Last Updated: Tuesday, February 28, 2012, 16:22
उत्तर पाकिस्तानमधील कोहिस्तान भागात आज मंगळवारी बस रोखून शिया समाजातील १८ लोकांना गोळ्या घालण्यात आल्या. यामुळे पाकस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. यामध्ये सात जण गंभीर जखमी आहेत. राजधानी इस्लामाबादपासून २०० किमी अंतरावर ही घटना घडली. अज्ञातांनी हा गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे.