एक्स्प्रेस हायवेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो सावधान!

Last Updated: Tuesday, June 17, 2014, 19:00

एक्स्प्रेस हायवेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो सावधान…. तुम्ही जर खाजगी अथवा स्वत:च्या वाहनाने रात्री- अपरात्री प्रवास करणार असाल तर जरा जपून… कारण रस्त्यात कुठल्याही क्षणी, कुठल्याही ठिकाणी तुमच्या वाहनावर सशस्त्र दरोडा पडू शकतो.

पाणी मागण्याच्या बहाण्याने दापोलीत भरदिवसा दरोडा

Last Updated: Thursday, December 26, 2013, 08:22

रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा भरदिवसा दरोडा पडलाय. दापोली तालुक्यात पाणी मागण्याच्या बहाण्याने दरोडा टाकण्यात आला. याआधी रत्नागिरीतील जाकादेवी येथे बॅंकेवर दरोडा टाकण्यात आला होता. दरोड्याचे सत्र सुरू असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. २० ते २५ वयोगटातील तरूणांनी हा दरोडा टाकला. दरोड्याच्यावेळी महिलेचे हात-पाय बांधून लाखाचा ऐवज लंपास करण्यात आलाय.

रत्नागिरीत बँक लूटली : बिल्डर निघाला दरोडेखोर

Last Updated: Thursday, December 12, 2013, 13:54

रत्नागिरीतील बँक दरोडा प्रकरणातील प्रमुख आरोपी हा एक व्यावसायिक बिल्डर असल्याचे पुढे आहे. त्याला पोलिसांनी डोंबिवलीचून अटक केली. हा बिल्डर करोडपती असूनही केवळ नाव कमावण्याच्या हौसेपोटी दरोड्याचा मार्ग अवलंबला असल्याचे पुढे आलेय. त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आलेय.

नवी मुंबईत दरोडा, पिस्तुल रोखून दीड किलो सोने लुटले

Last Updated: Wednesday, December 4, 2013, 17:10

नवी मुंबईत पुन्हा चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. जुईनगरमधील विशाल ज्वेलर्सवर मंगळवारी रात्री दरोडा पडला, दरोडेखोरांनी पिस्तुलचा धाक दाखवत दीड किलो सोने पळवून नेले. पाच दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश केला आणि दुकानाची तोडफोड केली. त्यानंतर सोने घेऊन पोबारा केला.

रत्नागिरीत सेंट्रल बँकेवर दरोडा : १ ठार, ९.३०लाख लुटले

Last Updated: Friday, November 29, 2013, 07:20

रत्नागिरीतल्या जाकादेवी गावातल्या सेंट्रल बँकेवर भर दिवसा धाडसी दरोडा टाकण्यात आलाय. पाच अज्ञान व्यक्ती आलीशान गाडीतून आले आणि बँकेचा लंच टाईम सुरु होण्याआधी जबरदस्तीने घुसले. यावेळी झालेल्या गोळीबारात बँकेच्या शिपायाचा जागीच मृत्यू झाला. तर बँकेतील आणखी एक शिपाई गंभीर जखमी झालाय. फिल्मिस्टाईलने बँक लुटत दरोडेखोरांनी बँकेतील ९ लाख ७० हजार रुपये पळवले.

टिटवाळ्यात ज्वेलरला लुटलं

Last Updated: Monday, November 11, 2013, 13:25

टिटवाळ्यामध्ये ओम साई ज्वेलर्सचे मालक अरविंद शेलार दुकान बंद करून सोनं घरी घेऊन जात असताना त्यांना लुटल्याची घटना घडली आहे.

दरोडा आणि हत्येप्रकरणी ६ जणांना अटक

Last Updated: Monday, November 11, 2013, 10:01

पाथर्डी गावातील मोंढे वस्तीवर १ नोव्हेंबर रोजी पडलेल्या दरोड्या प्रकरणी ६ जणांना १६ तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.

अबु सालेम टोळीतल्या गुन्हेगाराला अटक

Last Updated: Saturday, October 26, 2013, 16:47

ठाण्यात एका ज्वेलर्सवर दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या अबू सालेम टोळीतील एका सराईत गुन्हेगाराला नौपाडा पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. राजेश हातणकर असे या गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर खुनाचे १५ गुन्हे दाखल आहेत.

देवीच्या अडीच किलो वजनाच्या चांदीच्या पादुका चोरीला..

Last Updated: Thursday, October 3, 2013, 21:34

नाशिकच्या सतीमाता मंदिरातल्या अडीच किलो वजनाच्या चांदीच्या पादुका चोरीला गेल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात वडांगळी गावात हे मंदिर आहे.

नाशिकमध्ये भरदिवसा सिनेमास्टाईल दरोडा

Last Updated: Thursday, October 3, 2013, 07:42

नाशिकरोडसारख्या गजबजलेल्या परिसरात दिवसाढवळ्या सिनेस्टाईल दरोडा पडला. आता या घटनेला २४ तास उलटून गेलेत. मात्र अजूनही पोलिसांच्या हाती सुगावा लागलेला नाही. या दरोड्यानंतर ठेवीदारांची झोप उडालीय.

बँकेच्या गाडीवर भर दुपारी साडेतीन कोटींचा दरोडा!

Last Updated: Wednesday, August 28, 2013, 20:24

नालासोपा-यात ऍक्सिस बँकेजवळ भर दुपारी साडेतीन कोटींचा दरोडा टाकण्यात आला. कॅश व्हॅनमध्ये रोख रक्कमेचं हस्तांतरण सुरू असताना पाच ते सहा दरोडेखोर एका क्वालिसमधून आले आणि कॅश असलेल्या पेट्या घेऊन फरार झाले.

नवी मुंबईतील बँक दरोडा प्रकरणी पाच अटकेत

Last Updated: Saturday, August 17, 2013, 12:07

नवी मुंबईच्या खारघर इथल्या बँक दरोडा प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. आठ ऑगस्टला इथल्या कॅश मॅनेजमेंट या कंपनीच्या कार्यालयासमोर दरोड्याची ही घटना घडली होती.

डिझेल भरण्यासाठी थांबलेल्या बसवर सशस्त्र दरोडा

Last Updated: Monday, May 6, 2013, 18:56

बसमध्ये डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर थांबलेल्या बसवर सशस्त्र दरोडा पडल्याची खळबळजनक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे.

हार्बर रेल्वेवर अल्पवयीन मुलांचा दरोडा, एक ठार

Last Updated: Tuesday, April 16, 2013, 21:37

हार्बर मार्गावरील सीएसटी ते पनवेल लोकलवर पहाटे साडेपाच वाजता मानखुर्द ते वाशी दरम्यान दरोडा पडला. मानखुर्द येथे अल्पवयीन मुलांनी हा दरोडा घातला.

हायटेक दरोडा

Last Updated: Friday, February 8, 2013, 00:09

एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, आणि ऑनलाईन व्यवहार हे आता प्रत्येकासाठी नित्याचं आणि गरजेचं झालय.. वेळेची बचत आणि पैशाची जोखीम नसल्यानं हे ऑनलाईन व्यवहार करण प्रत्येकाला सोपं वाटू लागलय.. पण सुरक्षित समजल्या जाणा-या या पारदर्शकतेमध्येही आता नवं संकट उभ ठाकलय..

परदेशी चोरांचा भारतीयांवर `ऑनलाईन` दरोडा

Last Updated: Thursday, February 7, 2013, 14:30

तुम्ही ऑनलाईन बँकिंग व्यवहार करणार असला तर शंभर वेळा विचार करा. कारण तुमच्या ऑनलाईन व्यवहारावर सातासमुद्रापार बसून कोणी नजर ठेवत आहे.

सावधान, तुमच्या अकाऊंटवर दरोडा

Last Updated: Saturday, October 27, 2012, 15:09

तुम्ही ज्या गोष्टीकडे डोळेझाक करता त्याच गोष्टीवर समाजातल्या काही लोकांची बारकाईन नजर असते. तुम्ही अनेकवेळा बॅंकेत जाता किंवा पैशाचे व्यवहार करता. पण जेवढी काळजी नोटांच्या सुरक्षिततेबाबत वापरता तेवढी काळजी चेकबद्दल नसल्याचे वारंवार दिसून आलं आहे. आपल्या याच बेफिकीरीमुळे तुम्हाला फार मोठ्या संकटाला सामोरं जाण्याची वेळ नाकारता येत नाही. य़ावरच प्रकाश टाकण्याचा प्रयत्न, अकाऊंटवर दरोडा.

दरोडेखोरांना मदत करणारे पोलीस निलंबित

Last Updated: Tuesday, September 25, 2012, 15:25

पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेसवरील दरोड्याप्रकरणी रेल्वे प्रशासनानं 2 पोलीसांना निलंबित केलंय. दरोडेखोरांकडून चिरीमिरी घेऊन त्यांना सोडून दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एम.एन.माळी आणि व्ही.ए.आडके अशी या 2 पोलिसांची नावं आहेत.

पुणे-सोलापूर इंटरसिटीवर दरोडा

Last Updated: Monday, September 24, 2012, 08:26

पुणे-सोलापूर इंटरसिटीवर दरोडा टाकणा-या एका चोरट्याला पकडण्यात आलं होतं. मात्र, धक्कादायक बातमी अशी, की या पकडलेल्या दरोडेखोराला पोलिसांनीच सोडून दिल्याचं समोर आलंय. रेल्वे प्रवाशांनीच पोलिसांना या दरोडेखोराकडून पैसे घेताना रंगेहाथ पकडल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.

Bank अकाऊंटवर दरोडा..

Last Updated: Monday, August 27, 2012, 22:17

तुमच्या बँक खात्यातील रक्कम दहशतवादी कृत्यासाठी वापरल्यास काय होईल, याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? जर तुम्ही निष्काळजीपणे आपलं एटीएम कार्ड आणि इंटरनेट बँकिंग वापरत असाल तर आताच सावध व्हा.

'वाघ्या'वर घातला संभाजी ब्रिगेडने 'दरोडा'?

Last Updated: Thursday, August 2, 2012, 12:16

वाघ्या कुत्राचा पुतळा हटवल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या ७३ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. तर या कार्यकर्त्यांवर दरोडा घातल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलिसांना मारहाण केल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला.

पाणी पिण्यासाठी आले, चार लाख लुटून नेले...

Last Updated: Thursday, July 5, 2012, 16:00

धुळे शहरातील सम्राट नगर परिसरात सशत्र दरोडा टाकून दरोडखोरांनी चार लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. धुळे शहरातील सम्राट नगर भागातील मधुमालती अपार्टमेन्ट मध्ये राहणाऱ्या बोरुडे यांच्या घरी काल रात्रीच्या सुमारास चार दरेडोखोरांनी सशत्र दरोडा टाकून लुटमार केली.

पुण्यात ज्वेलर शॉप लुटण्याचा प्रयत्न

Last Updated: Friday, May 11, 2012, 22:57

पुण्यात हडपसरमधील ओंकार ज्वेलर्सवर दरोडा घालण्याचा प्रयत्न झाला. गोळीबार करून दरोडा घालण्याचा 2 जणांनी प्रयत्न केला. मात्र दुकानाचे मालक आणि परिसरातल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळं हा दरोड्याचा प्रयत्न फसला. सुदैवानं गोळीबारात कुणीही जखमी झालेलं नाही.

दरोडा पडला... आमदारांच्याच घरी

Last Updated: Sunday, May 6, 2012, 17:30

नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यात भाजप आमदार उमाजी बोरसे यांच्या शेतातल्या घरावर सशस्त्र दरोडा पडला आहे. मध्यरात्री सात ते आठ दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला.

रेल्वे एक्सप्रेसवर दरोडा, जवान सरसावला पुढे

Last Updated: Monday, April 23, 2012, 07:48

निझामुद्दीन-गोवा एक्स्प्रेसवर ३ ते ४ जणांच्या टोळीनं दरोडा घातल्याची घटना घडली आहे. काल रात्री १ ते २ च्या दरम्यान ही दरोड्याची घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातल्या मिरजजवळ नांद्रेगावात गाडी सिग्नलला थांबली असताना चोरट्यांनी धाडसी दरो़डा घातला.

मण्णपुरम गोल्डच्या शाखेत जबर दरोडा...

Last Updated: Wednesday, April 18, 2012, 16:30

पुण्यातल्या भवानी पेठेतल्या मणप्पुरम गोल्ड लोनच्या शाखेत जबरी चोरी झाली आहे. चोरट्यांनी बनावट चावीच्या सहाय्यानं साडे सतरा किलो सोनं, आणि सहा लाख ३४ हजारांची रोकड चोरुन नेली आहे.

रायगड दरोडा : दिवेआगर ग्रामस्थांचा मोर्चा

Last Updated: Saturday, April 7, 2012, 18:59

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर इथल्या सुवर्ण गणेश मंदिरावर पडलेल्या दरोड्याला पंधरवडा उलटूनही पोलीस तपासात काहीच धागेदोरे न लागल्यानं संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दिघीसागरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.

सेनेने मूर्ती आणायला नको होती- मनसे

Last Updated: Friday, March 30, 2012, 20:37

शिवसेना-भाजप आमदारांनी विधानसभेत गणपतीच मूर्ती आणायला नको होती. असं वक्तव्य मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी केलीय. राज्य सरकारनं सत्तेचा दुरुपयोग केला असून निलंबन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले तर आम्ही त्यांना मदत करु असेही ते म्हणाले.

युतीचे १४ आमदार वर्षभरासाठी निलंबित

Last Updated: Friday, March 30, 2012, 14:32

रागयड जिल्ह्यातील दिवेआगर गणेश चोरीचा तपास लागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या युतीच्या १४ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेचे १३ तर भाजपचा १ आमदार एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

दिवेआगर चोरी: विधानसभेत सेनेचा गोंधळ

Last Updated: Friday, March 30, 2012, 13:14

रायगडमधील दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिरातून सोन्याची दीड किलोवजनाची मूर्तीची चोरी झाली. मात्र, या चोरीचा छडा लागलेला नाही. त्यामुळे शिवसनेने रायगड बंदची हाक दिल्यानंतर राज्यात घंटानाद आंदोलन केले. आज विधानसभा परिसरात आरती करून अधिक आक्रमकपणी स्वीकारला. चोरीचा तपास लावण्यास सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप करीत विधानसभेत गोंधळ घातला. त्यामुळे अर्धातास कामकाज तहकूब करावे लागले.

रायगडात सुवर्ण गणेश मंदिरावर दरोडा

Last Updated: Monday, April 2, 2012, 12:43

रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील दिवे आगरमध्ये सुवर्ण गणेश मंदिरावर दरोडा टाकण्यात आला आहे. पेशवेकाळीन मंदिरातून दरोडेखोरांनी दीड किलो वजनाची सोन्याची मूर्ती पळवलीय. दोन वॉचमनला मारहाण करून हा दरोडा घालण्यात आला.

रायगड जिल्हयात दरोड्याचे सत्र सुरुच

Last Updated: Sunday, March 18, 2012, 09:22

रायगडमध्ये दरोड्यांचं सुरूच आहे. पोलादपूर तालुक्यातील लोहारमल इथं एका दाम्पत्यावर दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला केल्याची घटना घडली आहे. गेल्या सहा महिन्यातली ही 12 वी घटना आहे.

दरोडेखोऱ्यांच्या हल्ल्यात मुलगी ठार

Last Updated: Saturday, February 25, 2012, 12:21

महाडजवळील बिरवाडी येथे सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. दरोडेखोरांच्या हल्ल्यात १४ वर्षीय मुलगी ठार झाली. या हल्ल्यात चार जण जखमी झालेत.

हुतात्मा एक्सप्रेसवर दरोडा

Last Updated: Friday, January 20, 2012, 10:39

सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेसवर दरोडा पडलाय. करमाळ्याजवळील केम गावाजवळ ही घटना घडलीय. दरोडेखोरांनी रेल्वेच्या सिग्नलची वायर कापून रेल्वे थांबवली.

ठाकुर्ली दरोडाः सहा पोलिसांची 'झोप' उडाली

Last Updated: Thursday, December 1, 2011, 11:59

झी २४ तासने या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर निष्काळजीपणाचा ठपका ठेवून मानपाडा पोलीस स्टेशनच्या सहा पोलिसांना बुधवारी निलंबित करण्यात आले. ठाणे ग्रामीणचे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांनी ही माहिती दिली.

डोंबिवलीत दरोडा सत्र, पोलीस मात्र झोपेत गर्क..

Last Updated: Monday, November 28, 2011, 12:23

डोंबिवलीत दरोड्यांच सत्र सुरुच आहे. विशेष म्हणजे मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कालच दरोडा पडला होता. त्यानंतर आजही याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत दरोडा पडलाय. खोनी गावात हा दरोडा पडला असून साडेतीन लाखांचा ऐवज लुटून नेण्यात आला.