बॉलिवूड कलाकारांनी वाहिली मुंडेंना ट्विटरवरून श्रद्धांजली

Last Updated: Tuesday, June 3, 2014, 16:17

केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडेंचं आज सकाळी कार अपघातानंतर निधन झालं. मुंडेंच्या जाण्यानं महाराष्ट्राला खूप मोठा धक्का बसलाय. बॉलिवूडमधूनही मुंडेंना श्रद्धांजली वाहण्यात येतेय. अनेक कलाकारांनी ट्विट करून मुंडेंना आदरांजली वाहिली.

अशी असेल मोदींची `बॉलिवूड कॅबिनेट`!

Last Updated: Friday, May 16, 2014, 10:18

आज 16व्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होतेय. एक्झिट पोलच्या निकालांनंतर नरेंद्र मोदींचं सरकार येणार, असंच बोललं जातंय. नरेंद्र मोदींना जर पंतप्रधान बनल्यानंतर बॉलिवूडमधून आपले नेते निवडायचे असतील तर ते कोणाला निवडतील?

किंग खान शाहरुख करणवीर पुढं झुकला

Last Updated: Tuesday, April 29, 2014, 08:49

बॉलिवूडचा बादशहा जितका फटकळ स्वभावाचा समजला जातो तेवढाच तो दिलदार सुद्धा आहे, हे नुकतंच एका प्रकरणावरून पुढं आलंय. किंग खाननं चक्क करणवीर व्होराची क्षमा मागितलीय.

सुशीलकुमारांचं `दादां`वर वक्तव्य, कलाकारांकडून निषेध

Last Updated: Tuesday, April 15, 2014, 12:16

"नरेंद्र मोदी दादा कोंडके यांच्यापेक्षा थापाडे आहेत" या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर कलाकार, तंत्रज्ञ यांनी वैयक्तिक पातळीवर निषेध नोंदवण्यात येतोय.

सेलिब्रेटी सर्व्हिस टॅक्स भरणारे आणि बुडवणारे

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 15:59

२०१०पासून लागू झालेला सर्व्हिस टॅक्स अनेक बॉलिवूड कलाकार आणि मोठ्या उद्योगपतींनी थकवलाय. सर्व्हिस टॅक्ससाठी एकूण १८ लाख लोकांनी नोंदणी केलीय. मात्र त्यातले फक्त सात लाख लोकं नियमित सर्व्हीस टॅक्स भरतात. गेल्यावर्षी मुंबईतून ४६ हजार कोटी सर्व्हिस टॅक्स भरला गेला.

पाकिस्तानी कलाकारांना विरोधाचा मुद्दा आमचा - मनसे

Last Updated: Tuesday, February 4, 2014, 18:55

पाकिस्तानी कलाकारांना विरोध करण्याचा मुद्दा हा मनसेचा आहे, असा दावा अमेय खोपकर यांनी केला आहे. अमेय खोपकर हे मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष आहेत.

गाडी घेताय, १ नंबर हवाय? तर काढा चार लाख रूपये!

Last Updated: Tuesday, December 10, 2013, 23:25

‘कार परवडली, पण नंबर प्लेट नको...’ अशी सध्या अवस्था झालीय. म्हणजे सामान्य माणसाला झेन, आयटेन, मारूती किंवा इको यासारख्या मोटारगाड्या जेवढ्या किंमतीला पडतात, जवळपास तेव्हढीच किंमत आता १ नंबर प्लेटसाठी मोजावी लागतेय. आवडीच्या नंबरसाठी चार-चार लाख रूपये मोजणारे हौशी कलाकार ठाण्यात आहेत.

अदनान सामी आत्ताच भारत सोडून जाणार नाही!

Last Updated: Thursday, October 17, 2013, 16:48

गृह मंत्रालयानं पाकिस्तानी गायक-संगीतकार अदनान सामीच्या भारतीय व्हिजाचा कालावधी वाढवून दिलाय. अदनानला आता आणखी तीन महिने भारतात राहण्याची परवानगी दिली गेलीय.

कोलंबियाच्या रस्त्यांवर रंगीबेरंगी खड्डे

Last Updated: Saturday, September 21, 2013, 10:15

भारताप्रमाणेच रस्त्यांवरील खड्डयांची समस्या कोलंबियातील नागरिकांनाही सतावत आहे. मात्र या खड्ड्यांवरून खळ्ळफट्याक करण्या ऐवजी कोलंबियात नागरिकांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं या खड्ड्यांविरोधात आंदोलन केलं आहे

सेनेचं टार्गेट पुन्हा एकदा `पाक कलाकार`

Last Updated: Thursday, August 8, 2013, 14:35

आता शिवसेनेचा मोर्चा पुन्हा एकदा पाकिस्तान कलाकारांकडे वळला आहे. ‘पाक कलाकारांना घ्याल तर याद राखा’ असा इशारा शिवसेनेच्या चित्रपट सेनेनं दिलाय.

टीव्ही अभिनेत्रीनं चार जणांना उडवलं

Last Updated: Friday, August 2, 2013, 16:07

बॉलिवूड कलाकारांच्या पावलावर पाऊल ठेवत टीव्ही कलाकारही दबंगगिरीत पुढं सरसावतायेत. कुठं हाणामारी तर कुठं कलाकारांची दादागिरी सुरू असतेच. मात्र यावेळी झालाय अपघात.

हॅपी बर्थडे सुलोचनादिदी!

Last Updated: Tuesday, July 30, 2013, 09:35

रसिकांच्या ह्रदयात आदराचं स्थान मिळवणारे मोजके ज्येष्ठ कलावंत आहेत. त्यात अभिनेत्री सुलोचनादीदी आहेत. आपल्या जिवंत अभिनयानं त्यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. दीदींचा आज ८५ वा वाढदिवस आहे.

सतीश तारे यांना द्या श्रद्धांजली

Last Updated: Wednesday, July 3, 2013, 14:54

आपल्या कसदार अभिनयाने रसिकांचे मनोरंजन करणारे विनोदी अभिनेते सतीश तारे यांचे आज अंधेरी येथील सुजय हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना आपली श्रद्धांजली द्या.

वीना मलिक झाली जास्तच एक्सपोज

Last Updated: Tuesday, May 28, 2013, 14:55

पाकिस्तानी अभिनेत्री वीना मलिक नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहिली आहे. आता तिने प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी नवा फंडा अबलंबिला आहे. तिने आगामी सिनेमात जास्तच एक्सपोज केलं आहे.

रंगसंगती... कलेशी आपुलकी असणारे कलाकार

Last Updated: Thursday, May 23, 2013, 10:59

रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या आणि कलेशी आपुलकी असलेल्या सर्व तरुणांना संघटीत करून कीर्ती महाविद्यालयाच्या आजी - माजी विद्यार्थ्यांनी `रंगसंगती’ कलामंच या संस्थेची स्थापना केली आहे.

कलाकार भीतीपोटी मनसे-सेनेत प्रवेश करतायेत- नितेश

Last Updated: Thursday, April 25, 2013, 12:52

शिवसेना आणि मनसेच्या स्टार वॉरवर स्वाभिमानी संघटनेच्या नितेश राणे यांनी टीका केलीय. कलाकार केवळ भीतीपोटी मनसे आणि शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

मराठी कलाकार मनसेत, `राजा`श्रयाला

Last Updated: Wednesday, April 24, 2013, 15:00

मनसे आणि शिवसेना यांच्यात आता पुन्हा एकदा जुंपली आहे. पण यावेळेस या दोन्ही पक्षामध्ये मराठी कलाकारांवरून जुपंल्याचे दिसून येते.

कलाकार की नक्षलवादी?

Last Updated: Tuesday, April 2, 2013, 17:54

कबीर कलामंचाचे शितल साठे आणि सचिन माळी या कलाकारांनी आज विधानभवन परिसरात आत्मसमर्पण केलं. या दोघांवरही नक्षलवादी असल्याचा आरोप होता. नक्षलवाद्यांना मदत केल्याच्या आरोपांवरून पोलीस त्यांच्या मागावर होते.

मराठी कलाकारांनी हरवले भोजपुरी दबंगाना

Last Updated: Monday, February 25, 2013, 16:18

सिद्धांत मुळ्येच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर वीर मराठीने रांचीच्या जेएससीए स्टेडियममध्ये खेळविण्यात आलेल्या संघर्षपूर्ण सामन्यात भोजपुरी दबंगला दोन विकेटने पराभूत केले.

सेलिब्रिटींचा `सायबर` डोस!

Last Updated: Wednesday, February 6, 2013, 08:31

बॉलिवूडचे कलाकार सायबर क्राईमविषयी नागरिकांना जागरुक करताना दिसणार आहेत. नागरिकांना विशेषत: लहान मुलांना सायबर क्राईमपासून संरक्षण देण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक मिनिटाची फिल्म बनवलीय.

पाक कलाकारांचे स्वागत नको - आशा भोसले

Last Updated: Monday, January 21, 2013, 10:48

आगामी काळात पाकिस्तानी कलाकारांचे भारतात स्वागत करता येणार नाही अशी भूमिका ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी घेतलीय. दोन भारतीय जवानांची पाकिस्तानी सैन्याने निघृण हत्या केल्याने संतापलेल्या आशाताईंनी ही भूमिका घेतलीय.

हास्यकलाकार जसपाल भट्टी कार अपघातात ठार

Last Updated: Thursday, October 25, 2012, 10:30

प्रसिद्ध हास्यकलाकार जसपाल भट्टी यांचं निधन झालय. आज पहाटे तीनच्या सुमारास जालंदरजवळील शहाकोटमध्ये त्यांच्या कारला अपघात झाला त्यात त्यांचा मृत्यू झाला.

पाक कलाकारांना का गोंजारायचं?- राज

Last Updated: Sunday, September 2, 2012, 14:20

ज्यावेळी पाकिस्तानी कलाकारांना परत जावं लागेल, तेव्हा त्यांना लाज वाटेल. दुसऱ्या देशात अशी वागणूक मिळाल्यावर ते आपल्या सरकारवर दबाव आणतील, की दहशतवाद थांबवा, कारण त्यामुळे दुसऱ्या देशांत आमची लाज जाते. त्यावेळी पाकिस्तानी सरकार दहशतवाद थांबवेल.

मनसे नंतर सेनेचाही, आशाताईंना विरोध

Last Updated: Friday, August 31, 2012, 13:51

पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असलेल्या सूरक्षेत्र या कार्यक्रमाला मनसेनंतर आता शिवसेनेनंही विरोध केला आहे.

लैला मै लैला

Last Updated: Friday, July 6, 2012, 21:43

लैला खान पाकिस्तानी नव्हे, भारतीयच!

Last Updated: Thursday, July 5, 2012, 14:48

लैलाचा जन्म मुंबईच्या गोळीबार भागात झाला. लैलाचे पहिले वडील नादिर पटेल त्यांची पहिली पत्नी सरिनासह गोळीबार भागात राहत होते. झी 24 तासच्या हाती जी रेशन कार्डची प्रत लागलीय तिच्यात लैलाचं खरं नाव रेश्मा असं नमूद केलंय.

कलाकारांनो हे वागणं बरं नव्हं- अजितदादा

Last Updated: Monday, April 30, 2012, 23:44

४९ व्या राज्य चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याला अनुपस्थित राहिलेल्या कलाकारावंर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे वागणं बरं नव्हं, अशा शब्दात अजित पावरांनी या कलाकारांना फटकारलं आहे.

काय सांगावी व्यथा कलाकारांची ..

Last Updated: Sunday, April 8, 2012, 18:38

मराठी चित्रपटसृष्टीत एकेकाळी फाईटमास्टर म्हणून प्रसिद्धी मिळवलेले कोल्हापुरचे अशोक पैलवान सध्या अंथरुणाशी खिळून आहेत. चित्रपटात काम मिळत नाही, म्हणून प्रसंगी रिक्षाव्यवसायही केला. मात्र, अपघातामुळे आलेल्या अपंगत्वामुळे त्यांच्यावर गंभीर संकट ओढवलं आहे.

मराठी कलाकारांनी केले गुढीपाडव्याचं स्वागत

Last Updated: Friday, March 23, 2012, 10:44

मराठी कलाकारांनीही नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच गुढीपाडव्याचं स्वागत केलं. कलाकारांच्या चिरायू या कार्यक्रमाला इंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

सेना प्रमुखांचे रौद्र 'वीणा' वादन

Last Updated: Tuesday, December 20, 2011, 11:52

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वीणा मलिक तसेच सर्व पाकिस्तानी कलाकारांना पाकिस्तानात परत पाठवून देण्याची मागणी केली आहे. शिवसेना प्रमुखांनी पक्षाचे मुखपत्र सामना मधून वीणा मलिकचे वाभाडे काढले आहेत. देशाच्या संस्कृतीवर वीणा मलिक कलंक असल्याचं सेना प्रमुखांनी म्हटलं आहे.

गोव्यात सॅण्ड आर्ट फेस्टीव्हलची झिंग...

Last Updated: Sunday, December 18, 2011, 04:50

गोव्यातल्या मीरामार समुद्र किनाऱ्यावर सॅण्ड आर्ट फेस्टीव्हल भरवण्यात आला आहे. देशातल्या पर्यटकांबरोबरच विदेशातले पर्यंटकांनीही इथं तयार करण्यात आलेली वाळू शिल्पे पाहण्यासाठी गर्दी केली आहे.