Last Updated: Tuesday, February 28, 2012, 07:31
सुरेंद्र गांगण
कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो निसर्ग. मात्र, या निसर्गावर लाकूड व्यापाऱ्यांनी घाला घालून निसर्गाची पैशासाठी लूट केली आहे. महाराष्ट्रातील जवळपास निम्मा जंगलभाग हा कोकणात होता. आता हे प्रमाण घटत आहे. हे सांगण्याचे कारण की, कोकणच्या वातावरणाला पोषक असे उद्योग आले नाही. मात्र, वातावरण बिघडविणारे प्रकल्प आणले गेलेत. यातून राजकारणही केलं गेलं, ते आजही सुरू आहे.