्या दोन मुली गायब असल्याचं उघड झालंय.

पुण्यात प्रतिबंधक लस दिल्यानंतर बालकाचा मृत्यू

Last Updated: Wednesday, October 16, 2013, 14:46

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भांबार्डे येथे बालकांना प्रतिबंधक लस दिल्यानंतर एका बालकाचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिरूर पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

वर्धा जिल्ह्यात डेंग्यूची साथ,५२ जणांना लागण!

Last Updated: Wednesday, September 11, 2013, 13:07

ऐन सणात वर्ध्यात डेंग्यूच्या साथीनं डोकं वर काढलंय. जिल्ह्यात तापानं दोन मुलांचा बळी घेतला तर आतापर्यंत २६१ जणांच्या केलेल्या रक्त तपासणीत ५४ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचं उघड झालंय. यातील सात रुग्ण जे जिल्ह्याबाहेरील असल्याची महिती आहे.

चुकीचं इंजेक्शन दिल्याने दोन बालकांचा मृत्यू

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 16:05

यवतमाळमध्ये एका डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे दोन बालकं दगावलीयत. चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे कुंदन राठोड, प्रथमेश बीबेकर या दोन बालकांना आपला जीव गमवावा लागलाय.

ग्रामीण भागात घटली बालकांची संख्या!

Last Updated: Wednesday, August 28, 2013, 11:13

नुकत्याच झालेल्या जनगणनेत काही धक्कादायक आकडेवारी समोर येतेय. या आकडेवारीनुसार राज्यात गेल्या दहा वर्षांत राज्यातील शून्य ते सहा वयोगटातील बालकांची संख्या तब्बल ३ लाख ४५ हजारांनी घटली आहे.

ठाण्यात कुपोषणाने १४० बालकांचा मृत्यू

Last Updated: Friday, August 2, 2013, 14:32

ठाणे जिल्ह्यात कुपोषणाचं धगधगतं वास्तव उघड झालंय. यंदाच्या वर्षी ठाणे जिल्ह्यात तब्बल १४० बालकांचा मृत्यू झालाय. तर १० हजाराच्या वर बालकं कुपोषणग्रस्त आहेत.

जियाच्या मृत्यूनंतर `त्या`नंही केली आत्महत्या!

Last Updated: Wednesday, June 5, 2013, 13:35

जिया खान हिच्या आत्महत्येच्या वृत्तानं अनेकांना धक्का बसला. हाच धक्का एका लहानग्यालाही पडला... हा धक्का इतका तीव्र होता की जियाच्या या लहानग्या ‘फॅन’नंदेखील जियाप्रमाणेच गळफास लावून आत्महत्या केलीय.

फेसबुकवर ८ लाखांत विकला गेला नवजात बालक

Last Updated: Wednesday, April 24, 2013, 18:53

सोशल नेटवर्किंग साइटचा दुरपयोग असाही होऊ शकतो असे कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल. लुधियाणाच्या एका नवजात बालकाला सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकद्वारे विकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

उल्हासनदीत तीन बालकांचा बुडून मृत्यू

Last Updated: Monday, April 15, 2013, 07:25

कल्याणमधील उल्हासनदीत तीन बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मांजर्ली गावात ही घडली.

बालकाला चार दिवस गोठवल्यानंतर चमत्कार...

Last Updated: Tuesday, February 19, 2013, 16:29

डॉक्टरांनी कमाल केली. बालकालाच चार दिवस गोठवून ठेवले. त्यानंतर चमत्कार झाला. हृदयविकारग्रस्त बालकाचे शरीर तब्बल चार दिवस गोठवून ठेवून त्याचा जीव वाचविण्यात यश मिळविले आहे.

चार दिवस गोठवले, पण चिमुरड्याला वाचवले

Last Updated: Friday, February 15, 2013, 11:32

हृदयविकारग्रस्त चिमुरड्याचे शरीर तब्बल ४ दिवस गोठवून ठेवून त्याचा जीव वाचविण्याची करामत लंडन येथील डॉक्टरांच्या अनोख्या तंत्रामुळे शक्य झाली आहे.

सचिनसाठी `बालक-पालक`चं स्पेशल स्क्रिनिंग

Last Updated: Saturday, January 26, 2013, 12:20

रितेश देशमुख निर्मित ‘बालक-पालक’ सिनेमानं अनेकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. सचिन तेंडूलकरही त्याला अपवाद ठरलेला नाही. नुकतंच, मुंबईमध्ये खास सचिनसाठी या सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं.

सिनेमाच्या तिकिटासाठी हत्या!

Last Updated: Monday, January 14, 2013, 20:27

सिनेमाच्या तिकीट रांगेवरून झालेल्या वादात अजय खामकर या तरुणाची हत्या झालीय. मुंबईतल्या भारतमाता थिएटरबाहेर हा प्रकार घडलाय. हल्लेखोर अशोक चव्हाण याला पोलिसांनी अटक केलीय. बालक पालक हा सिनेमाच्या रांगोत उभं असताना त्यांच्यात वाद झाला होता

शुटींग दरम्यान अपघात, ६ वर्षाचा बालकाचा मृत्यू

Last Updated: Saturday, October 27, 2012, 16:37

हैदराबाद येथे मालिकेच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्याचा कारवरील ताबा सुटल्याने एक सहा वर्षीय मुलाचा कारखाली चिरडून मृत्यू झाला आहे.

कुपोषणाची मुंबईत धडक; चिमुकलीनं गमावले डोळे

Last Updated: Thursday, October 25, 2012, 19:56

कुपोषणाचं संकट मुंबईच्या दाराशी येऊन ठेपलंय. मुंबईत कुपोषणामुळे एका लहानग्या मुलीला अंधत्व आलंय. नंदिनी मायकल नाडर असं या मुलीचं नाव आहे. साडेचार वर्षाच्या नंदिनीचं वजन आहे फक्त नऊ किलो...

जेनेलिया मराठी सिनेमांच्या प्रेमात

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 14:09

‘बालक पालक’ या सिनेमाद्वारे रितेश देशमुख मराठी सिनेमाच्या निर्मितीमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमामुळे मराठी सिनेमा आणखी एक पाऊल पुढे टाकेल, अशी अभिनेत्री जेनेलिया डिसुझा हिला आशा आहे.

सिव्हिल हॉस्पिटल की मृत्यूचं दार?

Last Updated: Sunday, August 19, 2012, 12:33

ठाण्यातलं सिव्हील हॉस्पीटल नवजात बालकांसाठी मृत्यूचे दार ठरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. गेल्या सात महिन्यांत या हॉस्पीटलमध्ये तब्बल 78 बालकांचा मृत्यू झालाय.

कॅम्बोडियात अज्ञात आजारानं घेतले 61 बळी

Last Updated: Thursday, July 5, 2012, 15:28

इंडो-चायनाच्या पश्चिम भागातील कॅम्बोडिया या देशात एका अज्ञात आजारानं एकच खळबळ उडालीय. या अज्ञात आजारामुळे आत्तापर्यंत 61 मुलांना आपला जीव गमवावा लागलाय, अशी माहिती जागतिक आरोग्य विभागानं (WHO) नं दिलीय.

कहाणी एका चिमुरड्याची... ‘झी २४ तास’च्या यशाची

Last Updated: Thursday, June 14, 2012, 15:22

‘झी २४ तास’च्या पत्रकारितेचंच हे यश होतं. रामबाबू आणि त्याच्या पाल्यासाठी हा परमोच्च आनंदाचा क्षण होताच पण एकमेकांपासून दुरावलेल्या माय-लेकरांच्या भेटीचा क्षण पाहून झी २४ तासचं अवघं न्यूजरूमही भरभरून पावलं.

बालकामगारांचं शोषण; अन् मुजोर प्रशासन

Last Updated: Tuesday, June 12, 2012, 12:34

पावसाळा तोंडावर आला असल्याने कल्याण डोंबिवलीतील शहरातील नालेसफाईची आणि गटार सफाईची कामे सुरु असून या कामासाठी ठेकेदाराने चक्क बालकामगारांना कामाला लावल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे. ‘झी 24 तास’नंही कल्याणच्या सहाय्यक कामगार आयुक्तांना याबाबत विचारणा केली असता अतिशय बेजबाबदार उत्तरं मिळाली.

बिबट्याने घेतला बालकाचा बळी

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 17:23

नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात बिबट्यानं एका वर्षाच्या मुलाला भक्ष्य बनवलं. निफाड तालुक्यातल्या जुने शिवरे शिवारात ही घटना घडली आहे. दुर्गेश गोसावी असं मरण पावलेल्या बालकाचं नाव आहे.

बालकल्याण संकुलात रंगली नैसर्गिक रंगात होळी

Last Updated: Thursday, March 8, 2012, 08:19

होळी खेळताना रासायनिक रंगाचा वाढता वापर आणि त्याचे त्वचेवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन कोल्हापुरातल्या ‘बालकल्याण संकुला’तल्या मुलांनी नैसर्गिक रंगांची होळी खेळली.

बालकाची ३६ तासानंतर मृत्युशी झुंज व्यर्थच.....

Last Updated: Friday, March 2, 2012, 10:51

उमरगा तालुक्यातल्या कोथळी गावात बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला बाहेर काढण्यात तब्बल ३६ तासांनतर यश मिळालं आहे. मात्र या मुलाचा जीव वाचू शकला नाही.

बालकांची विक्री करणारी टोळी गजाआड

Last Updated: Friday, February 24, 2012, 22:16

उल्हासनगरमध्ये नवजात मुलांची विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तीन महिलांसह चौघांना अटक करण्यात आली आहे. नवजात मुलांची विक्री करणारी मोठी टोळी सक्रिय असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

धुरीमुळे बाळाचा आणि आजीचा मृत्यू

Last Updated: Thursday, December 15, 2011, 15:44

लहानग्या बाळाला धुरी देत असताना गुदमरुम बाळाचा आणि आजीचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना सातारा शहरात घडलीय. सदर बाजार परिसरात अनिल लाड यांच्या बंगल्यात हा सर्व प्रकार घडलाय.