कॅम्पा कोलावासियांनी लढाई थांबवली, करू देणार कारवाई

Last Updated: Sunday, June 22, 2014, 18:37

गेल्या दीड वर्षांपासून आपली घरं वाचवण्यासाठी कॅम्पा कोलावासियांनी सुरू केलेली लढाई अखेर अपयशी ठरलीय. आम्ही विरोध करून आता थकलोय. त्यामुळं आम्ही आमची लढाई थांबवत आहोत, अशा शब्दांत कॅम्पा कोलावासियांनी आपलं दुःख मांडलं.

भोई समाजातील बहिष्कृत मुले पुन्हा समाजात

Last Updated: Wednesday, April 30, 2014, 10:07

भोई समाज पंचायतीने आंतरजातीय विवाह केलेल्या आणि अनेक वर्ष समाजातून बहिष्कृत असणा-या मुलांना पुन्हा एकदा समाजात समाविष्ट करण्य़ाचा निर्णय घेतला आहे.

आता, एक - दोन फ्लॅटसाठी `डीम्ड कन्वेयन्स` रखडणार नाही

Last Updated: Tuesday, April 29, 2014, 23:01

महसूल विभागाच्या नव्या नियमामुळे आता `डीम्ड कन्वेयन्स`चे अनेक रखडलेले प्रस्ताव मार्गी लागणार आहेत. `डीम्ड कन्वेयन्स` करून घेताना, सोसायटीतील सर्व घरांची स्टॅम्प ड्युटी भरलीच पाहिजे, असा नियम आधी होता. मात्र, हा नियम आता शिथील करण्यात आल्यानं, जवळपास १६ ते १८ हजार सोसायट्यांना तत्काळ दिलासा मिळणार आहे.

अजित पवार, मुंडे, पतंगरावांच्या फ्लॅट्सना जप्तीची नोटीस

Last Updated: Friday, February 7, 2014, 19:06

मुंबईतल्या शुभदा आणि सुखदा सोसायटींना मुंबई महापालिकेनं जप्तीची नोटीस बजावलीय. शुभदा आणि सुखदा या सोसायटींनी १६ कोटींचा मालमत्ता कर थकवल्यानं ही जप्तीची नोटीस बजावण्यात आलीय.या सोसायटींमध्ये अजित पवार आणि गोपीनाथ मुंडेंचे फ्लॅट्स आहे.

‘आदर्श’वरुन मुख्यमंत्र्यांच्या जखमेवर राष्ट्रवादीनं चोळलं मीठ

Last Updated: Monday, December 30, 2013, 19:23

आदर्श घोटाळ्याचा अहवाल फेटाळल्यानंतर त्याबाबत फेरविचार करण्याची नामुष्की राज्य मंत्रिमंडळावर आणि पर्यायानं मुख्यमंत्र्यांवर येणार आहे. दरम्यान, आदर्शमुळं अडचणीत आलेल्या काँग्रेसला पाठिंबा देताना, काँग्रेसविरोधात आक्रमक होण्याचे संकेत राष्ट्रवादीनं दिले आहेत.

आधार कार्ड आता तुमच्या दारी!

Last Updated: Monday, June 17, 2013, 17:27

आधार कार्ड आता तुमच्या दारी मिळणं शक्य होणार आहे. कारण आधार मिळवणं आता आणखी सुलभ झालंय.

मनसेचं पुढचं टार्गेट... हाऊसिंग सोसायट्या!

Last Updated: Tuesday, May 14, 2013, 16:29

मनसेनं निवासी सोसायट्यांचे बोर्ड मराठीमध्ये लिहिण्याची मागणी केलीये. याबाबत त्यांनी मुंबई महानगरपालिकेला एक प्रस्तावही दिलाय. मात्र, हाऊसिंग सोसायटी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या मागणीवरुन नाराजी व्यक्त केलीय.

आदर्श सोसायटी घोटाळा: चौकशी समितीचा अंतिम अहवाल पूर्ण

Last Updated: Thursday, April 18, 2013, 18:55

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी चौकशी समितीचा अंतिम अहवाल पूर्ण झाला असून, आज संध्याकाळी हा अहवाल राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्यापुढे सादर केला जाणार आहे.

छगन भुजबळ पुन्हा आरोपांच्या `मैदानात`

Last Updated: Friday, February 8, 2013, 23:27

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ पुन्हा एकदा त्यांच्या एमईटी शैक्षणिक संस्थेमुळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. एमईटीच्या शेजारीच असलेल्या जनरल ए.के वैद्य मैदानाचा वापर हा नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचा आरोप वांद्रयातील रहिवाशांनी केलाय.

कहाणी जिद्दीने उभ्या राहिलेल्या बलात्कार पीडितेची...

Last Updated: Thursday, January 24, 2013, 07:13

पिंपरी-चिंचवडमधल्या एका विवाहितेवर बलात्कार झाल्यानंतर तिच्या पतीनं मात्र तिला भक्कम आधार दिलाय. ही आहे या दोघांची दुर्देवी आणि अनोखी कहाणी...

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणाची चौकशी पूर्ण

Last Updated: Wednesday, January 16, 2013, 21:34

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणाची चौकशी पूर्ण झालीय. मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश जे ए पाटील आणि माजी मुख्य सचिव पी सुब्रमण्यम यांचा दोन सदस्यीय चौकशी आयोग महिनाभरात अहवाल सादर करणार आहे.

पुण्यामध्ये गुलाबांचं प्रदर्शन

Last Updated: Sunday, December 30, 2012, 17:05

गुलाब प्रदर्शन अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळत आहे. गुलाबाचं सौंदर्य आणि निसर्गाची मुक्त उधळण पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे. निमित्त आहे ‘रोज सोसायटी’च्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या गुलाब प्रदर्शनाचं...

पारधी समाजाच्या वस्तीवर अज्ञात लोकांचा हल्ला

Last Updated: Monday, December 10, 2012, 22:20

गायरान जमिनीच्या वादातून औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिंधी सिरजगाव इथं पारधी समाजाच्या वस्तीवर अज्ञात लोकांच्या जमावाने सशस्त्र हल्ला चढवून 15 ते 20 झोपड्या जाळल्या. या घटनेत सातजण जखमी झाले. गायरान जमिनीचा वाद न्यायालयात सुरू असून या वादातून हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येतंय.

कन्हैयालाल गिडवाणी यांचे मुंबईत निधन

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 11:32

मुंबईल वादग्रस्त आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्यातील आरोपी, माजी आमदार कन्हैयालाल गिडवाणी यांचे आज सकाळी निधन झाले.

`आदर्श`चं खापर दिवंगत विलासरावांच्या माथी

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 10:30

आदर्श सोसायटीला जमीन बहाल करण्याचा निर्णय दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीच घेतला होता, असं स्पष्ट करत राज्य सरकारनं अखेर आदर्शचे खापर विलासरावांच्या माथी फोडलं आहे.

सनी लिऑन म्हणतेय `कुणी घर देता का घर?`

Last Updated: Monday, September 24, 2012, 14:02

विदेशात पॉर्न स्टार असलेली सनी लिऑन मुंबईत हिंदी सिनेसृष्टीत अभिनेत्री म्हणून दाखल झाली. तिचा पहिला सिनेमा बऱ्यापैकी चालला. मात्र तरीही सनी लिऑनला मुंबईत घर मिळणं मुश्किल झालंय. त्यामुळे तिला ‘कुणी घर देता का घर?’ असं विचारत फिरायची पाळी आली आहे.

सीबीआयला अधिकारच काय- चव्हाण

Last Updated: Tuesday, August 28, 2012, 15:09

आदर्श सोसायटीच्या गैरव्यवहार प्रकरणी आरोपी ठरलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आता मुंबई हायकोर्टाकत धाव घेतली आहे. सीबीआयने चव्हाण यांच्यावर आरोपपत्र दाखल केल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी ही तक्रार रद्द व्हावी, यासाठी चव्हाण यांनी याचिका केली आहे.

बँकेनं शाळेलाच ठोकलं सील

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 14:49

वेळेत कर्जपरफेड न केल्यानं एका को-ऑपरेटीव्ह बँकेनं एका शाळेलाच सील ठोकण्याचा पराक्रम केलाय. पण, त्याचा फटका मात्र विद्यार्थ्यांना बसतोय.

सबंध महाराष्ट्रात माझं घरच नाही- आव्हाड

Last Updated: Tuesday, July 10, 2012, 11:36

आदर्श घोटाळ्यासंबंधी काल साक्ष देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईतच काय, तर महाराष्ट्रातही आपल्या मालकीच एकही घर नसल्याचं सांगितलं.

भारतातल्या 82 पक्ष्यांचं अस्तित्व धोक्यात

Last Updated: Wednesday, July 4, 2012, 19:14

भारतातल्या 82 पक्ष्यांचं अस्तित्व धोक्यात आलंय. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं ही माहिती दिली आहे. अस्तित्व धोक्यात आलेल्या पक्ष्यांपैकी 13 प्रजाती तर नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

आदर्श घोटाळा : शिंदेंनंतर विलासरावांची बारी

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 11:12

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री विलासराव देशमुख यांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे. त्यासाठी देशमुख आज चौकशी आयोगासमोर हजर राहणार आहेत. काल सुशीलकुमार शिंदेंची साक्ष नोंदवण्यात आली. त्यांनी आपल्या साक्षीत आधीच्या मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवत संपूर्ण जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळं आता विलासराव देशमुख काय भूमिका घेतात याकडं लक्ष लागले आहे.

सुशीलकुमारांचं बोट विलासरावांकडे...

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 08:33

आदर्श घोटाळ्याच्या सुनावणीत नवीन ट्विस्ट आलाय. आदर्श आयोगासमोर साक्ष देताना माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी विलासराव देशमुखांकडे बोट दाखवलंय. आदर्श सोसायटीला जमीन देण्याचा निर्णय विलासराव देशमुख सरकारचा असल्याची साक्ष शिंदेंनी दिलीय.

आदर्श घोटाळा : सुशीलकुमार शिंदेंची पलटी

Last Updated: Monday, June 25, 2012, 14:32

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशीलकमार शिंदे यांनी चौकशी आयोगासमोर आज साक्ष नोंदवली. आदर्श सोसायटीच्या अलॉटमेंटचं लेटरवर सही केली होती. तेंव्हा त्यांना पर्यावरण मंत्रालयानं NOC दिली होती की नाही हे आपल्याला आठवत नसल्याचं यावेळी शिंदे यांनी चौकशी आयोगासमोर सांगितलं.

'उन्नतीवूड्स'ने ६० टक्के केले पाणी बचत

Last Updated: Monday, June 25, 2012, 14:27

दिवसेंदिवस शहरांची लोकसंख्या वाढत चालली आहे. यात शहरांमध्ये पाणीप्रश्न गंभीर होत चाललाय.. अशा वेळी रेन वॉटर हार्वेस्टिंग हा चांगला पर्याय ठरतोय.. ठाण्यात उन्नतीवूड्स सोसायटीनं अशाच हार्वेस्टिंग मधून दरवर्षी सुमारे ६०टक्के पाणी वाचतय.

... आणि मिळालं २४ तास मूबलक पाणी

Last Updated: Wednesday, June 6, 2012, 18:48

संपूर्ण महाराष्ट्रात पाणी प्रश्नानं गंभीर रुप धारण केलं असताना बदलापूरमधल्या शिवदर्शन सोसायटीतल्या रहिवाशांना २४ तास पाणी उपलब्ध होऊ शकलं... याचं श्रेय द्यावं लागेल रेन वॉटर हार्वेस्टिंगला आणि बदलापूर नगरपालिकेला...

आदर्श घोटाळा : १४ आरोपी आणखी अडचणीत

Last Updated: Tuesday, May 29, 2012, 10:11

आदर्श घोटाळाप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह १४ आरोपी आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. या आरोपींवर जन्मठेपेची शिक्षा असलेल्या आरोपांअतर्गतही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सीबीआयनं विशेष कोर्टात दिली आहे.

‘एसआयटी’ अहवालातील महत्त्वाची कागदपत्रं नाहिशी

Last Updated: Thursday, May 10, 2012, 17:58

आपल्याला ‘एसआयटी’ रिपोर्ट मिळावा, यासाठी गुलबर्ग सोसायटी दंगा प्रकरणातील पीडित जाकिया जाफरी यांनी पुन्हा एकदा अहमदाबाद कोर्टात एक याचिका दाखल केली आहे.

'आदर्श'ची जमीन लष्कराचीच- जन. सिंग

Last Updated: Tuesday, May 1, 2012, 09:01

आदर्शच्या जमिनीच्या मालकीवरून पुन्हा वाद सुरु होण्याची चिन्ह आहेत. आदर्शची जमीन ही सेनेच्याच मालकीची असल्याचा दावा लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी केलाय.

'आदर्श'च्या 'क्लीन चीट'वरुन सोमैया आक्रमक

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 22:47

आदर्श प्रकरणात अडकलेल्या काँग्रेस नेत्यांना क्लिन चीट मिळाली असं काँग्रेसनं एकिकडे बोलायला सुरुवात केलीय आणि याच सगळ्या प्रकारावरती भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी टीका केलीय.

नेते सटकले, अधिकारी लटकले

Last Updated: Tuesday, April 17, 2012, 23:36

मुंबईतील अत्यंत महागड्या अशा कुलाबा परिसरात आदर्श सोसायटीचं बांधकाम करण्यात आलंय.मात्र या इमारतींच बांधकाम करतांना सर्व सरकारी कायदे आणि नियम बासणात गुंडाळून ठेवण्यात आले होतं.पण हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर सीबीआयला कारवाई करावी लागली..

आदर्श सोसायटीचा आज फैसला

Last Updated: Friday, April 13, 2012, 11:50

आदर्श सोसायटीला देण्यात आलेली जागा कुणाची आहे. याचा फैसला आज होणार आहे. यासंदर्भात माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली द्विसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. ही समिती आपला अहवाल आज सोपवणार आहे.

गोध्राकांडातील १८ दोषींना जन्मठेप

Last Updated: Thursday, April 12, 2012, 14:11

गुजरातमध्ये २००२ च्या गोध्राकांडानंतर उसळलेल्या आणंद जिल्ह्यातल्या पिरावली भगोल हत्याकांड प्रकरणी दोषी ठरवलेल्या २३ जणांपैकी १८ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर उर्वरित पाच जणांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

फाटक, तिवारींना १२पर्यंत कोठडी

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 19:15

आदर्श सोसायटी घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या जयराज फाटक आणि रामानंद तिवारी या दोन आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टानं या दोघांनाही 12 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

जयराज फाटक, रामानंद तिवारी सीबीआयच्या ताब्यात

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 14:18

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी जयराज फाटक आणि रामानंद तिवारींना चौकशीसाठी सीबीआयने ताब्यात घेतलं आहे.

आदर्श प्रकरणी अखेर कारवाई

Last Updated: Wednesday, March 21, 2012, 23:57

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी सीबीआयने कालपासून अटक सत्र सुरु केलंय...या प्रकरणात राजकारणी सैन्यदल तसेच राज्य सरकारी सेवेतील माजी अधिका-यांचा समावेश आहे..खरं तर गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपींना अटक करण्याची तसदी सीबीआयने घेतली नव्हती...मात्र कोर्टाच्या फटका-यानंतर सीबीआयने ही कारवाई केलीय.

गोध्रा हत्याकांड आणि नरेंद्र मोदी

Last Updated: Tuesday, February 28, 2012, 13:11

२७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा स्थानकाजवळ ‘साबरमती एक्सप्रेस’च्या एस-६ बोगीला लावलेल्या आगीत ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला आणि दुसऱ्याच दिवसापासून सुडाच्या आगीनं गुजरात पेटलं.

मुंबईत ९० वर्षीय वृद्धेची हत्या

Last Updated: Wednesday, February 15, 2012, 10:00

मुंबईत मस्जिद बंदर परिसरात एका नव्वद वर्षीय वृद्धेची हत्या झाली. हीराबेन मेहता असं या मृत महिलेचं नाव आहे. काही अज्ञात लोकांनी धारदार शस्त्रानं या वृद्ध महिलेचा गळा चिरून हत्या केल्याचं उघड झालं.

'विघ्नहर सोसायटी'वर विघ्न

Last Updated: Thursday, December 8, 2011, 02:58

नवी मुंबईतील पामबीच मार्गावरील विघ्नहर इमारतीचं अनधिकृत बांधकाम करुन फ्लॅट विकणाऱ्या बिल्डरसह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रत्यक्ष मंजूर आराखड्यापेक्षा २० ते ४० टक्के बांधकाम करण्यात आलंय.