सुवर्ण मंदिरात झालेल्या हाणामारीत 6 जखमी

Last Updated: Friday, June 6, 2014, 20:45

अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात झालेल्या हाणामारीत सहा जण जखमी झाले आहेत.

मनसे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, एक जखमी

Last Updated: Thursday, April 17, 2014, 19:54

शहरातील मोनिका हॉलमध्ये झालेल्या वकिलांच्या बैठकीत मनसे कार्यकर्त्यांत हाणामारी झाली असून, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकाराने मनसेतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

औरंगाबादेत काँग्रेस पक्ष निरीक्षकांसमोर हाणामारी

Last Updated: Saturday, February 22, 2014, 16:12

औरंगाबादेत काँग्रेसच्या बैठकीत गोंधळ पहायला मिळाला. काँग्रेसच्या दोन गटांत उमेदवार निवडीवरुन हाणामारी झाली.

शिवसेना- नीतेश राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

Last Updated: Thursday, February 20, 2014, 19:05

शिवसेना कार्यकर्ते आणि नीतेश राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वरळीत तुंबळ हाणामारी झाली. कामगार संघटनांवरून हा राडा झाला. यावेळी पोलिसांचा लाठीचार्ज केला.

विवाहितेची आत्महत्या; नातेवाईकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी

Last Updated: Sunday, January 5, 2014, 11:06

विवाहितेच्या मृत्यूनंतर कोल्हापुरात तिच्या सासरच्या आणि माहेरच्या नातेवाईकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली.

हाणामारीनंतर आज परिवहन समितीची निवडणूक

Last Updated: Monday, December 23, 2013, 08:49

आज ठाणे परिवहन समितीच्या सभापतीपदाची निवडणूक होतीये... या निवडणूकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी करण्यात आलीय.

नाशिक जेलमध्ये कैद्यांची हाणामारी, एकाचा मृत्यू

Last Updated: Wednesday, October 16, 2013, 15:51

नाशिकमधील सेंट्रल जेलमध्ये दोघा कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ही हाणामारी एका कैद्याच्या जीवावर बेतली. हाणामारीत एका कैद्याचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या जखमी कैद्याला रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

हाणामारी करणाऱ्या शिवसेना नगरसेवकांकडून जनतेची माफी

Last Updated: Wednesday, September 25, 2013, 09:53

कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्ताधारी शिवसेना नगसेवकांमध्ये फ्रिस्टाईल झाली. महासभेच्या सभागृहातच हाणामारी झाल्याने संताप व्यक्त होत आहे. या हाणामारीच्यावेळी सभागृहात तणाव पाहायला मिळाला. दरम्यान, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मल्लेश शेट्टी आणि रवींद्र पाटील यांचे राजीनामे घेतले. त्यानंतर या दोघांनी जनतेची माफी मागितली.

कल्याण-डोंबिवली पालिकेत सेना नगसेवकांमध्ये फ्रिस्टाईल

Last Updated: Saturday, September 21, 2013, 07:46

कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्ताधारी शिवसेना नगसेवकांमध्ये फ्रिस्टाईल झाली. महासभेच्या सभागृहातच हाणामारी झाल्याने संताप व्यक्त होत आहे. या हाणामारीच्यावेळी सभागृहात तणाव पाहायला मिळाला. दरम्यान, सभागृहात नगरसेवकांमध्ये हाणामारीचा प्रकार समजताच पालिकेबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मनसे-राष्ट्रवादीच्या कार्येकर्त्यांत `तुंबळ` हाणामारी!

Last Updated: Saturday, August 24, 2013, 22:24

ठाण्यात शनिवारी मनसे आणि राष्टवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपसांत भिडले... निमित्त होतं आपल्या नेत्यांचा मान ठेवणं...

धुळ्यात बँकेच्या सभेत हाणामारी

Last Updated: Monday, August 5, 2013, 18:25

धुळ्यामध्ये जी.एस. कॉर्पोरेटिव्ह बॅँकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ झाला. जिल्हा सरकारी नोकरांसाठी असलेल्या या बॅँकेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

नवी मुंबई पालिकेत नगरसेवकांत `फ्री स्टाईल`

Last Updated: Thursday, July 18, 2013, 09:38

नवी मुंबई महापालिकेच्या सभागृहात मंगळवारी राडा झाला. अपक्ष नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे समर्थक एम. के. मढवी आणि काँग्रेस नगरसेवक संतोष शेट्टी यांच्यात जोरदार हाणामारी झाली. यावेळी तुफान शिवीगाळही करण्यात आली. त्यामुळे महासभाच बरखास्त करण्यात आली.

भाविकांना `वाचविण्यासाठी` नेत्यांनी केली हाणामारी!

Last Updated: Thursday, June 27, 2013, 13:44

आंध्र प्रदेशमधील काँग्रेसचे खासदार हणुमंतराव आणि तेलुगु देसम पार्टीचे (टीडीपी) खासदार रमेश राठोड हे विमानतळावरच एकमेकांना भिडले. अडकलेल्या भाविकांना परत कोण घेऊन जाणार? यावरून दोघांमध्ये वाद झाला.

नाशिकमध्ये गँगवॉर!

Last Updated: Tuesday, June 11, 2013, 19:15

नाशिकमध्ये टोळक्यांचा धुडगूस गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. दहा पंधरा जणांच्या टोळक्यानं मारहाण करण्याच्या आणि त्या मारहाणीत खून झाल्याच्या घटना ताज्या असतानाच नाशकात आता गँगवॉरला सुरुवात झालीय.

साताऱ्य़ात पोलिसाने पोलिसालाच हॉकी स्टिकने बडवलं!

Last Updated: Wednesday, May 22, 2013, 21:17

सातारा पोलीस मुख्यालयात वरिष्ठ लिपीक म्हणून काम करणा-या पोलिस कॉन्स्टेबल अविनाश भोकरे या कर्मचा-यास पोलीस अधीक्षक के. एम. प्रसन्ना यांनी हॉकी स्टिकनं मारहाण केलीय.

पोलिसांची एकमेकांमध्ये जुंपली... तुफान हाणामारी

Last Updated: Wednesday, May 22, 2013, 16:01

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी दोन पोलिस आपापसात भिडल्याची खळबळजनक दृश्य थेट कॅमेऱ्यावर चित्रित झाली आहेत.

सांगली ग्रामसभेत काठ्या-तलवारींनी हाणामारी

Last Updated: Monday, March 4, 2013, 18:43

सांगली जिल्ह्यातील बनेवाडीच्या ग्रामसभेत जोरदार हाणामारी झाली. सत्ताधारी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये झालेल्या हाणामारीत तलवारी आणि काठ्यांचा वापर करण्यात आला.

काँग्रेस आणि शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये हाणामारी

Last Updated: Wednesday, January 16, 2013, 21:51

नांदेड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. काँग्रेस आणि शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. सदस्यांनी चक्क एकमेकांवर खुर्च्या भिरकावल्या. शिवसेनेच्या महिला सदस्याचे निलंबन केल्यामुळं हा गोंधळ घालण्यात आला.

केजरीवाल आणि खुर्शीद समर्थकांमध्ये तुफान हाणामारी

Last Updated: Thursday, November 1, 2012, 19:43

फारुखाबादमध्ये केजरीवाल विरुद्ध खुर्शीद संघर्षानं आज हिंसक वळण घेतलं. अरविंद केजरीवाल फारुखाबादमध्ये करत असलेल्या निदर्शन स्थळाजवळ काँग्रेस कार्यकर्ते आणि आयएसीचे कार्यकर्ते यांच्यात हाणामारी झाली.

संसदेत खासदारांची धक्काबुक्की - हाणामारी

Last Updated: Wednesday, September 5, 2012, 13:42

सरकारी नोकरीमध्ये आरक्षणाच्या जोरावर पदोन्नती मिळावी या विधेयकाने राज्यसभेत चांगलच गोंधळ केला. राज्यसभेत खासदारांनी धक्काबुक्की, हाणामारी केली.

काँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Last Updated: Monday, May 7, 2012, 16:47

धुळ्यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मानापमान नाट्य रंगले. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते.

नाशिकमध्ये दोन गटात तुफान हाणामारी

Last Updated: Saturday, April 21, 2012, 22:38

नाशिकमध्ये दोन गटांत तूफान हाणामारी झाली आहे. नाशिक रोडच्या पांढूर्ली गावात ही घटना घडली आहे. तिथं मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि घरांची तोडफोड करण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.

ठाण्यात राडा, महासभा तहकूब

Last Updated: Friday, April 20, 2012, 19:25

काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांत बाचाबाची आणि मारहाण झाली आहे. या गदारोळात अज्ञात व्यक्ती समजून शिवसेनेच्या नगरसेवकांनी मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्तांना मारहाण केल्याचं समोर आल्यानंतर, सत्ताधारी बॅकफूटवर गेले.

सेना-NCP नगरसेवकांची पालिकेत राडा

Last Updated: Friday, April 20, 2012, 16:11

आज ठाणे महानगरपालिकेत एकच राडा झाला. कारण की, सेना - राष्ट्रवादी नगरसेवक ह्यांनी मोठ्या प्रमाणात हाणामारी करावी लागली. शेवटी पोलिसांना मध्यस्ती करावी लागली. पोलिसांनी मध्ये ही हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र नगरसेवक एकमेंकांना अक्षरश: गुंडांसारखे मारत होते.

राष्ट्रवादी-शेकापातील संघर्षाने घेतला बळी

Last Updated: Saturday, April 7, 2012, 22:22

रायगड जिल्ह्यात रोह्यात अष्टमी गावात राष्ट्रवादी आणि शेकाप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या झालेल्या राड्यात एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

आठवलेंच्या पत्रकार परिषदेत हाणामारी

Last Updated: Monday, April 2, 2012, 18:28

आरपीआयचे नेते रामदास आठवलेंची पत्रकार परिषद सुरु होण्याआधी आज हाणामारी झाली. काही अज्ञात लोकांनी बाहेर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरें विरोधात घोषणाबाजी केल्यानं वातावरण तापलं.

फेसबुकवरची तू तू मै मै अन् रस्त्यावर हाणामारी

Last Updated: Monday, March 19, 2012, 20:24

डोंबिवलीत, कोपरमधे स्थानिक शिवसेना नगरसेवक रामदास पाटिल याचा मुलगा सचिन पाटिल याने मित्र लोकेश पावशे आणि त्याच्या परिवाराला फेसबुकवरील चँटिंगवरून वादविवाद झाल्याने आपल्या साथिदारांसह बेदम मारहाण केली आहे.

पालिकेत हाणामारी, मनसे नगरसेवकांवर गुन्हा

Last Updated: Tuesday, February 28, 2012, 19:24

यवतमाळ जिल्ह्यातील वणी नगरपरिषदेत मनसे आणि अपक्ष नगरसेवकांत हाणामारी झाली असून नगरसेवकांनी खुर्च्याची फेकाफेक केल्याने दोन नगरसेविका जखमी झाल्या आहेत.

नागपूर शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Last Updated: Tuesday, February 28, 2012, 09:57

महापालिका निवडणुकांनंतर नागपूर शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना जिल्हाध्यक्ष शेखर सावरबांधे आणि शहराध्यक्ष सूरज गोजे यांच्यात हाणामारी झाली आहे.

जयपूर महापालिकेत कचऱ्यावरून हाणामारी

Last Updated: Tuesday, February 14, 2012, 09:17

जयपूर महापालिकेत कचऱ्याच्या मुद्यावरून चांगलाच हंगामा झाला. सुरूवातीला नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि नंतर मात्र या चकमकीचं रूपांतर हाणामारीत झालं. लोकशाहीला लाज आणेल असा प्रकार जयपूर महापालिकेच्या सभागृहात घडला.

सोलापूर हाणामारी, दोघांची प्रकृती चिंताजनक

Last Updated: Monday, November 28, 2011, 08:40

सोलापूरमध्ये दोन गटात झालेल्या सशस्र हाणामारीत गंभीर जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजणक आहे.