ऑफर होती, पण निवडणूक नको रे बाबा- सेहवाग

Last Updated: Thursday, March 20, 2014, 19:22

भारतीय संघाचा धडकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने लोकसभा निवडणूक लढविण्याचा वृत्ताचा इन्कार केला आहे. मला लोकसभा निवडणूक लढविण्याची ऑफर मिळाली होती, पण मी त्याचा स्वीकार केला नसल्याचे वीरेंद्र सेहवाग याने स्पष्ट केले.

दिल्ली डेअरडेव्हिल्समधून सेहवागला डच्चू?

Last Updated: Sunday, January 5, 2014, 07:33

सातत्याने क्रिकेटच्या मैदानात अपयशी ठरलेला वीरेंद्र सेहवाग हा आयपीएलच्या सहाव्या पर्वात खराब कामगिरीमुळे तो आता दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या संघातूनही डचू बसण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट संघात वारंवार खराब कामगिरी केल्यामुळे संघाबाहेर फेकल्या गेलेल्या वीरेंद्र सेहवागला आता आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या सातव्या पर्वात याचा प्रभाव जाणवणार आहे.

सचिन, सेहवागला टाकले मागे, केले २८७ रन्स!

Last Updated: Wednesday, October 9, 2013, 12:46

राजस्थानच्या विवेक यादवनं एक नवा विक्रम केलाय. त्यानं वन डे मॅचमध्ये २८७ रन्सचा डोंगर उभारलाय. एवढंच नाही तर विवेकनं चार ओव्हरमध्ये फक्त १ रन देत ७ विकेट घेतल्या. विवेकच्या या विक्रमानं त्यानं सचिन, सेहवागलाही मागे टाकलंय.

वीरूवर आली `गंभीर` वेळ, कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळ!

Last Updated: Sunday, September 22, 2013, 23:11

एके काळी भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करण्याची स्वप्नं पाहणार्यास वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांच्यावर आता त्यांच्यापेक्षा ज्युनिअर असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळावं लागणार आहे.

‘चॅम्पियन्स ट्रॉफी’मधून सेहवाग-हरभजनला डच्चू..

Last Updated: Saturday, April 6, 2013, 14:59

इंग्लंडमध्ये ६ जून ते २३ जून दरम्यान होणाऱ्या ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी’साठी भारतीय टीमच्या ३० संभावित क्रिकेटपटूंची यादी जाहीर करण्यात आलीय.

टीम इंडियातून वीरूला डच्चू...

Last Updated: Thursday, March 7, 2013, 13:18

ऑस्ट्रेलियाविरुद्ध उर्वरित दोन टेस्टसाठी टीम इंडिया जाहीर झालीय..वीरेंद्र सेंहवागला टीममधून डच्चू देण्यात आला आहे. तर हरभजन सिंगने मात्र टीममधील स्थान कायम राखलं आहे.

दोन टेस्टसाठी आज निवड, सेहवागचं काय होणार?

Last Updated: Thursday, March 7, 2013, 11:31

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित दोन टेस्टसाठी टीम इंडियाची आज निवड होणार आहे. सध्या खराब फॉर्मात असलेल्या वीरेंद्र सेहवागच्या भवितव्याबाबत निवड समिती काय निर्णय घेते याकडं सर्वांच लक्ष लागलं आहे.

धोनीने केला सेहवागचा पत्ता कट?

Last Updated: Monday, January 7, 2013, 19:32

इंग्लडविरुद्ध होणाऱ्या वन डे सिरिजमधून धडाकेबाज ओपनर वीरेंद्र सेहवाग याला डच्चू देण्यात आल्याने निवडीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

इंग्लंड सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा

Last Updated: Sunday, January 6, 2013, 21:20

इंग्लंडविरुद्धच्या तीन वन-डे मॅचेसाठी टीम इंडियाची दिल्लीमध्ये घोषणा करण्यात आली. वीरेंद्र सेहवागला टीममधून डच्चू देण्यात आला आहे. गेल्या काही मॅचेसमध्ये त्याला काही केल्या फॉर्म गवसत नसल्यानेच त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

दहशतवाद्या सारखा खेळतो सेहवाग - सादिक

Last Updated: Wednesday, January 2, 2013, 14:25

पाकिस्तानी क्रिकेट टीमचा सलामीचा माजी बॅट्समन सादिक मोहम्मदने भारताचा विस्फोटक सलामीचा बॅट्समन वीरेंद्र सेहवागला `आतंकवादी` म्हणून संबोधले आहे.

धोनीला `जमलं नाही` ते सेहवागने `करून दाखवलं`

Last Updated: Wednesday, October 24, 2012, 13:03

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीला जे जमलं नाही, ते सेहवाग करून दाखवणार का? याकडेच क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिलेलं आहे.

सेहवागला देशासाठी नीट खेळता येत नाही - धोनी

Last Updated: Sunday, October 14, 2012, 09:23

दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळताना वीरेंद्र सेहवागची बॅट आग ओकते, मात्र संघाकडून देशासाठी खेळताना त्याच्या बॅटमधून धावाच निघत नाहीत.

सेहवाग मुद्दाम खराब खेळला - धोनी

Last Updated: Friday, October 12, 2012, 19:15

सेहवाग मुद्दाम खराब खेळला हे म्हणणं आहे टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याचं. त्यामुळे आता टीम इंडिया दुफळी माजण्याची शक्यता वाढली आहे.

सेहवाग चॅम्पियन लीग टी-२०ला मुकणार

Last Updated: Wednesday, October 3, 2012, 14:39

टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा चॅम्पियन लीग ट्‌वेंटी-२० स्पर्धेत खेळण्याची कमी शक्यता आहे. त्याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याला पुढील दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे. यामुळे चॅम्पियन लीग ट्‌वेंटी-२०मध्ये तो खेळण्याची शक्य‌ता कमीच आहे.

धोनी-सेहवागचं जमेना, टीम इंडिया काही जिंकेना

Last Updated: Sunday, September 30, 2012, 00:02

टी20 विश्‍वचषक क्रिकेट स्‍पर्धेत सुपर 8 फेरीमध्‍ये पाकिस्तानसोबत होणाऱ्या मॅचमध्ये भारताचं काहीही खरं नाही असचं एकूण दिसतं आहे.

धोनी म्हणतो, सेहवाग तू बाहेरच बस...

Last Updated: Friday, September 28, 2012, 19:49

भारताच्या सुपर- ८ मध्ये ऑस्ट्रेलिया सोबत पहिलाच सामना आहे. मात्र या सामन्यात पुन्हा एकदा धडाकेबाज वीरेंद्र सेहवागला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये सेहवाग खेळणार?

Last Updated: Wednesday, September 26, 2012, 14:45

टीम इंडिया आयसीसी टी 20 वर्ल्डकपच्या सुपर-8मध्ये ऑस्ट्रेलियाला टक्कर देण्यासाठी सज्ज झालीय. मात्र, या मॅचच्या अगोदर भारताचा सलामीचा बॅटसमन विरेंद्र सेहवाग याच्या बोटाला जखम झाल्याने त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

बॅटिंगचा कंटाळा येईपर्यंत खेळणार’- सचिन

Last Updated: Thursday, August 30, 2012, 20:39

‘द वॉल’ राहुल द्रविड आणि ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ लक्ष्मणनं क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच पुन्हा एकदा सचिन कधी निवृत्ती घेणार? या प्रश्नावर सचिनसोडून इतरांचा खल सुरू झाला.

भारताची श्रीलंकेवर २१ रन्सनं मात

Last Updated: Tuesday, July 24, 2012, 10:22

भारत आणि श्रीलंका यांच्‍यात वन डे क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिल्‍या वन डेमध्‍ये भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

सेहवागची 'माघार', धोनीच आहे 'शिलेदार'

Last Updated: Saturday, July 7, 2012, 07:28

'वर्ल्डकप धोनीमुळे जिंकलो नाही, तर टीम चांगली होती. आणि त्यामुळेच वर्ल्डकप जिंकलो आहोत.' असं खळबळजनक वक्तव्य करणाऱ्या सेहवागने आता कोलांटउडी मारली आहे. ट्विटरवर ट्विट करून त्याने त्याच्या वक्तव्याबाबत सारवासारव केली आहे.

सचिनचे योग्यवेळी पुनरागमन – सेहवाग

Last Updated: Friday, July 6, 2012, 16:49

श्रीलंकेच्या मालिकेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने विश्रांती घेतली असली तरी, तो योग्यवेळी काही ठराविक मालिकांमध्ये पुनरागमन करेल, असे तडकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने सांगितले आहे.

एकट्या धोनीमुळे वर्ल्ड कप नाही जिंकला- सेहवाग

Last Updated: Friday, July 6, 2012, 16:44

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने पुन्हा एकदा तुफान फटकेबाजी केली आहे. मैदानावर नाही तर मैदानाबाहेर, टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याला विरेंद्र सेहवागने पुन्हा एकदा टार्गेट केलं आहे.

सेहवाग, झहीर करणार टीममध्ये कमबॅक

Last Updated: Tuesday, July 3, 2012, 13:19

श्रीलंकेच्या दौ-यासाठी भारतीय टीममध्ये कोण कोणत्या क्रिकेटपटूंना स्थान मिळणार याबाबत सा-यांना उत्सुकता लागली आहे. एशिया कपनंतर भारतीय टीम पहिल्यांदाच कोणत्याही आंतरराष्ट्रीय दौ-यावर जाणार आहे. वीरेंद्र सेहवाग आणि झहीर खान टीममध्ये कमबॅक करतील तर सचिन तेंडुलकरच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.

धोनीच्या चेन्नईला सेहवागचा दणका

Last Updated: Wednesday, April 11, 2012, 08:22

केव्हिन पीटरसन आणि वीरेंद्र सेहवाग यांची तुफान फटकेबाजी चेन्नई सुपर किंग्जला आसमान दाखविले. आयपीएलचा बादशा म्हणून ओळखणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ वीरेंद्र सेहवागच्या दिल्ली डेअरडेव्हिल्ससमोर दुबला दिसला. प्रथम फलंदाजी करताना खेळाडूंनी नांगी टाकली. दिल्ली डेअरडेव्हिल्स चेन्नई सुपर किंग्जला आठ विकेट्सनी पराभवाचा दणका दिला. चेन्नईचे १११ धावांचे आव्हान दिल्लीने दोन विकेट्स गमावून अवघ्या १३.२ षटकांत पार केले.

विश्रांतीची मीच मागणी केली - सेहवाग

Last Updated: Friday, March 2, 2012, 10:55

आशिया कप क्रिकेट स्पर्धेसाठी विश्रांती देण्याची विनंती मीच निवड समिती आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) केली होती, अशी माहिती सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने गुरुवारी दिली. बीसीसीआयचे न ऐकल्याने भारतीय संघातून बाहेर काढण्यात आल्याची चर्चा सुरू असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सेहवागने ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान, बांगलादेश दौऱ्यासाठी संघात पुनरागमन करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे.

वीरूचा राग 'भारी', BCCI म्हणे बस 'घरी'

Last Updated: Thursday, March 1, 2012, 13:34

वीरेंद्र सेहवाग बीसीसीआयशी नडला म्हणूनच त्याची एशिया कपच्या टीममधून सुट्टी करण्यात आल्याची चर्चा आहे. वीरु-धोनीचे मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर बीसीसीआयनं दोघांना एकत्र मीडियासमोर प्रेसकॉफरन्स करण्यास सांगितलं होतं.

खेळणार सच्चू, सेहवागला डच्चू!

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 15:11

आशिया कपसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खेळणार असून ऑस्ट्रेलियात खराब फॉर्मने झगडत असलेल्या वीरेंद्र सेहवाग याला डच्चू देण्यात आल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.

सचिन, सेहवागला आशिया कपमधून डच्चू?

Last Updated: Monday, February 27, 2012, 16:44

परदेशी जमिनीवर टीम इंडियाची खराब कामगिरी आणि संघातील कुरबुरींच्या बातम्यांमुळे बीसीसीआय कडक पाऊले उचलण्याचे ठरविले आहे. मार्च महिन्यात होणाऱ्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना भारतीय संघातून डच्चू मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

'टीम इंडिया'तील वाद 'रोटेशन पॉलिसी'मुळे

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 18:22

टीम इंडियात वाद फक्त सिनियर्स प्लेअर्सच्या फिल्डिंगबाबत धोनीनं केलेल्या वादग्रस्त विधानामुळेच नाही तर रोटेशन पॉलिसीवरूनही आहे. वीरूनं धोनीच्या रोटेशन पॉलिसवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय.

धोनी, सेहवागचा वाद चव्हाट्यावर

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 10:53

भारताचा सुरू असलेला ऑस्ट्रेलिया दौरा भारताला काही फलदायी ठरत नाहीये असचं दिसतं आहे. लागपोठ दोन वनडे मॅचमध्ये पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.

वीरेंद्र सेहवाग मैदानाबाहेर

Last Updated: Saturday, February 18, 2012, 14:24

टीम इंडियाचा सलामीवीर वीरेंद्र सेहवाग रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळणार नाही. दुखापतीमुळे सेहवागने या सामन्यातून माघार घेतली आहे.

भारताला पहिला धक्का, सेहवाग बाद

Last Updated: Wednesday, February 1, 2012, 17:27

भारत - ऑस्ट्रेलिया पहिल्या टी-२० मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतासमोर १७२ रनचं आव्हान ठेवलं मात्र सुरवातीलाच भारताला पहिला धक्का बसला आहे. गंभीर सोबत ओपनिंगला आलेल्या सेहवागला ब्रेट लीने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

धोनीची जाणार कप्तानी, सेहवागची वर्णी!

Last Updated: Sunday, January 29, 2012, 19:25

ऑस्ट्रेलियात टीम इंडियाची अक्षरश: धूळधाण उडाली, ऑस्ट्रेलियात व्हाईट वॉश मिळाल्याने कॅप्टन महेंद्रसिंह धोनीची कॅप्टनशीप धोक्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या टेस्ट सीरीजमध्ये ४-० ने हारल्याने टीम आणि कॅप्टन धोनी यांना टीकेला समोरं जावं लागत आहे.

सेहवाग बाद, सचिन मैदानात

Last Updated: Tuesday, December 27, 2011, 12:06

पॅटिन्सनने सेहवागला ६७ रन्सवर क्लीन बोल्ड केलं आहे. त्यामुळे द्रविडला साथ द्यायला आता मास्टर ब्लास्टर सचिन मैदानात उतरला आहे. द्रविडच्या २५ रन्स झालेल्या आहेत.

कॅप्टन धोनी खूश हुआ!!!!!!

Last Updated: Saturday, December 10, 2011, 10:15

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीला तर सेहवाग वन-डेमध्ये नक्कीच डबल सेंच्युरी झळकावेल असा विश्वास होता. आणि सेहवागनेही त्याचा हा विश्वास खरा ठरवला आहे.

सेहवागला २५ लाखांचे बक्षीस!

Last Updated: Friday, December 9, 2011, 15:29

आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये २०० धावांचा टप्पा ओलांडणाऱ्या विक्रम’वीर’ वीरेंद्र सेहवागवर देशभरातून आणि जगभरातल्या क्रिकेट वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत असताना, दिल्ली क्रिकेट मंडळानं २५ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय.

वीरू ठरला उन्नीस नंबरी!!!!

Last Updated: Friday, December 9, 2011, 14:14

इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर वीरेंद्र सेहवाग नावाचं वादळ चांगलच घोंगावलं. वीरुच्या तडाख्यामध्ये विंडिज बॉलर्स चांगलेच सापडले.

सचिनचा विक्रम मोडल्याचा आनंद- सेहवाग

Last Updated: Thursday, December 8, 2011, 17:44

विक्रमादित्य सचिन तेंडुलकर याचा वन डेतील विश्वविक्रम मोडीत काढल्यामुळे नजफगडचा नवाब वीरेंद्र सेहवाग जबरदस्त खूष आहे. वीरेद्र सेहवागने इंदूरमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध विश्वविक्रमी २१९ धावांची खेळी केली.

गुरूवर भारी पडला वीरू, विश्वविक्रमी द्विशतक

Last Updated: Thursday, December 8, 2011, 17:54

२३ खणखणीत चौकार आणि ७ उत्तुंग षटकारांच्या मदतीने केलेल्या धडाकेबाज फलंदाजी करत नजफगडचा नवाब वीरेंद्र सेहवागने द्विशतकी खेळी करून विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा वन डेतील विक्रम मागे टाकला.

वीरू-गौतीची आक्रमकता लोप

Last Updated: Saturday, December 3, 2011, 09:59

वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर ही दिल्लीकर जोडी पहिल्या दोन वन-डेमध्ये प्रतिभेला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरली आहे.

पहिली वन-डे आज कटकच्या मैदानात...

Last Updated: Tuesday, November 29, 2011, 03:07

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामधील पहिली वन-डे मॅच कटकमध्ये आज रंगणार आहे. वीरेंद्र सेहवाग या नव्या कॅप्टनच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया विंडिजशी मुकाबला करणार आहे.

धोनीला नाही विश्रांती, हरभजनची गच्छंती

Last Updated: Sunday, October 9, 2011, 14:23

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या १४ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील दोन सामन्यांमधून फिरकी गोलंदाज हरभजनसिंगला दुखापतीमुळे