रेल्वे प्लॅटफॉर्म अंतराचा आणखी एक बळी, अधिकाऱ्याचाच मृत्यू

Last Updated: Friday, May 9, 2014, 11:43

रेल्वे प्लॅटफॉर्म आणि ट्रेन यांच्यात असलेल्या जास्त अंतरानं आणखी एक बळी घेतलाय. पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्टेशनवर हा अपघात झालाय. यात रेल्वेचे असिस्टंट स्टेशन मास्तर आशिष कुमार चौधरी यांचा मृत्यू झालाय

अंत्ययात्रेवर मधमाशांचा हल्ला, १०० जणांना चावा

Last Updated: Wednesday, February 26, 2014, 17:51

बुलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात वडगाव वान या गावातल्या एका अंत्ययात्रेवर जवळजवळ ३०० जणांवर मधमाशांनी भयंकर असा हल्ला केला.

चांगला रस्ता दाखवा, पाच लाख रुपये मिळवा!

Last Updated: Monday, July 22, 2013, 21:01

नाशिक शहरात आता चांगला रस्ता दाखवा आणि पाच लाख रुपये मिळवा, अशी घोषणा माजी महापौर दशरथ पाटील यांनी केली आहे.

औरंगाबादमध्ये निम्मे पेट्रोल पंप ड्राय!

Last Updated: Monday, May 27, 2013, 19:01

औरंगाबादमधले निम्मे पेट्रोलपंप ड्राय झाल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. शहरात 60 पेट्रोलपंप आहेत. त्यातल्या 23 पेक्षा जास्त पंपांवर नो स्टॉकच्या पाट्या झळकल्या आहेत.

शहरांमध्ये वाढतंय नैराश्य...

Last Updated: Wednesday, April 3, 2013, 10:49

कामाचा ताण, सुपरफास्ट लाईफ, प्रदूषण, वाढती महागाई आणि त्यात जगण्याची धडपड... या सगळ्याचा ताण-तणावाचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर आता स्पष्टपणे दिसून येतोय. तसंच यामुळे नैराश्यातही वाढ झालेली आढळून आलीय.

पाण्यासाठी नाशिककर रस्त्यावर!

Last Updated: Wednesday, March 6, 2013, 20:08

नाशिकच्या पाखलरोड, अशोका मार्ग परिसरातले शेकडो नागरिक आज पाण्यासाठी रस्त्यावर उतरले. वर्षभरापासून कमी दाबानं पाणी येतंय. त्यात गेले आठ पंधरा दिवसांपासून फक्त दहा ते पंधरा मिनीटंच पाणी येतंय.

नवा बिझनेस- भाड्याने बॉयफ्रेंड!

Last Updated: Sunday, January 20, 2013, 23:50

आजच्या काळात करिअरमध्ये गुरफटून गेलेल्या तरूण पीढीला लग्न संसारासाठी वेळच नसल्याचं दिसू लागलंय. त्यातही एकटं राहून नैराश्य येऊ लागलेल्या तरुणांची संख्या वाढू लागली आहे. चीनसारख्या देशाने याचाही वापर करून नवा बिझनेस सुरू केला आहे. एकटं आणि अविवाहीत तरुण वर्गासाठी भाड्याने बॉयफ्रेंड पुरवण्याचा नवा बिझनेस सुरू होत आहे.

मध आरोग्यासाठी लाभदायी आहे का?

Last Updated: Tuesday, January 1, 2013, 13:25

आपल्या शरीराचे आरोग्य चांगले आणि उत्तम तसेच निरोगी ठेवण्याचे काम मध करते. त्यामुळे आयुर्वेदात मदाला अमृत म्हटले जाते. मध प्राशन केल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.

कामरान अकमल नडला, ईशांत शर्मा भिडला

Last Updated: Wednesday, December 26, 2012, 20:02

पहिल्या टी-२० मॅचमध्ये पाकिस्ताननं बाजी मारली. या मॅचमध्येही भारत-पाकिस्तान मधली टशन दिसून आली. टीम इंडियाचा ईशांत आणि पाकिस्तानचा कामराननं एकमेकांना खुन्नस दिली.

गोव्यात ख्रिसमसची धूम

Last Updated: Tuesday, December 25, 2012, 08:19

मध्यरात्रीच्या मिडनाईट मासनं आज ख्रिसमसच्या जल्लोषाला सुरुवात होणार आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्मसोहळ्याच्या या उत्सवासाठी गोव्यातले सर्व चर्च सज्ज झालेत. आकर्षक रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाईनं न्हाऊन निघालेले चर्च नाताळाच्या स्वागतासाठी उत्सुक झाले आहेत.

उदंड जाहली स्मारके!

Last Updated: Monday, December 24, 2012, 20:31

नाशिकमध्येच नव्हे तर राज्य पातळीवर सध्या थोर पुरुषांच्या स्मारकांची मागणी होऊ लागली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकापासून सुरु झालेली ही मागणी आता महात्मा फुलेंच्या स्मारकाच्या मागणीपर्यंत येवून ठेपली आहे.

औरंगाबादमध्ये घरफोड्या

Last Updated: Monday, December 24, 2012, 18:13

औरंगाबादेत सध्या पोलिसांचं राज्य आहे की चोरट्यांचं असा प्रश्न उभा राहिलाय. कारण गेल्या तीन दिवसांत तीन वेगवेगळ्या ठिकाणी दिवसाढवळ्या घरफोड्या झाल्या आहेत.

राष्ट्रवादीची कॉलेजपातळीवरही टगेगिरी, केला गोळीबार

Last Updated: Sunday, December 23, 2012, 17:25

राजकीय पक्षांमधील वैमनस्य हे कौटुंबिक पातळीवरही पोहोचू लागल्याचं कोल्हापूरमधील एका घटनेमध्ये दिसून आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांचा मुलगा युद्धवीर गायकवाड याने ज्येष्ठ भाजप नेते रामभाऊ चव्हाण यांचा नातू प्रसाद याच्या गाडीवर गोळी झाडली.

गँगरेपमधील आरोपींना अटक, तरूणी गंभीर जखमी

Last Updated: Tuesday, December 18, 2012, 13:29

रविवारी रात्री दिल्लीत सर्वत्र थंडीचा कडाका,शांतता पसरली होती...दिल्लीकर झोपण्याच्या तयारीत होते..त्याचवेळेस एक असहाय्य महिला जिवाच्या आकांतानी ओरडत होती, मदतीची याचना करत होती.

कोल्हापूरमध्ये अनोख्या पणत्या

Last Updated: Thursday, November 8, 2012, 22:16

दिवाळ सणासाठी कोल्हापूरनगरी सज्ज झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात इतर साहित्यासह सध्या नावीन्यपूर्ण आणि आकर्षक पणत्याही उपलब्ध आहेत. पण दिसायला अधिक आकर्षक, टिकाऊ आणि न गळणाऱ्या पणत्या बाजारात मिळाल्या तर?.... कोल्हापूरातील अशा पणत्या उपलब्ध आहेत

मालाडमध्ये वृध्द महिलेची हत्या

Last Updated: Monday, November 5, 2012, 16:04

मुंबईत मालाडमध्ये एका वृद्ध महिलेची हत्या झालीय. मालाडच्या मोहन कॉलनीत ही घटना घडलीय. निर्मला व्होरा असं या महिलेचं नाव असून चोरीच्या उद्देशानं त्यांची हत्या झाल्याचा संशय आहे.

कुडनकुलम अणुप्रकल्पाविरोधात समुद्रात आंदोलन

Last Updated: Thursday, September 13, 2012, 17:45

तामिळनाडुतल्या कुडनकुलममधल्या अणुप्रकल्पाविरोधात इथल्या नागरिकांनी जल आंदोलन सुरू केलं आहे. अणूप्रकल्पापासून चार किलोमीटर अंतरावर समुद्रात हे आंदोलन सुरू आहे.

शेतकऱ्यांनं बनवलेल्या पेरणी यंत्राची करामत!

Last Updated: Friday, August 17, 2012, 14:07

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातल्या अंदरसूलच्या ज्ञानेश्वर जाधव यांनी उपयुक्त असं खत पेरणी यंत्र तयार केलंय. मका, कपाशीसारख्या पिकांना याचा मोठा फायदा होतो.

मुंबईच्या रस्त्यावरही धर्मांधांचं आव्हान!

Last Updated: Monday, August 13, 2012, 16:02

मुंबईतल्या रस्त्यांवर पाकिस्तानप्रमाणे धर्मांध मुस्लिम उतरल्याचं चित्र पुन्हा एकदा दिसलं. धर्मांध मुस्लिमांनी थेट पत्रकार आणि पोलिसांवरच हल्ला चढवला. आसाम आणि म्यानमारमधल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी हजारो मुस्लिम आझाद मैदानात जमा झाले होते. मात्र त्यांना फक्त निषेधच करायचा होता, असं नव्हतं. त्यांच्या हिंसक कृतीतून ते स्पष्ट झालं.

नाशिकमधील हॉस्पिटलांनाच उपचाराची गरज

Last Updated: Saturday, August 11, 2012, 21:03

रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणा-या रुग्णालयाचं अस्तित्व धोक्यात आल्याचं चित्र नाशिकमध्ये निर्माण झालंय. शहरातल्या बहुतांशी रुग्णालयात आग प्रतिबंधक आणि जीव सुरक्षा कायद्याची पूर्तता केलेली नाही.. त्यामुळं पालिकेच्या ना हरकत नुतनीकरण दाखल्याअभावी ही रुग्णालयं अधिकृत समजावी की अनधिकृत असा संभ्रम निर्माण झालाय..

पती-पत्नींमधील भांडणांना आवर घालण्यासाठी...

Last Updated: Sunday, July 29, 2012, 19:28

ऑफिसचं काम, येण्या-जाण्याच्या वेळा, ताण-तणाव यामुळे पती-पत्नींना एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नाही. यातून अनेक समस्या निर्माण होतात. घरात वारंवार भांडणं होऊ लागतात. घरातील शांतता भंग पावते. वातावरण प्रसन्न राहात नाही.

चंद्रपूरमधील कोल वॉशरी बंद

Last Updated: Thursday, July 12, 2012, 22:08

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रासाठी धुतलेला कोळसा पुरवण्यासाठी उभालेल्या कोल वॉशरी बंद केल्यानं कामगारांवर आत्महत्येची पाळी आलीय. अनेक कामगारांनी जमिनीच्या बदल्यात नोकरी दिली गेली असल्यानं, त्यांच्याकडे रोजगाराचा दुसरा पर्यायही राहिलेला नाही. वॉशरिजमध्ये कोळसा धुतला जात नसल्यानं महाजेनकोनं घेतलेला निर्णय कामगारांच्या मुळावर आलाय.

पाणीटंचाईच्या झळा उद्योजकांनाही

Last Updated: Friday, June 29, 2012, 22:23

सर्वसामान्य नाशिककर आणि शेतकरी पाणीटंचाईचा सामना करत असतानाच आता उद्योग क्षेत्रालाही त्याच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. मंदीतून सावरतो न सावरतो तोच आता पावसानं दगा दिल्यानं उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे.

IITची आता सामाईक परीक्षा

Last Updated: Thursday, June 28, 2012, 12:11

IITची आता सामाईक परीक्षा होणार आहे. प्रवेश परीक्षेवरून सरकार आणि आयआयटीमध्ये सुरू असलेला वाद बुधवारी अखेर संपुष्टात आला. पुढील वर्षांपासून म्हणजे २०१३ पासून केंद्रीय अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी सामायिक परीक्षा घेण्याबाबत सरकार आणि आयआयटीमध्ये करार करण्यात आला आहे.

गेला 'मान्सून' कुणीकडे?

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 18:09

मान्सून गेला कुठे असा प्रश्न मुंबईकरांना पडलाय. रविवारी वन-डे खेळून मान्सून गायब झालाय. चीनमधल्या वादळामुळे मान्सूनवर परिणाम झाल्याचं बोललं जातंय.

गोळीबारांनी हादरलं पिंपरी-चिंचवड

Last Updated: Monday, June 18, 2012, 20:50

गोळीबाराच्या सलग दोन घटनांनी रविवारी पिंपरी-चिंचवड शहर हादरून गेले. चिंचवडच्या विद्यानगर येथे झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास निगडीमध्ये आणखी एक गोळीबाराची घटना घडल्यामुळे शहरात खळबळ उडाली.

'चोरीला गेलेली बस' सापडली

Last Updated: Sunday, June 17, 2012, 18:56

नाशिकच्या महामार्ग बसस्थानकावरून शुक्रवारी मध्यरात्री चोरीला गेलेली बस सापडलीये. नाशिकपासून दीडशे किलोमीटर अंतरावरील शेवगाव गावात ही बस आढळली. या घटनेने पुन्हा एकदा एसटीच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

'युरोपमधील आर्थिक संकट चिंताजनक'

Last Updated: Sunday, June 17, 2012, 13:11

युरोपमधील आर्थिक संकट चिंताजनक असल्याचं मत पंतप्रधान मनमोहनसिंह यांनी व्यक्त केले आहे. आठ दिवसांच्या विदेश दौ-यावर जाण्यापूर्वी ते पत्रकारां बरोबर बोलत होते.

गुजरातमधील अपघात २४ ठार

Last Updated: Thursday, June 14, 2012, 15:03

सानंद-विरामगाम महामार्गावर आज गुरुवारी ट्रक अपघातात आठ बालकांसह २४ जणांचा मृत्यू झाला. अपघातातील १५ जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

आयआयटीत मुस्लिम विद्यार्थ्यांची बाजी

Last Updated: Tuesday, June 5, 2012, 18:57

आयआयटी- जेईई या महत्वाच्या तब्बल ४०० परिक्षांत मुस्लिम विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. यापूर्वी अनेक कारणांनी या समाजातील विद्यार्थी या परिक्षांमध्ये चमक दाखवू शकत नव्हते. मात्र हे स्वप्न आता साकार झालंय.

'स्वच्छ औरंगाबाद'साठी महापालिका सज्ज

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 19:02

औरंगाबाद शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी महापालिकेनं आता कंबर कसली आहे. सिंगापूरच्या धर्तीवर शहरातील रस्त्यावर कचरा टाकणा-यास दंड आकारण्यात येणार आहे.. याकरीता महापालिकेचे भरारी पथकही स्थापण करण्यात येणार आहे आणि या भरारी पथकाला फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे अधिकार देण्यात येणार आहे

फी वाढवणारच, शाळेची मनमानी

Last Updated: Tuesday, May 22, 2012, 19:01

नाशिकमध्ये रासबिहारी शाळेनं केलेल्या फी वाढीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यासंदर्भात आज शाळा व्यवस्थापन आणि पालकांची चर्चा होणार होती. पण अचानक शाळेनं चर्चेला नकार दिला.

पॅरीसच्या भारतीय दूतावासावरील हल्ला फसला

Last Updated: Friday, May 18, 2012, 15:56

आल्जेरियन वंशाचा एक आतंकवादी तालिबानच्या सूचनेवरून पॅरीसमधील भारतीय दूतावासावर हल्ला करण्याच्या बेतात होता. फ्रांसच्या सुरक्षा पथकाने या आतंकवाद्याला घातपात करण्यापूर्वीच मारण्यात आलं आहे.

'तनिष्क'मध्ये चोरी... 'बंटी-बबली'ला अटक

Last Updated: Thursday, May 10, 2012, 13:01

नाशिकमधल्या तनिष्क ज्वेलर्समध्ये झालेल्या चोरीप्रकरणी केवळ 24 तासांत दोन जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. एका बंटी-बबलीच्या जोडीनं ही चोरी केल्याचं उघड झालंय.

नाशिकच्या नाट्य चळवळीला शेवटची घरघर?

Last Updated: Wednesday, May 2, 2012, 21:27

नाशिकच्या नाट्य चळवळीला शेवटची घरघर लागली की काय, अशी परिस्थिती निर्माण झालीय. महापालिकेच्या उदासीनतेमुळे नाट्यरसिकांचा रसभंग होतोय. तांत्रिक दोषामुळे नाटकांमध्ये व्यत्यय येतोय तर अपुऱ्या सोयी सुविधांमुळे कलाकाराही नाशिककडे पाठ फिरवतायत.

लक्ष्मी मित्तल इंग्लंडमधील सर्वाधिक श्रीमंत

Last Updated: Sunday, April 29, 2012, 23:44

मूळ भारतीय वंशाचे असणारे लक्ष्मी निवास मित्तल आणि त्यांचं कुटुंब सलग सातव्या वर्षी ब्रिटनमधील सर्वांत श्रीमंत कुटुंब ठरलं आहे. संडे टाइम्स दरवर्षी ब्रिटनमधील सर्वांत श्रीमंत लोकांची यादी प्रकाशित करतं. या यादीत ६१ वर्षीय लक्ष्मी निवास मित्तल यांचं नाव अव्वल स्थानावर आहे.

धावत्या ट्रेनमधील दोघे गंभीर जखमी

Last Updated: Saturday, April 21, 2012, 10:50

मुंबईत धावत्या ट्रेनच्या दारात उभ्या असलेल्या दोन तरुणांची एकमेकांना धडक बसली आणि यात दोघेजण गंभीर जखमी झालेत. दौलत शिवसुंदर आणि सागर भोर, अशी या तरुणांची नावे आहेत.

नाशिकमध्ये चोर सोडून संन्याशालाच फाशी

Last Updated: Friday, April 20, 2012, 17:35

वाहनचोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी नवं फर्मान सोडलंय. शहरात ज्या वाहनांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार होईल त्याची माहिती पोलिसांना देणं बंधनकारक करण्यात आलंय.

मधमाशांचं पोळं, बनलं मृत्यूचं जाळं

Last Updated: Friday, April 13, 2012, 15:42

मधमाशांचं पोळं काढणं एका मुलाच्या जीवावर बेतलंय. रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातील कुंभिवली ठाकूरवाडीजवळ ही भीषण घटना घडली आहे. या भीषण घटनेनं गावावर शोककळा पसरली.

बापानेच केली मुलीची हत्या

Last Updated: Monday, April 9, 2012, 13:52

पुरोगामी समजल्या जाणा-या महाराष्ट्रात खोट्या प्रतिष्ठेपायी रक्ताच्या नात्यातील व्यक्तीची हत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झालीय. साता-यापाठोपाठ जळगावमध्येही जातीच्या प्रतिष्ठेपायी आपल्या मुलीचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

भारतीय दूतावासाबाहेर स्फोट

Last Updated: Thursday, March 29, 2012, 12:29

अफगाणिस्तानमधील भारतीय दूतावासाबाहेर काही वेळापूर्वीच एक स्फोट झाला आहे. अफगाणिस्तानमधील पूर्व भागात असणाऱ्या जलालाबाद मधील भारतीय वाणिज्य दूतावासाबाहेर एक मोठा स्फोट झाल्याचे समजते.

सांगलीमध्ये कायदा सुव्यवस्था धाब्यावर

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 22:17

सांगलीतल्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत तुफान हाणामारी झाली आहे. एकेकाळी सहकाराचा मानबिंदू मानल्या जाणाऱ्या वसंतदादा शेतकरी कारखान्यात सर्वसाधारण सबेत खुर्च्यांची फेकाफेक केली.

पाहा या वीकमधील सिनेमांचा रिव्ह्यू

Last Updated: Sunday, March 25, 2012, 10:35

सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा बहुचर्चित 'एजंट विनोद' हा सिनेमा रिलीज झाला आहे. मात्र या सिनेमाला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. तर मराठीतला तीन बायका फजिती ऐका या सिनेमाला प्रेक्षकांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिला आहे.

कोल्हापूरमध्येही अफूची शेती

Last Updated: Wednesday, March 14, 2012, 08:30

कोल्हापुरातल्या शाहूवाडी तालुक्यात सापडलेल्या अफू शेती प्रकरणी एका शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. शाहूवाडीतल्या शिवारे गावातील शेतकऱ्याच्या शेतात सापडलेल्या अफूच्या झाडांची किंमत दोन लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.

नागपूरमध्ये घातक भेसळयुक्त मध

Last Updated: Saturday, March 3, 2012, 22:07

नागपूरमध्ये भेसळयुक्त मध जप्त करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. हे भेसळयुक्त मध शरिराला घातक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे नागपूरकर धास्तावले आहेत.

लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार, एक अटकेत

Last Updated: Friday, February 3, 2012, 12:20

लग्नाचं आमिष दाखवून २५ वर्षीय युवतीवर वर्षभर बलात्कार करणा-या व्हिडीओकॉन कंपनीच्या उच्चपदस्थ कर्मचा-याला कल्याणमध्ये अटक करण्यात आलीय. सुधीर बनसोडे असं या कर्मचा-याचं नाव आहे.

नाशिकमधील वाढती गुन्हेगारी

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 00:24

देवभूमी, मंत्रभूमी, यंत्रभूमी अशी नाशिक जिल्ह्याची ही ओळख साऱ्या जगानं मान्य केली आहे. महाराष्ट्राचे देवघर असं संतसाहित्यिकानी वर्णन केलेल्या नाशिकची ओळख आता बदलत आहे. देवभूमीत आता दानवांचा संचार झाला आहे आणि याच दानवाचे जे काही प्रताप आहेत ते पाहून कुणाचाही संताप होईल. ही कृष्णकृत्य आहेत नाशिकच्या नराधम गुन्हेगांराची.

सीसीटीव्हीवर भारी नाशिकचे चोर!

Last Updated: Tuesday, November 1, 2011, 12:52

नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही लाऊनही नाशिकमधली गुन्हेगारी नियंत्रणात येत नाहीय. सीसीटीव्हीसह इतर तांत्रिक यंत्रणा योग्य प्रकारे काम करत नसल्याचं समोर आलं आहे. मग यंत्रणेवर एवढा खर्च कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

नाशिकची प्रतिमा उजळ, करणार खा. भुजबळ

Last Updated: Tuesday, November 1, 2011, 12:15

गुन्हेगारीमुळे नाशिकची डागाळत चाललेली प्रतिमा सुधारण्यासाठी आता खासदार समीर भुजबळांनी गुन्हेगारीच्या संदर्भातील तक्रारी नागरिकांनी थेट आपल्याकडे कराव्या यासाठी स्वत:चा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरदेखील जाहीर केला आहे.