कार्बनचा ‘टायटॅनियम एस 9 लाईट’ लॉन्च...

Last Updated: Tuesday, June 24, 2014, 10:06

भारतीय मोबाईल कंपनी कार्बननं आपला एक नवीन स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन बाजारात उतरवलाय.

वेलकम सुनिल... कपिलची ‘गुत्थी’ सुटली!

Last Updated: Thursday, May 29, 2014, 18:10

हास्य कलाकार कपिल शर्मा याच्यासोबत पुन्हा एकदा काम करण्याची इच्छा त्याचा एकेकाळचा सहकलाकार सुनिल ग्रोवर यानं बोलून दाखवलीय... ही माहिती खुद्द कपिलनंच दिलीय.

पाकिस्तानी महिलेनं भारतात दिला बाळाला जन्म, अन्...

Last Updated: Wednesday, April 30, 2014, 22:58

पाकिस्तानी नागरिक असलेल्या एका महिलेनं तिच्या मुलाला भारताच्या भूमिवर जन्म दिला. पण, पाकिस्ताननं मात्र कागदपत्रांची मागणी करत या नवजात बालकाला पाकिस्तानात येण्यास बंदी घातलीय. यामुळे या महिलेवर मोठं संकटच कोसळलं.

पाहा, हे आहेत काळ्या धनाचे 'ते' १८ मालक!

Last Updated: Tuesday, April 29, 2014, 20:43

तीन वर्ष नकार देत देत सरते शेवटी केंद्र सरकारनं आज १८ लोकांची नावं सुप्रीम कोर्टासमोर सादर केलीत. या १८ जणांनी कथित रुपात जर्मनीच्या लिशटेन्सटाईनमध्ये एलएसटी बँकेत आपल्याकडचं काळधन जमा करून ठेवल्याचं म्हटलं गेलंय. या सर्वांच्या विरोधात आयकर विभागानं खटला दाखल केलाय.

आयपीएल ७: उद्घाटन `यूएई`त, सामने बांग्लादेशात, फायनल भारतात!

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 17:41

भारतात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर बीसीसीआयनं आयपीएलच्या सातव्या सीझनसाठी पहिला पर्याय म्हणून युएईवर शिक्कामोर्तब केलं आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये १६ एप्रिलला या स्पर्धेचं उद्घाटन होईल आणि १ जूनला भारतात आयपीएल-७ चा समारोप होईल, असं संयोजकांनी जाहीर केलंय.

मॅड इन इंडियामध्ये दिसणार `अभि-अॅश`?

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 15:39

अगोदर गुत्थी बनून प्रेक्षकांकडून वाहवा लुटल्यानंतर आता कॉमेडीयन सुनील ग्रोवर आपल्या `मॅड इन इंडिया`मधून `चुटकी`च्या रुपात सगळ्यांना हसवाया प्रयत्न करतोय.

किंमत घटल्यानंतर `ब्लॅकबेरी Z-१०`चा स्टॉकच संपला

Last Updated: Tuesday, March 4, 2014, 20:04

`ब्लॅकबेरी`च्या झेड १० मोबाईल फोनचा स्टॉकच संपुष्टात आलाय. कंपनीनं या फोनची किंमत दोन टप्प्यांत जवळजवळ ६० टक्क्यांनी कमी केली होती.

भारतीय चलनात कागदाऐवजी प्लास्टिक नोटा

Last Updated: Friday, February 7, 2014, 21:41

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार १० रूपयांच्या प्लास्टिक नोटा जूननंतर चलनात येणार आहेत. २०१४ च्या उत्तरार्धात या नोटांचे फिल्ड परीक्षण होणार आहे. कोच्ची, म्हैसूर, शिमला, जयपूर, भूवनेश्वर या शहरात प्लास्टिकच्या नोटा सर्वात आधी परीक्षणासाठी चलनात आणल्या जातील.

मोटोरोलाचा `मोटो G` आज भारतात लॉन्च!

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 12:23

भारताच्या टेक मार्केटमध्ये धमाका करायला मोटोरोलाचा मोटी जी सज्ज आहे. आज भारतात `मोटो जी` लॉन्च होतोय. आपल्या बजेटमध्ये स्मार्टफोन अशी `मोटो जी`ची लाईन ठेवण्यात आलीय. फ्लिपकार्ट या वेबसाईटवर दोन आठवड्यांपूर्वी याची जाहिरात करण्यात आलीय.

नववर्षात भारतात धडकणार नवा स्मार्टफोन ‘मोटो जी’!

Last Updated: Monday, December 30, 2013, 19:04

नववर्षात भारतात आणखी एक स्वस्त स्मार्टफोन येणार आहे. मोटोरोलाचा ‘मोटो जी’ हा फोन जानेवारीत भारतात लान्च होतोय. त्यामुळं भारतीय गॅझेटप्रेमींसाठी ही एक नव्या वर्षाची भेट असण्याची शक्यता आहे.

सोने-चांदीच्या दरात तेजीनंतर घसरण

Last Updated: Wednesday, October 23, 2013, 13:08

सलग दोन दिवस तेजीत असलेला सोन्याचा भाव मंगळवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात ३४० रूपयांच्या घसरनीसह ३१ हजार ६२५ रूपये प्रति तोळा होता. सोन्याबरोबरच चांदीचा भाव ३४० रूपयांनी कमी होऊन तो प्रति किलो ४९ हजार १० हजार रूपयांवर बंद झाला. तर मुंबईत सोमवारी सोन्याच्या किंमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली. प्रति तोळा २९,७३७ रूपये होता.

बॉम्ब घडविण्याची प्रेरणा हॉलिवूड चित्रपटांमुळे - यासिन भटकळ

Last Updated: Friday, September 27, 2013, 18:10

मला बॉम्ब घडविण्याची प्रेरणी ही चित्रपटाच्या माध्यमातून मिळाली आहे. हॉलिवूडमधील चित्रपटातील बॉम्ब स्फोट दृश्यांच्यामाध्यमातून प्रेरणा घेतल्याची कुबली आंतरराष्ट्रीय दहशतवादी यासिन भटकळ यांने दिली आहे.

पाहा... कल्की म्हणतेय, मुलीच आहेत बलात्काराला जबाबदार!

Last Updated: Wednesday, September 25, 2013, 14:48

डिसेंबर २०१२ मध्ये दिल्लीमध्ये पॅरामेडिकल विद्यार्थीनीवर झालेल्या गँगरेपनंतर साऱ्या देशानं अशा कृत्यांचा धिक्कार केला. पण, आत्तापर्यंत काही देशात होणाऱ्या बलात्काराच्या घटना कमी झालेल्या नाहीत

भारतीय विद्यापीठांची बेअब्रू

Last Updated: Wednesday, September 11, 2013, 22:32

भारतातील शिक्षण पद्धती किती रसातळाला गेलीय, याचा प्रत्यय नुकताच आलाय... जगातील `टॉप 200` विद्यापीठांच्या यादीमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश झालेला नाही. क्यूएस वर्ल्ड युनिवर्सिटी रँकिंगमध्ये हा धक्कादायक निष्कर्ष समोर आलाय...

गुगलचं भारतीयांना आव्हान...

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 12:09

गुगलनं चक्क भारतीयांना एक आव्हानच दिलंय. हे आव्हान पेलण्याची जबाबदारी सोपवलीय भारतात कोणत्याही ठिकाणी कार्यरत असणाऱ्या `ना नफा` तत्वावर चालणाऱ्या संस्थांकडे...

सोने पुन्हा घसरले, भाव २५च्या घरात येणार!

Last Updated: Thursday, June 27, 2013, 08:38

सोने दर अचानक घसल्यानंतर सोने दराला मध्यंतरी चढण लागली होती. मात्र, पुन्हा सोने दरात घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव आता २६ हजारांच्या घरात आलाय. हा दर २५,०००च्या घरात येण्याची शक्यता आहे.

पहा काय आहेत दर : सोनं-चांदी (शहरानुसार)

Last Updated: Saturday, June 8, 2013, 10:59

सोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने खरेदीत घट होण्याची शक्यता आहे.

`ब्लॅकबेरी क्यू-१०` भारतात लॉन्च...

Last Updated: Thursday, June 6, 2013, 16:53

ब्लॅकबेरीनं आपला नवीन स्मार्टफोन ब्लॅकबेरी ‘क्यू-१०’ भारतात लॉन्च केलाय. या फोनची किंमत भारतात ४४,९९० रुपये जाहीर करण्यात आलीय.

पहा सोनं-चांदी आजचे दर: (शहरानुसार)

Last Updated: Saturday, June 1, 2013, 13:04

सोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने खरेदीत घट होण्याची शक्यता आहे.

सोने-चांदी दरात पुन्हा घट

Last Updated: Thursday, May 16, 2013, 19:02

सोने दरात पुन्हा घरसरण पाहायला मिळाली. प्रति तोळा ( दहा ग्रॅम) पाचशे रुपयांनी सोने उतरले आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीने या महिन्यातील नीचांक गाठलाय. तर चांदीच्या दरात एक हजार रूपयांनी घट झाली.

सोनं-चांदी दर आजचे (शहरानुसार)

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 12:17

सोन्यांच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा थोड्य प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीत घट होण्याची शक्यता आहे.

सोने २४,०००वर येणार, तीन कारणे?

Last Updated: Wednesday, April 17, 2013, 20:22

सध्या सोन्याच्या दरात कमालीची घट होत आहे. प्रतितोळा २४,००० रूपये (दहा ग्रॅम) सोने होण्याची शक्यता आहे. याची तीन काय आहेत कारणे?

सोनेरी घसरण!

Last Updated: Monday, April 15, 2013, 23:35

सोन्याची अंगठी... ब्रेसलेट...सोन्याचा हार... असा सोन्याचा एखादा दागिना खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल तर आता तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे...

सोने-चांदीमध्ये मोठी घसरण

Last Updated: Monday, April 15, 2013, 12:50

सोने खरेदी करणा-या इच्छुकांसाठी खुशखबर. सोन्याच्या किंमतीत आणखीन घट झालीये. सोनं प्रतितोळा २८ हजार ३०० रुपयांवर आलयं.

भारत-पाकिस्तानात होळीचा उत्साह...

Last Updated: Wednesday, March 27, 2013, 13:47

देशात सर्वत्र धुळवडीची धूम आहे. काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत होळीचा उत्साह दिसून येतोय. हाच उत्साह भारताच्या सीमा ओलांडत पाकिस्तानातही दिसत आहे.

गुड न्यूज... पेट्रोल २ रुपयांनी स्वस्त

Last Updated: Friday, March 15, 2013, 19:48

देशातील तेल वितरक कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीत २ रुपयांनी घट करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मध्यरात्रीपासून या ही दरकपात लागू होणार आहे.

बाजारात आला ब्लॅकबेरी झेड-10, किंमत ४३,४९०

Last Updated: Monday, February 25, 2013, 21:26

ब्लॅकबेरीने आपला बहुप्रतिक्षेत असलेला स्मार्टफोन झेड १० सोमवारी भारतात लॉन्च केला. भारतात या फोनची किंमत ४३,४९० रुपये आहे. कंपनीने या फोनमध्ये आपल्या ब्लॅकबेरी -१० या ऑपरेटिंग सिस्टिमचा वापर केला आहे.

कडक सुरक्षेत पाकची महिला क्रिकेट टीम भारतात दाखल

Last Updated: Tuesday, January 29, 2013, 16:49

कडक पोलीस सुरक्षेत पाकिस्तानी महिला क्रिकेट टीम आयसीसी वर्ल्डकपसाठी भुवनेश्वरमध्ये दाखल झाली. त्यानंतर ही टीम कटकसाठी रवाना झाली. मुंबई होणारे सामने आता मुंबईऐवजी कटकमध्ये आयोजित करण्यात आलेत.

सोनं महागलं... आयात करात वाढ!

Last Updated: Tuesday, January 22, 2013, 08:12

महागाईच्या जमान्यात मन खट्टू करणारी आणखी एक बातमी... सोनं खरेदी करणं दिवसेंदिवस सामान्यांच्या अवाक्याबाहेर चाललंय. आता, सोन्यावरचं आयात शुल्क वाढवण्यात आलंय त्यामुळे सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ झालीय

`हज हाऊस`साठी `रिपाइं` मैदानात

Last Updated: Tuesday, December 18, 2012, 22:06

औरंगाबादेत आज हज हाऊसच्या प्रश्नाने आक्रमक वळण घेतलं. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेत मुस्लिम संघटनाचं ‘हज हाऊस’साठी आंदोलन सुरु आहे. त्यात आता आरपीआयने उडी घेतली आहे.

मी स्वतःला भाग्यशाली समजतेः सनी लिऑन

Last Updated: Friday, December 14, 2012, 18:06

भारतीय मुळाची कॅनडा फिल्म अभिनेत्री सनी लिऑनला भारतात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च झाल्याबद्दल स्वतःबद्दल गर्व वाटतो आहे.

आंद्रे आगासी पहिल्यांदाच होतोय भारतात दाखल

Last Updated: Tuesday, December 11, 2012, 11:03

टेनिसपटू आंद्रे आगासी आज पहिल्यांदाच भारतात येतोय. पण, ही भेटदेखील अगदी छोटीशी आणि खाजगी असणार आहे. त्यामुळे त्याच्या भारतीय चाहत्यांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे.

`आय ट्यून` आणि `ट्यून स्टोअर्स` भारतात दाखल

Last Updated: Wednesday, December 5, 2012, 10:11

अॅपलची उत्पादनं वापरणाऱ्यांना इतर कंपन्यांची उत्पादनं तेवढी जवळची वाटत नाहीत. याच आपल्या ग्राहकांना खूश करण्यासाठी आता अॅपल आय ट्यूनच्या माध्यमातून गाणंदेखील गाणार आहे.

`एफडीआय`च्या मुद्यावर सरकार पास होणार?

Last Updated: Wednesday, December 5, 2012, 09:38

रिटेल ‘एफडीआय’च्या विषयावर आज सरकारची परीक्षा आहे. पण इतर देशांत याच रिटेल एफडीआयची परिस्थिती काय आहे. रिटेल एफडीआयमुळे त्या देशांचा विकास झालाय की उलटा परिणाम झालाय… याच संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट...

‘लाईफ ऑफ पाय’नं जमवला १९.५ कोटींचा गल्ला

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 10:34

ऑस्कर पुरस्कार विजेत्या ‘लाईफ ऑफ पाय’ या सिनेमानं भारतातल्या थिएटर्सच्या गल्ल्यावर पहिल्याच आठवड्यात आपला जम बसवलाय. आत्तापर्यंत या सिनेमानं तब्बल १९.५ करोड रुपयांची कमाई केलीय.

आकाश - २ `चायना माल`?

Last Updated: Saturday, November 24, 2012, 21:19

जगातला सगळ्यात स्वस्त टॅबलेट म्हणून आकाश-२ चा बराच बोलबाला झाला. पण, याच ‘आकाश – टू’बद्दल सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देईल, असा एक नवा खुलासा झालाय.

म्यानमारच्या नेत्या सू की दिल्लीत दाखल

Last Updated: Tuesday, November 13, 2012, 17:30

म्यानमारच्या विरोधी पक्षाच्या नेत्या आंग सान सू की अनेक वर्षांनंतर आज दिल्लीत दाखल झाल्यात. म्यानमारमध्ये लोकशाही आणि बहुपक्ष राजकीय प्रणाली लागू करण्यासाठी गेली कित्येक वर्ष झटत आहेत.

आला रे आला आयफोन ५ आला

Last Updated: Saturday, November 3, 2012, 12:17

अॅपलचा बहुचर्चित आयफोन 5 आज भारतात दाखल झाला. अमेरिका-युरोपमध्ये झालेल्या भव्य स्वागतानंतर आता त्याचं भारतात लाँचिंग झालं. अॅपल

वर्ल्ड बँक म्हणते `भारतापेक्षा पाकिस्तान बरं!`

Last Updated: Wednesday, October 31, 2012, 07:25

सध्याच्या परिस्थितीत भारतात उद्योग करणे कठीण असल्याची टिप्पणी जागतिक बँकेच्या एका अभ्यासगटानं केलीये. वर्ल्ड बॅंक आणि आयएफसीच्या अभ्यासाचा हा निष्कर्ष आहे. 185 देशांमध्ये सर्वेक्षण केलं असता भारताचा क्रमांक 132 वा आहे.

दिएगो मॅरेडोना भारतात!

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 14:14

अर्जेंटीनाचा माजी स्टार फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना भारतात दाखल झालाय. दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेला मॅरेडोना प्रथम कोच्चीमध्ये दाखल झालाय.

गॅस सिलेंडरचे दर पुन्हा भडकणार

Last Updated: Saturday, October 6, 2012, 17:01

घरगुती गॅस सिलिंडरचे भाव आणखी वाढणार आहेत. घरगुती सिलिंडरच्या किमतीत ११ रुपये ४२ पैशांनी वाढ होणार आहे. डिलर्सच्या कमिशनमध्ये तब्बल ४४ टक्क्यांची वाढ झाल्यानं ही दरवाढ होतेय.

पेट्रोल दोन रूपयांनी स्वस्त?

Last Updated: Friday, September 28, 2012, 15:33

महागाईच्या खाईत लोटलेल्या जनतेला थोडासा दिलासा देणारी बातमी आहे. पेट्रोलचे दर दोन रूपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. याबाबतचा निर्णय दोन दिवसात होण्याची शक्यता आहे.

ममतांनी काढला केंद्र सरकारचा पाठिंबा

Last Updated: Tuesday, September 18, 2012, 20:56

इंधन दरवाढ आणि एफडीआयच्या मुद्याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक पाऊल न उचलल्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आज केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवारी तृणमूल काँग्रेसचे सर्व सहा मंत्री राजीनामे देणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी आज कोलकत्यात सांगितले.

‘फास्ट फूड’ आऊटलेट जोरात...

Last Updated: Saturday, September 8, 2012, 14:09

एक काळ असा होता की हॉटेलात खाणं म्हणजे चैन समजली जायची. आता मात्र बाहेर खाणं आपल्या आयुष्याचा एक भाग होत चाललयं.

फक्त १५० रूपयात घुसखोरी होईल...

Last Updated: Sunday, August 26, 2012, 23:27

एका बांगलादेशी नागरिकाला भारतात घुसखोरी करण्यासाठी किती पैसे लागतात? फक्त १५० रूपये.केवळ दीडशे रुपयांत भारतात एन्ट्री मिळते.

पाकमधील हिंदू कुटुंबांची भारताकडे धाव...

Last Updated: Friday, August 17, 2012, 09:19

पाकिस्तानात आतंकवादाच्या छायेत जगणाऱ्या हिंदूंनी मायदेशाची वाट धरलीय. गुरुवारी ११८ हिंदूंनी समझोता एक्सप्रेसनं भारतात प्रवेश केलाय.

'वेल डन सायना', दिल्लीत जंगी स्वागत!

Last Updated: Tuesday, August 7, 2012, 12:10

लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला ब्राँझ मेडलची कमाई करून मायदेशी परतलेल्या बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे दिल्ली एअरपोर्टवर जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

पाकला भारतात थेट गुंतवणुकीची परवानगी

Last Updated: Thursday, August 2, 2012, 08:34

भारत सरकारने पाकिस्तानाला भारतीय व्यापारात गुंतवणूक करण्याची मुभा दिली आहे. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत आणि पाकिस्तानाकडून भारताला सर्वांत प्रिय राष्ट्र (MFN) दर्जा मिळावा, या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.

भारत बनतोय 'टेक्नोसॅव्ही'

Last Updated: Sunday, July 29, 2012, 20:06

इंटरनेट आणि मोबाईलच्या वापरात भारतानं आघाडी घेतली आहे. फेसबूकवर भारतीयांची संख्या जवळपास 5 कोटी 10 लाखांच्या घरात पोहोचली आहे. तर दुसरीकडे 921 मिलियन म्हणजेच 92 कोटी 10 लाख भारतीय मोबाईल वापरत असल्याची माहिती समोर आली आहे.

समीकरण... लग्नाचं आणि आत्महत्येचं

Last Updated: Thursday, July 5, 2012, 13:00

जर तुम्हाला असं वाटत असेल की, पतीपासून विभक्त झालेल्या, विधवा किंवा एकट्या राहणाऱ्या महिला आत्महत्येच्या मार्गावर असतात, तर तुम्ही साफ चुकीचे आहात. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय गुन्हेगारी अहवालानुसार, अशा महिलांचं प्रमाण हे विवाहित महिलांच्या प्रमाणापेक्षा कित्येक पटीनं कमी आहे.

स्त्रीचा सर्वाधिक अपमान; त्यात भारत महान

Last Updated: Thursday, June 14, 2012, 16:15

भारतात महिलांना देण्यात येणारा दर्जा हा नेहमीच वादाचा विषय असतो. पण, आता विषयावर अभ्यास करून बोलणारे कमीच! लंडनमधल्या थॉमसन रॉयटर्स प्रतिष्ठाननं जगातील काही विकसित आणि विकसनशील अशा १९ देशांतील महिलांच्या स्थितीबद्दल एक सर्वेक्षण केलं. यामध्ये भारताला सर्वात शेवटचा म्हणजेच १९वा क्रमांक मिळालाय.

Exclusive - Welcome युवी!

Last Updated: Tuesday, April 10, 2012, 15:47

अबू सालेम भारताकडेच राहणार

Last Updated: Monday, March 19, 2012, 15:21

अबू सालेमच्या प्रत्यार्पणाचा निर्णय रद्द करण्याला पोर्तुगालच्या घटनात्मक कोर्टानं कोर्टानं स्थगिती दिली आहे. अबू सालेमचं प्रत्यार्पण रद्द करण्याचा निर्णय पोर्तुगालच्या सुप्रीम कोर्टानं दिला होता.

अॅडलेड टेस्ट दुसऱ्या दिवसअखेर इंडिया ६१/२

Last Updated: Wednesday, January 25, 2012, 13:06

अॅडलेड टेस्टच्या दुसऱ्या दिवशी आज टीम इंडियाने दिवसअखेर ६१ रन्स करून २ विकेट गमावल्या. गौतम गंभीर ३० आणि सचिन तेंडुलकर १२ रन्सवर खेळत आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या अजूनही ५४३ रन्सने पिछाडीवर आहे.

थंडीने केला कहर, ३९ बळी

Last Updated: Tuesday, December 20, 2011, 06:42

थंडीने आता हळूहळू आपला रंग दाखवण्यास सुरवात केली आहे. उत्तरोत्तर थंडीचा कडाका हा वाढतच चालला आहे. त्यामुळे थंडीमुळे सगळे जास्तच गारठले आहेत. थंडीचा वाढत्या तडक्यामुळे जवळजवळ ३९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

तरुणांची आत्महत्त्या : एक जागतिक समस्या

Last Updated: Tuesday, December 13, 2011, 13:14

मानसिक ताणतणाव आणि आत्महत्या करण्याची प्रवृत्ती भारतीय तरुणाईसाठी घातक ठरु लागली आहे. अन्य कोणत्याही रोगापेक्षा आत्महत्या करून जीवन संपवणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. गेल्या १० वर्षात वर्षातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी मोठी धक्कादायक आहे.

वेस्ट इंडिजला लोळवलं

Last Updated: Thursday, November 17, 2011, 08:18

दुसऱ्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजने सुरवातीला केलेल्या चिवट फलंदाजीनंतर मात्र वेस्ट इंडिजचा डाव गडगडला. इंडियन बॉलर्सने पुन्हा एकदा कमाल केली. त्याच्या बॉलिंगपुढे पुन्हा एकदा विंडीज बॅट्समन्सनी नांगी टाकली.

सचिन, सेहवागचे आगमन, भज्जीला डच्चू!

Last Updated: Saturday, October 29, 2011, 07:08

वेस्ट इंडिज विरोधातील टेस्ट सिरिजच्या पहिल्या मॅचसाठी टीम इंडिया जाहीर झाली असून या संघात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांचे पुनरागमन झाले आहे.

F1ची भरारी, भारताच्या 'ट्रॅक'वरी !!!

Last Updated: Friday, October 28, 2011, 08:50

फॉर्म्युला वन म्हणजे वेगाचा उत्सव, घड्याळ्याच्या काट्याशी स्पर्धा करण्याची सवय ज्यांना आहे अशा व्यक्तींमध्ये हा प्रकार चांगलाच लोकप्रिय आहे. या स्पर्धेत सहभागी होणा-या ड्रायव्हर्सना अनेकदा गंभीर दुखापतीही झाल्यात. मात्र तरीही या खेळाबद्दलची त्यांची क्रेझ जराही कमी झालेली नाही. आता भारतीय फॅन्सनाही हा वेगाचा थरार प्रत्यक्ष अनुभता येणार आहे.